फोटो काढताना कार्यकर्ता मध्ये आल्याने दानवेंनी लाथच मारली; व्हिडिओ व्हायरल होताच...
जालना : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यातच माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यांच्या या प्रकाराने एकच टीका केली जात आहे.
हेदेखील वाचा : सर्वसामान्यांचे बजेट आता पुन्हा कोलमडणार ! कांदा 80 रुपये किलो तर लसणाचा 400 रुपये प्रतिकिलो दर
भाजप नेते रावसाहेब दानवे हे निवडणुकीच्या कार्यकाळात अनेकदा चर्चेत असताना आपण पाहिलं आहे. त्यात आता एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याने एकच चर्चा रंगली आहे. रावसाहेब दानवे यांनी आपल्या कार्यकर्त्याला लाथ मारत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या व्हिडिओत अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे हे एकत्र दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही नेत्यांनी पत्रकांसोबत संवाद साधताना आता झाले गेले विसरून, आम्ही पुढे जाऊ, असे सांगत दिलजमाईवर केली होती.
Shameful Act 🚨By Maharashtra BJP leader Raosaheb Dadarao Danve
The Way he is Kicking the Common Man, BJP should also be Kicked out from Maharashtra like this…
No Respect for Human Being pic.twitter.com/5r3R2iC8A0
— Harmeet Kaur K (@iamharmeetK) November 11, 2024
यानंतर अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांना पुष्पगुच्छ दिला. मात्र, फोटो काढत असताना एक कार्यकर्ता आडवा येत असल्याचे दिसले. त्यामुळे दानवे यांनी आपल्या बाजूला असलेल्या एका कार्यकर्त्यास लाथ मारून दूर केले. याचाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. असे जरी असले तरी आता ज्यासोबत हा प्रकार झाला तो कार्यकर्ता समोर आला असून, त्याने नेमके काय घडले याची माहिती दिली आहे.
खोतकर-दानवे वाद संपुष्टात
जालना लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात तेढ निर्माण झाला होता. विधानसभा निवडणुकीत खोतकर जालनामधून महायुतीचे उमेदवार आहेत. मात्र, दानवे अद्याप त्यांच्या प्रचारात फिरकले नव्हते. यामुळे सोमवारी सकाळीच खोतकर बंधू भोकरदन येथे दानवे यांच्या निवासस्थानी गेले. येथे बंद दाराआड दानवे-खोतकर यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकांसोबत संवाद साधला.
लाथ मारलेला कार्यकर्ता म्हणाला…
शेख अहमद असे लाथ मारलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. माझा आणि रावसाहेब दानवे यांची 30 वर्षांपासूनची मैत्री आहे. दानवे यांचा शर्ट अडकल्याने त्यांच्या कानात मी सांगितले. मात्र, त्यांना ते समजले नाही. मात्र, याचदरम्यान त्यांच्या हातात पुष्पगुच्छ असल्याने दानवे यांनी मिश्किलपणे आपल्याला बाजूला सारल्याचे त्यांनी म्हटले आहे.