
Harshvardhan Sapkal, Devendra Fadnavis, BJP Politics, Pune Politics, Maharashtra Politics
त्या वेळी आंदोलन हिंसक वळणावर गेले, त्या दिवशी झालेल्या दगडफेकीत नऊ जण जखमी झाले. या घटनेविषयी प्रतिक्रिया देताना सपकाळ यांनी भाजपवर गंभीर आरोप करत तीव्र टीका केली आहे. काँग्रेस हा संविधाननिष्ठ पक्ष असून हिंसेवर आमचा विश्वास नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्षपदाची वर्षपूर्ती निमित्त पुणे शहर काँग्रेसतर्फे सपकाळ यांचा सत्कार करण्यात आला. त्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अभय छाजेड, रमेश बागवे, मोहन जोशी तसेच महापालिकेतील गटनेते चंद्रकांत कदम आणि आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले “लोकशाहीत आंदोलन करणे योग्य आहे; मात्र संवाद व चर्चा होणे आवश्यक आहे. अंगावर आल्यास शिंगावर घेण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, परंतु हिंसेचे आम्ही समर्थन बोलताना सकपाळ यांनी करत नाही.” पुणे महापालिकेतील निकालाविषयी सांगितले की, अपेक्षित यश मिळाले नसले तरी निवडून आलेले नगरसेवक पुणेकरांच्या प्रश्नांवर ठामपणे कार्य करतील. गेली चार वर्षे महापालिकेवर प्रशासक कारभार होता; त्या काळातील कथित भ्रष्टाचार उघडकीस आणला जाईल. वाहतूक, पाणीपुरवठा व स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर काँग्रेस रस्त्यावर उतरून आवाज उठवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय; भव्य ‘अजितसृष्टी’ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
काँग्रेस (Congress) भवन परिसरात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेस कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. भवनात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येत होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा बंदोबस्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, सपकाळ यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सपकाळ यानी पोलीस बंदोबस्तावर बेट प्रश्न उपस्थित केला. “आज ज्या पद्धतीने बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, तसाच बंदोबस्त त्या दिवशी ठेवला असता तर परिस्थिती वेगळी असती, त्यावेळी कोणाचा दबाव होता, याचा खुलासा झाला पहिजे. काही अधिकारी बेजबाबदारपणे करी वागले, याची चौकशी झाली पाहिजे” अशी मागणी त्यांनी केली. राज्यातील पोलीस यंत्रणा कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का, हे स्पष्ट झाले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर रविवारीची पत्रकार परिषद आणि त्यासाठी उभारलेला बंदोबस्त चचेचा विषय ठरला..