Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खेडमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या भगवा लाटेचा धडाका; सत्तासमीकरणे बदलली, ठाकरे गटाला धक्का

खेडमधील हा निकाल म्हणजे केवळ स्थानिक विजय नसून, तो ठाकरे गटासाठी इशारा आणि शिंदे शिवसेनेसाठी निर्णायक टप्पा ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 13, 2026 | 11:01 AM
पिंपरी-चिंचवड शिवसेनेची कार्यकारिणीच बरखास्त; कामचुकार पदाधिकाऱ्यांची आता गय नाही

पिंपरी-चिंचवड शिवसेनेची कार्यकारिणीच बरखास्त; कामचुकार पदाधिकाऱ्यांची आता गय नाही

Follow Us
Follow Us:

खेड : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत खेड तालुक्यात शिंदे शिवसेनेने राजकीय वर्चस्वाचा स्पष्ट इशारा देत विरोधकांच्या गडांना सुरुंग लावला आहे. जिल्हा परिषदच्या ७ पैकी ६ गटांवर आणि पंचायत समितीच्या १४ पैकी १० गणांवर भगवा फडकावत शिंदे गटाने तालुक्यातील सत्ता-समीकरणे पूर्णतः बदलून टाकली आहेत.

पक्षफुटीनंतर प्रथमच झालेल्या या महत्त्वाच्या स्थानिक निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट कौल देत शिंदे गटालाच पसंती दिल्याचे चित्र समोर आले आहे. हा निकाल म्हणजे “खरी शिवसेना कोणाची?” या राजकीय संघर्षावर मतदारांनी दिलेला ठोस शिक्कामोर्तब असल्याचे मानले जात आहे. खेडमधील हा निकाल म्हणजे केवळ स्थानिक विजय नसून, तो ठाकरे गटासाठी इशारा आणि शिंदे शिवसेनेसाठी निर्णायक टप्पा ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

ठाकरे गटाच्या प्रभावाला तडा

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काही गटांपुरते यश मिळाले असले, तरी एकेकाळी मजबूत मानल्या जाणाऱ्या खेड तालुक्यात त्यांच्या संघटनात्मक ताकदीला मोठा धक्का बसला आहे. लोटे आणि काही पंचायत समिती गणांपुरतेच मर्यादित राहिलेले यश ठाकरे गटासाठी आत्मपरीक्षणाची घंटा ठरली आहे.

शिंदे गटाची आक्रमक रणनीती यशस्वी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेनेने विकास, प्रशासनाशी थेट संपर्क आणि स्थानिक कार्यकर्त्यांची मजबूत फळी या त्रिसूत्रीवर निवडणूक लढवली. त्याचा थेट फायदा ग्रामीण भागात दिसून आला. गावपातळीवर केलेले संघटन आणि आक्रमक प्रचारामुळे विरोधकांना सुरुवातीलाच पिछाडीवर टाकण्यात शिंदे गट यशस्वी ठरला.

राष्ट्रवादीला अपवादात्मक यश

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला भडगाव व जामगेसारख्या प्रतिष्ठेच्या ठिकाणी यश मिळाले असले, तरी एकूण राजकीय चित्रात त्यांचा प्रभाव मर्यादितच राहिला. हे यश अपवादात्मक ठरले असून, तालुकास्तरावर नेतृत्व उभे करण्यात पक्षाला अजून मोठी कसरत करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आगामी राजकारणाला दिशा

या निकालामुळे खेड तालुक्यात शिंदे शिवसेनेचा दबदबा अधिकच घट्ट झाला असून, आगामी पंचायत, नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकांसाठी विरोधकांवर मानसिक दबाव निर्माण झाला आहे. स्थानिक सत्ताकेंद्रांवर नियंत्रण मिळाल्याने शिंदे गटाचे राजकीय वजन वाढणार असून, कोकणातील राजकारणात नव्या सत्तासमीकरणांची नांदी म्हणून या विजयाकडे पाहिले जात आहे.

हेदेखील वाचा : Shambhuraj Desai News: आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? महायुतीत ठिणगी, शंभूराजे देसाईंनी सुनावले खडेबोल

Web Title: Eknath shindes shiv sena saffron wave explodes in khed know whats exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांची गच्छंती अटळ; मुख्यमंत्र्यांचे थेट राज्यपालांना पत्र, आता चौकशी समिती…
1

MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांची गच्छंती अटळ; मुख्यमंत्र्यांचे थेट राज्यपालांना पत्र, आता चौकशी समिती…

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार
2

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
3

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?
4

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.