Shivsena Uddhav Thackeray press conference live in mumbai on waqf amendment bill
Uddhav Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना यूबीटीने बंडखोरांवर मोठी कारवाई केली आहे. बंडखोरांवर कारवाई करताना उद्धव ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवायांमुळे पाच नेत्यांची हकालपट्टी केली आहे. यामध्ये भिवंडीचे माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगुल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे यांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल (4 नोव्हेंबर) शेवटचा दिवस होता. महाविका आघाडीतील ज्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे, त्यांनी जर उमेदवारी अर्ज मागे घेतला तर त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.तसेच शेकापच्या जयंत पाटील यांच्याशीही चर्चा झाली असून ठरलेल्या मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले होते.
हे सुद्धा वाचा: संजय राऊत यांच्या भावाच्या विरोधात FIR दाखल,शिंदेंसेनेच्या उमेदवाराबद्दलचं वक्तव्य भोवलं!
याचरदरम्यान शिवसेनेचे भिवंडी लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रुपेश म्हात्रे यांची पक्षविरोधी कारवाईमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. रूपेश म्हात्रे यांनी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. परंतु पक्षविरोधी वक्तव्ये आणि कारवाईमुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली. मात्र त्यावेळी त्यांनी अर्ज मागे घेतला होता.
याशिवाय वणी विधानसभा जिल्हाप्रमुख विश्वास नांदेक, झरी तालुकाप्रमुख चंद्रकांत घुगुल, मारेगाव तालुकाप्रमुख संजय आवारी, यवतमाळ जिल्ह्याचे वणी तालुकाप्रमुख प्रसाद ठाकरे यांचीही पक्षविरोधी कारवायांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने दिली आहे.
हे सुद्धा वाचा: शेखर निकम यांच्या प्रचारार्थ पोफळी येथे सभा! पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत आणि इतर नेत्यांनी सोमवारी दुपारी पवारांची ‘सिल्व्हर ओक’वर शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची महत्त्वाची बैठक घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपापल्या स्तरावर प्रयत्न केले. तसेच महाविकास आघाडीकडून मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देण्यात आल्या आहेत. यामध्ये जयंत पाटील यांच्याशीही चर्चा झाली असून उरणची जागा ठरल्याप्रमाणे शिवसेना लढणार असून उर्वरित अलिबाग, पेण आणि पनवेलची जागा जयंत पाटील यांच्या शेतकरी कामगार पक्षाला दिल्याचेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले, तर बंडखोरांना अर्ज मागे घेण्यासाठी शिवसेना, काँग्रेससह राष्ट्रवादीनेही प्रयत्न केल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी एकवटलेल्या महाविकास आघाडीची ही भूमिका आहे. फक्त काही ठिकाणी समाजवादी, कम्युनिस्ट किंवा शेतकरी कामगार पक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्यातील संबंधित चर्चेची माहिती दिली.