maharashtra solapur vidhan sabha election results live updates 2024
सोलापूर : शेखर गोतसुर्वे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झाली असून अद्याप मोजणी सुरु आहे. मात्र सध्या येणाऱ्या आकडेवारीवरुन राज्यामध्ये महायुतीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र विधानसभा रणसंग्रामात सोलापूरात काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे .शहर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनी भाजपाला कौल दिला आहे .
शहर उत्तर मतदार संघात भाजपाचे विजयकुमार देशमूख हे पाचव्यांदा विजयी उंबरठ्यावर आहेत. दुपारी दोन वाजेपर्यंत विजयकुमार देशमूख यांना ३० हजारांचा लीड मिळाला आहे. शहर मध्यमध्ये भाजपाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. सुमारे ४० हजारांपर्यंतचा लीड कोठे यांनी दुपार पर्यंत मिळविला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळण्यात भाजपाला यश प्राप्त झाले आहे. सोलापूर दक्षिण मतदार संघात काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी आणि शिवसेना उबाठाचे अमर पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपाचे सुभाष देशमुख तिसऱ्यांदा आमदारकी मतदारांनी दिली आहे. दुपारपर्यंत सुभाष देशमुख यांना ४० हजारांपर्यंत मतांचा लीड मिळाला आहे .
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
मोहोळ राखीव मतदार संघात शरदपवार गटाचे राजू खरे यांना 30 हजारांचा लिड मिळाला आहे . माढा मतदार संघात शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील 30 हजार 31 मतांनी विजयी उंबरठ्यावर आहेत. तर अपक्ष उमेदवार रणजीतसिंह शिंदे, मिनल साठे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे दिग्विजय बागल यांचा पराभव निश्चीत मानला जात आहे. शरद पवार गटाचे नारायण पाटील 16 हजार 19 मतांनी विजय निश्चित मानला जात आहे. पंढरपूरात भाजपाचे समाधान आवताडे 7 हजार मतांनी पुढे आहेत. काँग्रेसचे भगीरथ भालके पिछाडीवर पडले आहेत. बार्शीत शिवसेना विरुध्द शिवसेना अशी कडवी झुंज तेथे पाहायला मिळत आहे. सांगोल्यात शेकापचे बाबासाहेब देशमुख 25 हजार 480 डॉ. बाबासाहेब देशमुख आघाडीवर आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आतापर्यंत विजयी झालेले उमेदवार (सोलापूर जिल्हा)
अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे.