Baramati election result 2024 ajit pawar wins Abhijit Wamanrao Awad Bichukale total votes
बारामती : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यापासून भाजपने व महायुतीने आघाडी घेतली आहे. यामध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. राजकीय वर्तुळामध्ये अनेक बड्या नेत्यांची चर्चा आहे. यामध्ये आणखी एका व्यक्तीची चर्चा रंगली आहे. ते म्हणजे राष्ट्रपती पदाची स्वप्ने पाहणारे अभिजीत बिचुकले.
प्रत्येक निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमवणारे अभिजीत बिचुकले यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील अर्ज दाखल केला होता. यंदाच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी चुरशीची लढत दिसली. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये प्रतिष्ठेची लढत होताना दिसली. त्यामुळे बारामतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यामुळे अभिजीत बिचुकले यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अभिजीत बिचुकले यांनी बारामतीमध्ये चुरशीची लढत देण्याचा प्रयत्न केला.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
अभिजीत बिचुकले यांनी अनेक मतदारसंघातून याआधी निवडणूक लढली होती. त्यानंतर त्यांनी आता यंदाच्या निवडणुकीमध्ये बारामतीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आता मतमोजणीनंतर अभिजीत बिचुकले यांना मिळालेली मतं समोर आली आहे. डॉ.अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले यांना बारामतीमध्ये 68 मतं मिळाली आहेत. बिचुकले यांनी कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदारांनी त्यांना साथ देण्याचा मात्र विचार केला नाही.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बारामतीमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांनी आपला गड राखला आहे. अजित पवार यांनी विक्रमी नंबरने आघाडी मिळवली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांना तब्बल 1 लाख 29 हजार 993 मतं मिळाली आहेत. अजित पवार यांच्याविरोधात त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार हे लढत देत होते. युगेंद्र पवार यांना 57 हजार 184 मतं मिळाली आहेत. त्यामुळे तब्बल 72 हजारहून अधिक मतांनी अजित पवार हे आघाडीवर आहेत. त्याचबरोबर अभिजीत बिचुकले यांना बारामतीमध्ये फक्त 68 मतं मिळाली आहे. बिचुकले यांच्यापेक्षा नोटाला अधिक मतं मिळाली आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये नोटाला 565 मतं मिळाली आहेत.