महाराष्ट्रात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मोठी कारवाई, 28 बंडखोर उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी (फोटो सौजन्य-X)
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी सर्व 288 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्याआधी महाविकास आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेसने बंडखोर उमेदवारांवर मोठी कारवाई केली आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्र युनिटने रविवारी 28 बंडखोर उमेदवारांना ‘पक्षविरोधी’ कारवाईसाठी सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. राज्यातील २२ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत हे उमेदवार महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध लढत आहेत.
माजी मंत्री राजेंद्र मुळक (रामटेक मतदारसंघ), याज्ञवल्क्य जिचकार (काटोल), कमल व्यवहारे (कसबा), मनोज शिंदे (कोपरी पाचपाखाडी) आणि आबा बागुल (पार्वती) या प्रमुख नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. एआयसीसीचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आल्याचे काँग्रेसच्या निवेदनात म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा: शिंदेंच्या दोन मंत्र्यांसह ८ जणांना परत यायचं होतं; त्या दिवशी मातोश्रीवर नक्की काय घडलं?
पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या बंडखोर उमेदवारांमध्ये सिंदखेडामधून बंडखोर शामकांत सनेर, श्रीवर्धनमधून राजेंद्र ठाकूर, पार्वतीमधून आबा बागुल, शिवाजीनगरमधून मनीष आनंद, परतूरमधून सुरेश कुमार जेथलिया आणि कल्याण बोराडे, रामटेकमधून चंद्रपाल चौकसे, सोनल कोवे यांचा समावेश आहे. , मनोज सिंदे , अविनाश लाड , आनंदराव गेडाम , शब्बीर खान , हंसकुमार पांडे , मंगल भुजबळ , अभिलाषा गावतुरे, कमल व्यवहारे, मोहनराव दांडेकर, प्रेमसागर गणवीर, याज्ञवल्क्य जिचकार, अजय लांजेवार, राजेंद्र मुळक, विजय खडसे, विलास पाटील यांच्या नावांचा समावेश आहे.
2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात निकराची लढत होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे. दरम्यान या निवडणुकीत महाविकास आघाडीसमोर लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान आहे, तर महायुतीला पुन्हा सत्तेत येण्यासाठी 145 जागा मिळवाव्या लागणार आहेत. दोन्ही पक्ष आपापली ताकद दाखवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.
1.आरमोरी विधानसभा मतदासंघ – आनंदराव गेडाम, शिलु चिमूरकर 2. गडचिरोली मतदारसंघ – सोनल कोवे, भरय येरमे 3. बल्लारपूर – अभिलाषा गावतूरे, राजू झोडे, 4.भंडारा – प्रेमसागर गणवीर, 5. अर्जुनी मोरगांव – लांजेवार, 6. भिवंडी- विलार रघुनाथ पाटील, आसमा जव्वाद चिखलेकर, 7. मिरा भाईंदर – हंसकुमार पांडे, 8. कसबा पेठ – कमल व्यवहारे, 9.पलूस कडेगाव- मोहनराव दांडेकरक, 10.अहमदनगर शहर – मंगल विलास भूजबळ, 11.कोपरी पाचपाखाडी – मनोज शिंदे, 12. सुरेश पाटीलखेडे, 13.उमरखेड – विजय खडसे, 14.यवतमाळ – शबीर खान, 15.राजापूर – अविनाश लाड, 16.काटोल – याज्ञवल्य जिचकार, 17.रामेटक – राजेंद्र मुळक
हे सुद्धा वाचा: शिवाजी सावंत यांचा रणजीत शिंदे यांना पाठिंबा; आमदार बबनदादा शिंदे यांनी केले स्वागत
दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक (DGP) संजयकुमार वर्मा यांच्या प्रभारी नियुक्तीबाबत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.