Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दादरमधील भाजप कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दादर येथील वसंत स्मृती या भाजपा कार्यालयासमोर प्रचंड घोषणाबाजी करत भाजपच्या आंदोलनाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 22, 2026 | 11:35 AM
राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दादरमधील भाजप कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दादरमधील भाजप कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

Follow Us
Follow Us:
  • राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन युवक काँग्रेस आक्रमक
  • दादरमधील भाजप कार्यालयासमोर तीव्र आंदोलन
  • झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी
मुंबई : मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीनं यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दादर येथील वसंत स्मृती या भाजपा कार्यालयासमोर प्रचंड घोषणाबाजी करत भाजपच्या आंदोलनाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी युवक कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून राहुल गांधी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांचा भाजप कार्यालयासमोर फुले उधळून निषेध केला.

 

सायंकाळच्या सुमारास मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीनं यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस आंदोलन करणार असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. झीनत शबरीनं यांच्या नेतत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयसमोर पोहोचून तीव्र घोषणाबाजी केली आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या प्रकाराचा भाजपच्या कार्यालयासमोर फुले उधळून अनोख्या पद्धतीने निषेध केला. पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन भोईवाडा पोलीस स्थानकात नेले.

यावेळी बोलताना झीनत शबरीनं म्हणाल्या की, आंदोलनादरम्यान आम्ही भाजपा कार्यालयासमोर प्रतीकात्मक फुलांचा वर्षाव करून “द्वेष आणि हिंसेच्या राजकारणाला महाराष्ट्रात स्थान नाही,” असा स्पष्ट संदेश दिला. लोकशाहीत वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र हिंसेच्या धमक्या देणे हे लोकशाहीच्या मूल्यांवर आघात आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या देणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली पाहिजे. युवक काँग्रेस लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी सातत्याने लढा देत राहील.”

पोलीस भाजप कार्यकर्त्यांना आंदोलन करायला मोकळी सूट देतात मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांवर दडपशाही करतात. आंदोलन करण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतात, घरातून पोलीस घेऊन जातात. पण राहुल गांधी विरोधात भाजप जेव्हा आंदोलन करते तेव्हा पोलीस गायब असतात. पोलिसांनी युवक काँग्रेसवर दडपशाही करण्यापेक्षा राहुल गांधींना गोळ्या घालून जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे असे शबरीनं म्हणाल्या.

Web Title: Youth congress workers staged a strong protest in front of the bjp office in dadar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • MP Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
2

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
3

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
4

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.