Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : २५ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी

Maharashtra Assembly Result 2024 Live : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात मतमोजणी शांततेत पार पडावी यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 31, 2025 | 09:24 AM
राज्यात कोणाची सत्ता येणार? 4136 उमेदवारांचे ठरणार भवितव्य

राज्यात कोणाची सत्ता येणार? 4136 उमेदवारांचे ठरणार भवितव्य

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Assembly Result 2024 Live News In Marathi : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणुका पार पडल्याा आहेत. आता प्रतिक्षा आहे ती निकालाची…, महाराष्ट्रामध्ये कोणाचे सरकार येणार याचा अंदाजही एक्झिट पोलने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश एक्झिट पोलने महायुतीच्या विजयाचे भाकीत केले आहे. मात्र, एक्झिट पोलचे निकाल योग्य असतील की नाही, हे आज म्हणजेच २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र पोटनिवडणुकांचे निकालही येणार आहेत. मतमोजणीपूर्वी बैठकांची फेरी सुरू आहे. महाराष्ट्रातील निवडणूक निकालापूर्वीच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

The liveblog has ended.
  • 23 Nov 2024 06:02 PM (IST)

    23 Nov 2024 06:02 PM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : पंतप्रधान मोदींनी मानले महाराष्ट्रातील जनतेचे विशेष आभार

    विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचे विशेष आभार मानले आहेत. 'विकासाचा विजय, सुशासनाचा विजय, एकसंध आम्ही उंच जावू. एनडीएला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील भगिनी आणि बांधवांचे, विशेषतः राज्यातील तरुण आणि महिलांचे मनःपूर्वक आभार. ही आपुलकी आणि जिव्हाळा अतुलनीय आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची आघाडी कार्यरत राहील, याची मी जनतेला ग्वाही देतो. जय महाराष्ट्र!' असं मोदींनी म्हटलं आहे.

    Development wins!

    Good governance wins!

    United we will soar even higher!

    Heartfelt gratitude to my sisters and brothers of Maharashtra, especially the youth and women of the state, for a historic mandate to the NDA. This affection and warmth is unparalleled.

    I assure the…

    — Narendra Modi (@narendramodi) November 23, 2024

  • 23 Nov 2024 04:03 PM (IST)

    23 Nov 2024 04:03 PM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : २५ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी

    २५ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार असल्याची शक्यता आहे, मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप निश्चित नसलं तरी २६ नोव्हेंबरला विधानसभा बर्खास्त होणार आहे, त्यापूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाणार असल्याची माहिती आहे.

  • 23 Nov 2024 03:54 PM (IST)

    23 Nov 2024 03:54 PM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live :मानखुर्द शिवाजीनगर इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक पराभूत

    मानखुर्द शिवाजीनगर इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक पराभूत झाले आहे.

  • 23 Nov 2024 03:17 PM (IST)

    23 Nov 2024 03:17 PM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : शिवडीत बाळा नांदगावकर यांचाही पराभव

    शिवडीत महायुतीकडून मनसेचे बाळा नांदगावकर हे निवडणुकीत उभे होते. या निवडणुकीत राज ठाकरे यांनी अखेरची सभा शिवडीत घेतली होती. मात्र याठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याकडून अजय चौधरी यांनी तिसऱ्यांदा बाजी मारली आहे.

  • 23 Nov 2024 03:10 PM (IST)

    23 Nov 2024 03:10 PM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : वरळीतून आदित्य ठाकरे विजयी

    मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत.

  • 23 Nov 2024 02:59 PM (IST)

    23 Nov 2024 02:59 PM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : विक्रोळी मतदारसंघातून सुनील राऊत विजयी

    विक्रोळीत संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत निवडणूक लढवत होते. त्यांनी 15352 मतांनी विजय मिळवला आहे. सुनील राऊत यांना एकूण 65715 मतं मिळाली. शिवसेना शिंदे गटाच्या सुवर्णा कारंजे यांना 50363 आणि मनसेचे विश्वजीत ढोलम यांना 16716 मतं मिळाली.

  • 23 Nov 2024 02:34 PM (IST)

    23 Nov 2024 02:34 PM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : मनसेच इंजिन गडगडलं, माहीमध्ये अमित ठाकरे पराभूत

    माहीम मतदारसंघात मनसेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणी अमित ठाकरे यांचा पराभव झाला असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार महेश सावंत विजयी झाले आहेत.

  • 23 Nov 2024 01:28 PM (IST)

    23 Nov 2024 01:28 PM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : ठाणे शहर विधानसभेचे भाजप उमेदवार संजय केळकर यांचा विजय

    ठाणे शहर विधानसभेचे भाजप उमेदवार संजय केळकर यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू होताच शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष सुरू केला.

  • 23 Nov 2024 01:26 PM (IST)

    23 Nov 2024 01:26 PM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : हसन मुश्रीफ यांचा विजय

    राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात मुश्रीफांची डबल हॅट्रिक झाली आहे. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार समर्जित घाटगे यांचा पराभव झाला आहे.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना 23व्या फेरी अखेर 11 हजार 89 मते मिळाली आहेत.

  • 23 Nov 2024 01:06 PM (IST)

    23 Nov 2024 01:06 PM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : भाजप नेते फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर दाखल भाजप नेतृत्वातील महायुतीने विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवलाआहे. याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांचे अभिनंदन केले आहे. शिवाय आता भाजपचे नेते सागर बंगल्यावर जमण्यास सुरुवात झाली आहे.

    भाजप नेतृत्वातील महायुतीने विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवलाआहे. याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांचे अभिनंदन केले आहे. शिवाय आता भाजपचे नेते सागर बंगल्यावर जमण्यास सुरुवात झाली आहे.

  • 23 Nov 2024 12:45 PM (IST)

    23 Nov 2024 12:45 PM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : एक है तो ‘सेफ’ है ! मोदी है तो मुमकिन हैं! देवेंद्र फडणवीस यांचे सूचक ट्वीट

    विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये एक है तो ‘सेफ’ है ! मोदी है तो मुमकिन हैं ! असं म्हटलं आहे.

    एक है तो ‘सेफ’ है !
    मोदी है तो मुमकिन हैं ! #Maharashtra #महाराष्ट्र

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 23, 2024

  • 23 Nov 2024 12:42 PM (IST)

    23 Nov 2024 12:42 PM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : काय म्हणाले विनोद तावडे?

    'महाराष्ट्र च्या जनतेने महायुतीला जो प्रचंड विजय दिलाय त्याबद्दल जनतेचे आभार. हा जो विजय झलाय तो मोदींच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवार आठवले या सर्वांनी एकत्र काम केलं. विकास कामे, लाडकी बहीण सारख्या योजना यामुळेच जनतेला विश्वास बसला' असं विनोद तावडे म्हणाले. महायुतीला मिळालेल्या यशानंतर त्यांनी काही मुद्दे मांडत मविआसंदर्भात लक्षवेधी वक्तव्य केलं. 'नैसर्गिक युती पवारांनी ठाकरेंनी तोडली तो राग होता. रोज सकाळी राजकारण कलुषित करण्याचं वक्तव्य यायचं त्यामुळे बाळासाहेबांचा शिवसैनिक नाराज होता', असं ते म्हणाले.

  • 23 Nov 2024 12:41 PM (IST)

    23 Nov 2024 12:41 PM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील विजयाच्या वाटेवर

    आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून वळसे पाटील तेराशे मताधिक्याने पुढे आहेत. ते विजयाच्या वाटेवर आहे.

  • 23 Nov 2024 12:21 PM (IST)

    23 Nov 2024 12:21 PM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : चिपळूण_संगमेश्वर विधानसभा मतदार संघ

    एकूण मतदान
    १ लाख ९०,५९२
    पुरुष ९५,८१६
    महिला ९४,७७८

    १५वी फेरी

    प्रशांत बबन यादव : २९४७

    शेखर गोविंदराव निकम : ३७९०

    अनघा कांगणे : ३९

    प्रशांत भगवान यादव : ४५

    महेंद्र पवार : १०

    शेखर गंगाराम निकम : ६७

    नोटा : ८०

    पंधराव्या फेरीनंतर शेखर निकम ३४२८ मतांनी आघाडीवर

  • 23 Nov 2024 12:08 PM (IST)

    23 Nov 2024 12:08 PM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंना मोठा धक्का; चंद्रकांत पाटील आघाडीवर

    अकराव्या फेरी अखेर

    मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील 20 हजार840 मतांनी आघाडीवर

    रोहिणी खडसे पिछाडीवरचं

    एकनाथ खडसेंना मोठा धक्का....

     

  • 23 Nov 2024 11:59 AM (IST)

    23 Nov 2024 11:59 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : आतापर्यंत कोण कोण विजयी?

    राधाकृष्ण विखे पाटील विजयी

    मलबार हिल मंगलप्रभात लोढा विजयी

    रावेरमधून अमोल जावळे विजयी

    नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडणवीस विजयी

    वडाळ्यातून कालिदास कोळंबकर विजयी

    जामनेरमधून गिरीश महाजन विजयी

    आदिती तटकरे विजयी

  • 23 Nov 2024 11:54 AM (IST)

    23 Nov 2024 11:54 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : कणकवलीमधून नितेश राणे विजयी

    कणकवलीमधून नितेश राणे विजयी

  • 23 Nov 2024 11:52 AM (IST)

    23 Nov 2024 11:52 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : मंगलप्रभात लोढा यांची विजयकडे वाटचाल

    मलबारहिल मधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल. १७व्या फेरीअंती मंगल प्रभात लोढा यांना ५५,५५० मतांचं मताधिक्य मंगल प्रभात लोढा यांना ८४,८९७ मतं तर ठाकरे गटाच्या भैरुलाल चौधरी यांना २९,३४७ मत मिळाली आहेत.

  • 23 Nov 2024 11:36 AM (IST)

    23 Nov 2024 11:36 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : चिपळूण विधानसभा १३ वी फेरी, शेखर निकम ३३ ने आघाडीवर

    प्रशांत यादव (शरद पवार राष्ट्रवादी) - २९८२

    शेखर निकम (अजित पवार राष्ट्रवादी) - ३९५२

    अनघा कांगणे अपक्ष - ४६

    प्रशांत भगवान यादव अपक्ष - ३७

    महेंद्र पवार अपक्ष - २६

    शेखर गंगाराम निकम - ९३

    नोटा - ११५

    तेराव्या फेरी अखेर शेखर निकम ३३ ने आघाडीवर

  • 23 Nov 2024 11:33 AM (IST)

    23 Nov 2024 11:33 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : रावेरमध्ये भाजपचे अमोल जावळे विजयी

    रावेरमध्ये भाजपचे अमोल जावळे विजयी

  • 23 Nov 2024 11:32 AM (IST)

    23 Nov 2024 11:32 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : देवेंद्र फडणवीस विजयी

    भाजपचे  देवेंद्र फडणवीस विजयी

  • 23 Nov 2024 11:28 AM (IST)

    23 Nov 2024 11:28 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : जामनेरमधून भाजपचे गिरीश महाजन विजयी

    जामनेरमधून भाजपचे गिरीश महाजन विजयी

  • 23 Nov 2024 11:28 AM (IST)

    23 Nov 2024 11:28 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : वडाळ्यात कालिदास कोळंबकर विजयी

    वडाळ्यात कालिदास कोळंबकर विजयी

  • 23 Nov 2024 11:25 AM (IST)

    23 Nov 2024 11:25 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे विजयी

    राष्ट्रवादीच्या आदिती तटकर विजयी, विरुद्ध शरद पवार गटातील अनिल नवगणे यांचा पराभव

  • 23 Nov 2024 11:23 AM (IST)

    23 Nov 2024 11:23 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : नवव्या फेरीत भाजप आघाडीवर

    रविशेठ पाटील(भाजप) ... ५३८७(एकुण मते ४५२८४)
    अतुल म्हात्रे(शेकाप) ....७१३(एकूण मते १३७०८)
    प्रसाद भोईर(शिवसेना उबाठा) ...१७४४.(एकूण मते १६८३९)
    रवीशेठ पाटील(भाजप) मतांनी आघाडीवर २८४४५

  • 23 Nov 2024 11:11 AM (IST)

    23 Nov 2024 11:11 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : धुळे विधानसभा आमदार काशिराम पावरा 3992 मतांची आघाडी

    शिरपूर : आठवी फेरी अखेर महायुतीचे उमेदवार आमदार काशिराम पावरा 3992 मतांची आघाडी
    एकूण 42184 मतांची आघाडी

  • 23 Nov 2024 11:09 AM (IST)

    23 Nov 2024 11:09 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : भिवंडी पूर्व पाचव्या फेरीत समाजवादी पक्ष रईस शेख आघाडीवर

    संतोष शेट्टी - 9084

    रईस शेख - 30651

    रईस शेख 21567 मतांनी आघाडीवर

  • 23 Nov 2024 11:08 AM (IST)

    23 Nov 2024 11:08 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : भाजपचा राज्यभरात जल्लोष सुरु

    निवडणूक निकालाच्या कलांमध्ये महायुतीला २०० हून अधिक जागांवर आघाडी मिळाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.

  • 23 Nov 2024 10:40 AM (IST)

    23 Nov 2024 10:40 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून शिवसेना शिंदे गट आघाडीवर

    शिवसेना शिंदे गट - शांताराम मोरे 52111

    शिवसेना उ बा ठा - महादेव घाटाळ - 29502

    22609 मतांनी शिवसेना शिंदे गटाचे शांताराम मोरे आघाडीवर

  • 23 Nov 2024 10:37 AM (IST)

    23 Nov 2024 10:37 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : संजय राऊतांचे खळबळजनक विधान

    आम्हाला लोकसभा निवडणुकीचे निकालही मान्य नव्हते. आता विधानसभेचे निकालही मान्य नाहीत. हा जनतेने दिलेला कौल नाही.

  • 23 Nov 2024 10:36 AM (IST)

    23 Nov 2024 10:36 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : देवेंद्र फडणवीस तिसऱ्या फेरीअखेर 6811 मतांनी आघाडीवर

    देवेंद्र फडणवीस तिसऱ्या फेरीअखेर 6811 मतांनी आघाडीवर

  • 23 Nov 2024 10:20 AM (IST)

    23 Nov 2024 10:20 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे तिसऱ्या फेरीअखेर 398 मतांनी आघाडीवर

    आदित्य ठाकरे तिसऱ्या फेरीअखेर 398 मतांनी आघाडीवर

  • 23 Nov 2024 10:17 AM (IST)

    23 Nov 2024 10:17 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : कणकवली मतदारसंघात नितेश राणे आघाडीवर

    १) भाजप नितेश राणे -२२१७६

    २) ठाकरे गट संदेश पारकर -१०२९१

    आघाडी नितेश राणे यांना - ११८८७

    ३) चंद्रकांत जाधव - १३५

    ४) गणेश माने -१६६

    ५) बंदेनवाझ खानी-१००

    ६) संदेश परकर -१७४

    ७) नोटा -१८०

    एकूण मतमोजणी -३३ हजार २२४

    झालेले मतदान -एक लाख ६१ हजार ११७

  • 23 Nov 2024 10:14 AM (IST)

    23 Nov 2024 10:14 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : ठाण्यात भाजपचे संजय केळकर 9 हजार मतांनी आघाडीवर

    ठाण्यात भाजपचे संजय केळकर 9 हजार मतांनी आघाडीवर ,तर संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात पिछाडीवर

  • 23 Nov 2024 10:08 AM (IST)

    23 Nov 2024 10:08 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : दुसऱ्या फेरीत ऐरोली विधानसभा गणेश नाईक आघाडीवर

    गणेश नाईक -भाजप 4567
    निलेश बाणखेले मनसे 232
    एम के मढवी उबाठा 675
    अंकुश कदम स्वराज्य 28
    विजय चौगुले अपक्ष 2520

  • 23 Nov 2024 10:03 AM (IST)

    23 Nov 2024 10:03 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : महायुती 212 जागांवर पुढे

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 200 चा टप्पा ओलांडला आहे. महायुती सध्या 210 जागांवर आघाडीवर आहे. तर MVA 67 जागांवर पुढे आहे. इतर 11 जागांवर ते पुढे आहेत.

  • 23 Nov 2024 10:01 AM (IST)

    23 Nov 2024 10:01 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : पहिल्या 6 फेरी अंती भाजपचे राजेश पाडवी 7822 पक्षांचे आघाडीवर

    एकून झालेल मतदान - 59364
    पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.
    राजेश पाडवी (भाजपा) - 32940
    राजेंद्र गावित ( कॉग्रेस ) - 25118
    गोपाल भंडारी ( अपक्ष) - 576
    नोटा - 730

  • 23 Nov 2024 09:50 AM (IST)

    23 Nov 2024 09:50 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरी अखेर

    अमर पाटील 1801
    सुभाष देशमुख 5498
    धर्मराज काडादी 1079
    एकुण पहिल्या फेरी अखेर सुभाष देशमुख 3697 मताने आघाडीवर आहेत

  • 23 Nov 2024 09:34 AM (IST)

    23 Nov 2024 09:34 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : बच्चू कडू, नवाब मलिक अन् छगन भुजबळ पिछाडीवर

    विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सुरुवातीचा कल समोर येत आहे. यंदाची निवडणूक ही चुरशीची आणि प्रतिष्ठेची आहे. पहिल्या टप्प्यातील मतमोजणी सुरु असून अनेक बडे नेते हे आघाडीवर आहेत. सध्या महायुतीचे व अजित पवार गटाचे महत्त्वपूर्ण नेते छगन भुजबळ हे पिछाडीवर आहेत. येवला मतदारसंघामधून छगन भुजबळ हे 115 मतांनी पिछाडीवर आहेत. त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील हे देखील सुधारित पिछाडीवर आहे. बच्चू कडू हे देखील पिछाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 09:14 AM (IST)

    23 Nov 2024 09:14 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : वरळीमध्ये आदित्य ठाकरे आघाडीवर

    वरळी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे आघाडीवर असल्याचे दिसत आहे. सध्या आदित्य ठाकरे 308 मतांनी आघाडीवर आहेत. वरळीमधून निवडणूक लढवण्याची ही आदित्य ठाकरे यांची दुसरी वेळ आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे बाजी मारणार का याची उत्सुकता लागली आहे.

  • 23 Nov 2024 09:10 AM (IST)

    23 Nov 2024 09:10 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : मनसे पक्षाची तीन जागांवर आघाडी

    विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी होत आहे. मतमोजणीच्या पहिल्याच कलात मनसे गड राखताना दिसत आहे. मनसे एकूण तीन जागांवर आघाडीवर आहे. यात माहीम या मतदारसंघाचाही समावेश आहे. माहीम या जागेवर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. पहिल्या कलात माहीममधून अमित ठाकरे आघाडीवर आहेत. यासह इतरही दोन जागांवर मनसे पक्षाचे उमेदवार अघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 09:08 AM (IST)

    23 Nov 2024 09:08 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : पंढरपूरमध्ये भाजपच पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर

    ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाली आहे.  पंढरपूरमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे. पंढरपूरमध्ये पहिल्या फेरीत भाजपाचे समाधान आवताडे पंधराशे मताने आघाडीवर आहेत. त्याबरोबर दक्षिण सोलापूर भाजपाचे सुभाष देशमूख १५०० मतांनी आघाडीवर आहेत. माढयात अपक्ष रणजितसिंह शिंदे ३०० मतांनी आघाडीवर आहे.

  • 23 Nov 2024 08:58 AM (IST)

    23 Nov 2024 08:58 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : कसब्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी घेतली आघाडी

    कसबा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे नेते हेमंत रासने विरुद्ध महाविकास आघाडीचे नेते रवींद्र धंगेकर अशी चुरशीची लढत होत आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून सध्या रवींद्र धंगेकर हे आघाडीवर आहेत. हेमंत रासने हे सध्या पिछाडीवर असून पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये कोण बाजी मारणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

  • 23 Nov 2024 08:53 AM (IST)

    23 Nov 2024 08:53 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : अजित पवार बारामतीमध्ये आघाडीवर

    बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पवार कुटुंबामध्ये लढत होत आहे. पहिल्या पोस्टल मतमोजणीमध्ये शरद पवार गटाचे युगेंद्र पवार हे आघाडीवर होते. पण आता ईव्हीएम मशीनचे मतमोजणी सुरु झाली असून अजित पवार यांनी आता बाजी मारली आहे. बारामतीमध्ये सध्या अजित पवार हे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता बारामतीचा गड कोण राखणार याची उत्सुकता लागली आहे.

  • 23 Nov 2024 08:46 AM (IST)

    23 Nov 2024 08:46 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : पहिल्याच निवडणुकीमध्ये अमित ठाकरेंची आघाडी

    माहिम विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली. या चुरशीच्या लढतीमध्ये सदा सरवणकर यांच्यासमोर पहिल्यांदा निवडणूक लढवत असलेल्या अमित ठाकरे यांचे आव्हान होते. आता मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यामध्ये अमित ठाकरे यांनी बाजी मारली आहे. नवीन नेतृत्व म्हणून अमित ठाकरे सध्या समोर येत असून ते सध्या आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:42 AM (IST)

    23 Nov 2024 08:42 AM (IST)

    बारामतीमध्ये युगेंद्र पवार आघाडीवर

    बारामतीमध्ये अजित पवार व युगेंद्र पवार यांच्यामध्ये प्रतिष्ठेची लढत झाली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिले कल समोर येत आहे.  यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये युगेंद्र पवार यांनी बाजी मारली आहे. अजित पवार यांना धक्का बसला असून यामुळे सर्वांची धाकधुक वाढली आहे. पोस्टल मतदानामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार व पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात असलेले युगेंद्र पवार हे सध्या आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:27 AM (IST)

    23 Nov 2024 08:27 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : सोलापूर दक्षिणमधून भाजपचे सुभाष देशमुख आघाडीवर

    बार्शीत शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र राऊत पोस्टल मतात आघाडीवर आहेत. तर उद्धव ठाकरे गटाचे दिलीप सोपल पिछाडीवर आहेत. तसेच दक्षिण सोलापूर भाजपचे सुभाष देशमुख पोस्टल मतात आघाडीवर आहेत. तर उबाठा गटाचे अमर पाटील पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.

  • 23 Nov 2024 08:23 AM (IST)

    23 Nov 2024 08:23 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : पंढरपूरात काँग्रेसचे भगीरथ भालके आघाडीवर

    पंढरपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे भगीरथ भालके हे सध्या आघाडीवर आहेत. भाजपचे समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनिल सावंत पिछाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:15 AM (IST)

    23 Nov 2024 08:15 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : टपाल मतमोजणीला सुरुवात; कलही येत आहेत समोर

    राज्यात टपाल मतमोजणीला सकाळी आठपासून सुरुवात झाली आहे. आता या निवडणुकीचे कलही समोर यायला सुरुवात झाली आहे. कोथरूडमधून चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत. तर संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार हे त्यांच्या मतदारसंघातून आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

  • 23 Nov 2024 08:03 AM (IST)

    23 Nov 2024 08:03 AM (IST)

    Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : वरळीत आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा यांच्यात प्रमुख लढत

    महाराष्ट्रातील वरळी विधानसभा मतदारसंघातील लढतही रंजक असणार आहे. या जागेवर उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आहेत. त्यांच्याविरोधात मिलिंद देवरा हे आहेत. मागच्या वेळीही आदित्य ठाकरे येथून निवडून आले होते. मात्र, यावेळी ही लढत चुरशीची होणार आहे.

Web Title: Result 2024 maharashtra vidhan sabha chunav parinam assembly election results live winning candidates updates in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 12:04 AM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.