एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; सोशल मीडियावर दिली होती जिवेमारण्याची धमकी
मुंबई : राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मागील महिन्यामध्ये निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करण्यात आली. त्यानंतर राजकारण वाढले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे जोरदार प्रचार केला जात आहे. राज्य सरकारकडून या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती. याचे नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा देखील झाले होते. मात्र त्यानंतर आदर्श आचारसंहिता लागल्यामुळे योजनेचे पैसे येणे थांबले आहे. आता लाडकी बहीण योजनेचा पुढचा हफ्ता कधी येणार याबाबत सर्वांना प्रश्न पडला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महायुती सरकारकडून निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली होती. ही योजना जाहीर झाल्यापासून चर्चांच्या केंद्रस्थानी राहिली आहे. अजित पवार यांनी ही अर्थसंकल्पामध्ये योजना जाहीर केली होती. त्यानंतर जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत हफ्ता खात्यांमध्ये जमा केला होता. दिवाळीपूर्वी नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता जमा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर निवडणूकीची घोषणा झाली. आणि निवडणूक आयोगाकडून या योजनेचा निधी थांबवण्यात आला. यानंतर आता पुढचा हफ्ता कधी येणार याबाबत एकनाथ शिंदे यांना प्रश्न करण्यात आला.
एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या पैशांबाबत वक्तव्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकले नाही पाहिजेत म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये दिले. २० नोव्हेंबरला मतदान आहे. २३ नोव्हेंबरला निकाल आहे. त्यामुळे डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येणार आहेत. कारण आमची नियत स्वच्छ आहे. कारण आम्ही देणाऱ्यातले आहोत, घेणाऱ्यातले नाही.” असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
हे देखील वाचा : एकनाथ शिंदे संकुचित मनाचा नेता…माहिम मतदारसंघावरुन मनसे आक्रमक
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडीच कोटी महिलांचे अर्ज आले होते, त्यातील २ कोटी ४० लाख महिलांचे अर्ज मंजूर झालेत. तर २ लाख २० हजार महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत. तर, आता निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकार सत्तेत आल्यास ही योजना कायमस्वरुपी सुरू राहणार आहे. तसेच आम्ही केवळ 1500 थांबणार नाही. आशिर्वाद आम्हाल मिळाले तर योजनेचे पैसे आम्ही आणखी वाढवू. माझ्या बहिणींना लखपती बनवण्याचं स्वप्न आहे,” असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.