PM Narendra Modi: "आज हरयाणामध्ये खोट्या नरेटीव्हवर विकासाची...'; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विजयानंतर प्रतिक्रिया
नवी दिल्ली: आज हरयाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालानुसार जम्मू काश्मीरमध्ये कॉँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स कॉँग्रेस या आघाडीचे सरकार स्थापन होईल हे जवळपास स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे हरयाणामध्ये भाजपने आपला गड राखला आहे. हरयाणामध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. दरम्यान हरयाणाच्या विजयानंतर भाजपच्या दिल्ली येथील मुख्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. दरम्यान हरयाणामधील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजप मुख्यालयात दाखल झाले. यावेळेस त्यांनी हरयाणाच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचे आभार मानले.यावलेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना देखील संबोधित केले.यावेळी त्यांनी हरयाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेतील यशाबद्दल भाष्य केले.
भाजप मुख्यालयातून संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज हरयाणातील जनतेने कमाल केली आहे. तेथील लोकांनी आज पुन्हा एकदा कमळ फुलवले आहे . आज नवरात्रीचा ६ वा दिवस आहे. देवी कात्यायिनीला स्मरण करण्याचा दिवस आहे. देवी कात्यायिनीने हातामध्ये कमळ धारण केले आहे. आज हरयाणामध्ये सलग तिसऱ्यांदा कमळ फुलले आहे. हरयाणामध्ये सूशासनाचा विजय झाला आहे.”
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, “हरयाणामध्ये प्रत्येक जाती आणि धर्माच्या लोकांनी आपल्याला मत दिले आहे. जम्मू काश्मीरमध्ये देखील १० वर्षानंतर शांततेत निवडणूक पार पडली आहे. आलेले निकाल ही भारताच्या लोकशाहीचा विजय आहे. मी दोन्ही राज्यांतील विजयी उमेदवारांना शुभेच्छा देतो. तसेच मी जनतेला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे देखील आभार मानतो. आज हरयाणामध्ये खोट्या नरेटीव्हवर विकासाची गॅरंटी वरचढ ठरली आहे.”
हरयाणामध्ये भाजपने तिसऱ्यांदा सत्ता प्राप्त केली आहे. आज आलेल्या निकालानुसार भाजप हरयाणामध्ये ५० जागा जिंकून सत्ता स्थापन करणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेस आणि नॅशनल कॉँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित आघाडीमध्ये लढले आहेत. दरम्यान या राज्यात कॉँग्रेस आणि नॅशनल कॉँग्रेस आघाडीचे सरकार येताना दिसत आहे. तर हरयाणामध्ये भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.