Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘विकास निधीबरोबरच मुश्रीफांनी संजय मंडलिकांचे राजकीय करिअरही चोरलं’; समरजितसिंह घाटगे यांचं टीकास्त्र

हसन मुश्रीफांनी विकास केला तो ठराविक लोकांचा. त्यांनी ठराविक लोकांसाठी तालुका वेठीस धरला आहे. त्यांच्याकडील ठराविक नेते आणि लोक पैसे मिळवण्याचे काम करत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 11, 2024 | 12:30 PM
'विकास निधीबरोबरच मुश्रीफांनी संजय मंडलिकांचे राजकीय करिअरही चोरलं'; समरजितसिंह घाटगे यांचं टीकास्त्र

'विकास निधीबरोबरच मुश्रीफांनी संजय मंडलिकांचे राजकीय करिअरही चोरलं'; समरजितसिंह घाटगे यांचं टीकास्त्र

Follow Us
Close
Follow Us:

मुरगड : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गावोगावी वाटलेल्या विकासगंगा पुस्तकात माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी मंजूर केलेल्या विकासकामांचेही श्रेय मुश्रीफ यांनी घेतले. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी प्रा. मंडलिक यांना बाजूला ठेवून मुश्रीफांना संधी दिली. त्यांना मंत्रिपदासह विविध सत्ता दिल्या. त्याच मुश्रीफांनी प्रा. मंडलिक यांच्या निधीबरोबरच त्यांचे राजकीय करिअरही चोरल्याची खोचक टीका महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केली.

हेदेखील वाचा : New CJI Sanjeev Khanna: संजीव खन्ना यांनी घेतली नव्या सरन्यायाधीशपदाची शपथ;राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

कुरणी (ता.कागल) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, ‘हमीदवाडा साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिवंगत सदाशिव मंडलिक यांना हसन मुश्रीफ यांनी दिलेला त्रास स्वाभिमानी जनता विसरलेली नाही. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक म्हणाले होते, हसन मुश्रीफ नावाच्या राक्षसाला मीच गाढणार. त्यांचे हे अपूर्ण स्वप्न या निवडणुकीत कागलची स्वाभिमानी जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

बिद्रीचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, ‘हसन मुश्रीफांनी विकास केला तो ठराविक लोकांचा. त्यांनी ठराविक लोकांसाठी तालुका वेठीस धरला आहे. त्यांच्याकडील ठराविक नेते आणि लोक पैसे मिळवण्याचे काम करत आहेत. तुम्ही इतका विकास केल्यानंतर तुम्हाला दिशाहीन गोष्टी का कराव्या लागत आहे. हसन मुश्रीफांना लोकशाही म्हणजे काय हे दाखवण्याची तुम्हा आम्हाला उत्तम संधी आली आहे. या संधीचं सोनं करून मुश्रीफांना पराभूत करूया’.

सागर कोंडेकर म्हणाले, ‘पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला, शेतकऱ्यांना, बेरोजगारांना, महिलांना, युवतींना, तरुणांना फसवलं. अशा दलबदलू, सत्तापिपासू मुश्रीफांना या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय शांत बसायचं नाही’.

स्वागत व प्रास्ताविक सागर पाटील यांनी केले.यावेळी शिवानंद माळी, संकेत देशमुख, एकनाथ देशमुख,शिवाजी कांबळे,संभाजी भोकरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेस दत्तामामा खराडे,लक्ष्मण जात्राटे, विनोद पाटील, किसन पाटील,भाऊसो पाटील,आनंदा थोरवत, शामराव मांगोरे,तातोबा कांबळे, रणजीत कांबळे आदी उपस्थित होते.आभार प्रकाश पारटे यांनी मानले.

मुश्रीफसाहेब साडेतीनशे कोटी कुणाच्या घशात घालण्यासाठी?

” या निवडणुकीत मुश्रीफ मायनस झाले आ्हेत. त्यांच्यासोबत आता कोणी नाही. मुश्रीफांचा विकास म्हणजे ठराविक कंत्राटदारांचा झालेला विकास. कागल ते निढोरी रस्ता एवढा चकाचक असताना पुन्हा साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी कुणाच्या घशात घालण्यासाठी मंजूर केला आहे. याचे उत्तर पालकमंत्री हसन मुश्रीफांनी जनतेला द्यावे. असे मत कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी व्यक्त केले.

हेही वाचा :  मध्य प्रदेशातील या चार ठिकाणी दिसला ‘सरकटे का आतंक’! एक्सप्लोर करताच मिळेल थ्रिलिंग अनुभव

Web Title: Along with development funds mushrif stole sanjay mandaliks political career criticism of samarjit singh ghatge nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 12:30 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Samarjit Singh Ghatge

संबंधित बातम्या

Samarjeet Ghatge On Hasan Mushrif : सभासदांना न्याय मिळेपर्यंत लढणार; समरजीत घाटगे यांचं वक्तव्य
1

Samarjeet Ghatge On Hasan Mushrif : सभासदांना न्याय मिळेपर्यंत लढणार; समरजीत घाटगे यांचं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.