Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shambhuraj Desai News: आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? महायुतीत ठिणगी, शंभूराजे देसाईंनी सुनावले खडे बोल

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सांगलीत सत्ता स्थापनेबाबत पेच निर्माण झाला आहे. बहुमतासाठी महाविकास आघाडीला एका जागेची गरज असून भाजपलाही १३ जागांची आवश्यकता आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 13, 2026 | 10:19 AM
Shambhuraj Desai News

Shambhuraj Desai News

Follow Us
Follow Us:
  • जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना शिवसेनेची भूमिका ठरवणारा भाजप कोण- शंभुराज देसाई
  • जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सांगलीत सत्ता स्थापनेबाबत पेच
  • भाजपची भूमिका सोयीस्कर असली म्हणून आमची भूमिका ते ठरवू शकत नाहीत
 

 Sambhuraj Desai on   Sangali Politics : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना शिवसेनेची भूमिका ठरवणारा भाजप कोण, असा थेट सवाल राज्याचे पर्यटनमंत्री तथा शिवसेनेचे नेते शंभूराजे देसाई यांनी केला. महापालिका निवडणुकीवेळी भाजपने फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देसाई म्हणाले, महापालिका निवडणुकीत भाजपने दहा जागा देण्याचे जाहीर केले होते; मात्र शेवटी ‘सॉरी’ म्हणत केवळ दोन जागा दिल्या. “एक लुगड्याने बाई म्हातारी होत नसते,” असा टोला लगावत निवडणूक निकालानंतर भाजपला वास्तव कळाले, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जमेल तिथे महायुती, अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय ठरलेला असतानाही भाजपने शब्द पाळला नाही, असा आरोप त्यांनी केला.

फोन एक, रंग अनेक! Realme च्या ‘या’ स्मार्टफोनचा नवा कलर व्हेरिअंट लाँच, यूजर्स झाले खूष… पावरफुल बॅटरीसह

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सांगलीत सत्ता स्थापनेबाबत पेच निर्माण झाला आहे. बहुमतासाठी महाविकास आघाडीला एका जागेची गरज असून भाजपलाही १३ जागांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेत महायुतीचीच सत्ता येईल, तसेच शिवसेना (शिंदे गट) सोबत सहभागी असेल, असा दावा केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना देसाई यांनी स्पष्ट केले की, “भाजपची भूमिका सोयीस्कर असली म्हणून आमची भूमिका ते ठरवू शकत नाहीत.”

महापालिकेत सत्तेत सहभागी व्हायचे की नाही, तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये कोणती भूमिका घ्यायची याबाबत नव्याने निवडून आलेल्या सदस्यांशी चर्चा केली जाणार आहे. या चर्चेचा सविस्तर अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला जाईल. अंतिम निर्णय त्यांच्याच मार्गदर्शनानुसार घेतला जाईल, असे देसाई यांनी सांगितले.

कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा; कपडे काढून उपनिरीक्षकाला केली मारहाण

निवडणुकीदरम्यान भाजपकडून कसा त्रास देण्यात आला, याचाही वृत्तांत पक्षप्रमुखांना दिला जाईल. दरम्यान, देसाई यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या सात सदस्यांचा आणि १९ पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, महानगर प्रमुख प्रा. मोहन वनखंडे, गौरव नायकवडी, नगरसेवक युवराज बावडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. सांगलीतील राजकीय घडामोडींना देसाई यांच्या वक्तव्यामुळे नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title: Shambhuraj desai news who is the bjp that decides our role spark in the grand alliance shambhuraj desai delivered strong words

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Shambhuraj Desai
  • shivsena

संबंधित बातम्या

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
1

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
2

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
3

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.