File Photo : Onion Market
पुणे : गेल्या काही दिवसांपासून जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होताना दिसत आहे. त्यात दिवाळीमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली होती. मात्र, आता कांद्याचे दर पुन्हा गगनाला भिडले आहेत. अनेक शहरांमध्ये घाऊक बाजारात कांद्याचे दर अचानक 70 रुपये किलोपर्यंत पोहचल्याचे दिसून आले. त्यामुळे किरकोळ बाजारातही दरवाढ झाली.
हेदेखील वाचा : Maharashtra Elections 2024: महाराष्ट्र निवडणुकीत पैसे वाटले जात आहेत का? संजय राऊतांचा महायुतीवर गंभीर आरोप
सध्या किरकोळ बाजारात कांदा 80 ते 90 रुपये प्रतिकोला विकला जात असून, दरवाढ अशीच राहिली तर लवकरच कांद्याचे भाव शंभरी गाठतील, अशी शक्यता आहे. कांद्यासह लसणाचे भावही कडाडले आहेत. मुंबईत एक किलो लसूण खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 400 रुपये मोजावे आहेत. बाजारात नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच लवकरच या दरांमध्ये घट होईल, अशीही आशा ते करत आहेत.
सोमवारी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 65 रुपये प्रतिकोला भाव मिळाला. तर सरासरी 45 रुपये प्रतिकिलोने कांद्याची विक्री झाली. तर कोल्हापूरमध्ये सर्वाधिक 70 रुपये प्रतिकिलो दराने भाव मिळाला. त्यामुळे किरकोळ बाजारातही कांद्याचे भाव वाढल्याचे चित्र दिसून आले. आश्चर्याची बाब म्हणजे अलीकडेच बाजारात कांद्याचा भाव 40 ते 60 रुपये किलो होता. मात्र, या वाढीमुळे ग्राहकांना नक्कीच फटका बसणार आहे. मुंबईतीली अनेक बाजारात कांदा 70 ते 80 रुपये किलोने मिळतो.
अनेक पटींनी वाढले कांद्याचे भाव
कांदा आणि लसूणचे भाव अनेक पटींनी वाढले आहेत. याचा परिणाम घरांच्या बजेटवर होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधूनही आवक लवकरच वाढू शकते. यामुळे किमती कमी होण्याची चिन्हे आहेत.
जुन्या कांद्याला मागणी जास्त
मागील 15 दिवसांत सोलापूर बाजारात समितीत जेवढा कांदा विक्रीसाठी आला, त्यातील 30 टक्के कांदा हा पावसाने खराब झालेलाच होता, असे बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या कांद्याला प्रतिकिलो 50 पैसे दर मिळाला. आता बाजार समितीत ओला कांदा विक्रीसाठी वाढत असून, त्यामागे अवकाळी पावसाची भीती व निर्यातबंदीची धास्ती असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच कांद्याचा सरासरी दर कमी झाला असून, सध्या ओल्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी 2600 रुपयांचा दर आहे. सुकलेल्या जुन्या कांद्याला चार हजार 200 ते 5200 रुयांपर्यंत आहे.
राज्यात आवक घटली
कांद्याचा भाव ६०-७० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. हा कांदा बाजारातून विकत घेतला जातो. त्यामुळे जो काही भाव मिळतो, त्याच भावाने तो विकला जातो. भाव वाढल्यामुळे कांद्याची विक्रीही कमी झाली आहे, पण तरीही लोकं काही प्रमाणात कांद्याची खरेदी करत आहेत, कारण कांदा हा इथल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे.
कांद्याची घटली आवक
राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये सोमवारी कांद्याची आवक घटली. त्यामुळे भाव वधारले. पुण्यात ७,८७३ क्विंटल घट नोंदवण्यात आली. तर कराडमध्ये ५१ क्विंटल कांद्याची आवक घटली. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्येही १६६० क्विंटल आवक घटल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले.
हे सुद्धा वाचा: मोटारमनची सतर्कता, वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात टळला; बैलाच्या धडकेमुळे ट्रेनचा पुढचा भाग तुटला