मध्य प्रदेशातील या चार ठिकाणी दिसला 'सरकटे का आतंक'! एक्सप्लोर करताच मिळेल थ्रिलिंग अनुभव
तुम्हाला थ्रिलिंग अनुभवासह नवीन ठिकाणे एक्सप्लोर करायला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अलिकडेच कॉमेडी हॉरर चित्रपट ‘स्त्री 2’ ने बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालत लोकांचं प्रचंड मनोरंजन केलं. या चित्रपटाल दाखवण्यात आलेल्या ठिकाणांबद्दल लोकांमध्ये अजूनही प्रचंड क्रेझ आहे. ही ठिकाणं मध्य प्रदेश आणि भोपाळमधील आहेत. चित्रपटातील या शहरांचे सौंदर्य पाहून लोक अजूनही या ठिकाणांना भेट देत आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन 3 महिने उलटले असले तरी चित्रपटात दाखवण्यात आलेल्या ठिकाणांबद्दलची लोकांची उत्सुकता कायम आहे. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)
हेदेखील वाचा- मनाली जवळ लपली आहेत ही 4 ऑफबीट डेस्टिनेशन! निसर्गासोबत निवांत क्षण घालवण्याचा आनंद घ्या
चंदेरी येथील राजा राणी महल हे चित्रपटाचे एक महत्त्वाचे शूटिंग लोकेशन आहे. हा सात मजली राजवाडा चित्रपटात अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. खासकरून या चित्रपटातील प्रसिद्ध रोमँटिक गाणे ‘तुम्हारे ही रहेंगे’ या पॅलेसमध्ये शूट करण्यात आले आहे. या राजवाड्याच्या पायऱ्या हे या चित्रपटाचे शूटिंगचे महत्त्वाचे ठिकाण होते. तुम्ही चंदेरीला जाऊन या महालाला स्वतः भेट देऊ शकता. या ठिकाणी भेट देऊन तुम्ही हॉरर आणि थ्रिलिंग अनुभव घेऊ शकता.
चंदेरी शहराची शान असलेला चंदेरी किल्लाही चित्रपटात अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. 10व्या-11व्या शतकात बांधलेला हा किल्ला चंद्रगिरी नावाच्या टेकडीवर बांधला गेला आहे. किर्तीपाल महाराजांनी शत्रूंपासून संरक्षणासाठी चंद्रगिरी टेकडीच्या सर्वात उंचावर हा किल्ला बांधला होता. हा किल्ला स्थापत्यकलेचा एक भव्य नमुना आहे, जो मोठ्या प्रमाणात भयावह अनुभव देखील देतो.
हेदेखील वाचा- या फेस्टिव्ह सिजनला एक्सप्लोर करा श्रीलंकातील हे सुंदर 5 बीच, समुद्राकिनारी घ्या सनसेटचा आनंद
चित्रपटात अनेक ठिकाणे दाखवण्यात आली असली तरी त्यात दाखवलेला बस स्टँड प्रत्येकाच्या लक्षात असेल जिथे चित्रपटातील अभिनेत्री श्रद्धा कपूरला सोडण्यासाठी विकी प्रत्येक वेळी जातो. या दृश्यात दिसणारा मोठा दरवाजा म्हणजे चंदेरीचा काटी व्हॅली गेटवे. हा दरवाजा प्रत्यक्षात पछाडलेला मानला जातो आणि त्याच्याशी संबंधित अनेक रहस्ये आज अस्तित्वात आहेत. विशेष म्हणजे एका रात्रीत एका व्यक्तीने डोंगर कापून हा दरवाजा बांधला, अशा कथा आजही सांगितल्या जातात. डोंगर कापून हा दरवाजा बांधला गेल्याने त्याला काटी व्हॅली गेटवे म्हणतात.
चंदेरीतील सुंदर आणि भीतीदायक ठिकाणांव्यतिरिक्त राज्याची राजधानी भोपाळची काही दृश्येही या चित्रपटात दाखवण्यात आली. चित्रपटाची काही दृश्ये भोपाळमधील ताजमहाल पॅलेसमध्ये शूट करण्यात आली आहेत. मनोरंजक गोष्ट अशी आहे की या ऐतिहासिक राजवाड्याशी संबंधित अनेक भीतीदायक कथा आहेत.
तुम्हाला थ्रिलिंग अनुभव घेत नवीन ठिकाणं एक्सप्लोर करण्याची आवड असेल तर तुम्ही राजा राणी महाल, चंदेरी किल्ला, काटी व्हॅली गेटवे आणि ताजमहाल पॅलेस या ठिकाणांना भेट देऊ शकता. हि सर्व ठिकाणे दिसायला जेवढी सुंदर आहेत, तेवढी भयानक देखील आहेत.