कर्करोगावरील लस महाराष्ट्रातही उपलब्ध होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा
बारामती : विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. सकाळी 8 वाजल्यापासून निकाल हाती येत आहे. पहिल्या कलातील मतमोजणी पासून भाजप व महायुती आघाडीवर होते. आता जवळपास निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पक्ष समोर आला आहे. सुरुवातीला पिछाडीवर असणारे अनेक नेते आता विजयी झाल्याचे चित्र आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चा होती ती म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघाची. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पवार कुटुंबामध्ये लढत झाली. मात्र निकालामध्ये अजित पवार यांनी आपला गड राखला असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणूकीमध्ये देखील बारामती मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बारामतीमध्ये पवार कुटुंबामध्ये लढत होती. अजित पवार यांच्या विरोधात त्यांचेच पुतण्या युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांनी उमेदवारी दिली होती. सुरुवातीला पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. यामध्ये युगेंद्र पवार यांनी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर ईव्हीएम मशीनची मतमोजणी सुरु झाल्यानंतर अजित पवार यांनी आपली आघाडी कायम ठेवली. मागील अनेक वर्षांपासून अजित पवार यांनी बारामतीमध्ये आपला विजय कायम ठेवला आहे. यंदाच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये देखील अजित पवार यांना आपला विजय कायम ठेवण्यास यश आले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांना 73 हजार 025 मतं मिळाली आहे. तर शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांना 34 हजार 773 मतं मिळाली आहे. अजित पवार यांनी तब्बल 38 हजार 252 मतांनी आघाडी मिळवली आहे. अजित पवार यांचा हा विक्रमी आकडा पाहून त्यांच्या समर्थकांमध्ये एकच उत्साह दिसून येत आहे. बारामतीमध्ये निकालाच्या पूर्वी विजायचे पोस्टर झळकले होते. आता अजित पवार यांनी बारामतीचा गड राखत आपला विजय निश्चित केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
बारामतीमध्ये चुरशीची लढत झाली होती. पक्षांतर व पक्षफुटीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे ही प्रतिष्ठेची बनली होती. बारामतीच्या निकालाकडे फक्त राज्याचे नाही तर देशाचे लक्ष लागले होते. अजित पवार यांनी गावागावांमध्ये जाऊन तळागळातील मतदारांची भेट घेतली होती. तर नातवाच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघ पिंजून काढला होता. प्रचाराचा अक्षरशः धुराळा उडाला होता. त्यानंतर आता बारामतीकरांनी अजित पवार यांनाच ‘दादा’ म्हणून स्वीकारले आहे. अजित पवार यांचे मुख्यमंत्री पदाचे पोस्टर देखील बारामतीमध्ये झळकले आहेत. तसेच अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर देखील मुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांनी इच्छा बोलून दाखवली होती. आता महायुतीचे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता लागली आहे.