Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या ऋतूचक्राचा लपंडाव पाहायला मिळत आहे. पहाटे अंगाला झोंबणारा गारवा आणि दुपारी घामाच्या धारा काढणारे ऊन, अशा विचित्र हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 17, 2026 | 01:19 PM
बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Follow Us
Follow Us:
  • बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार
  • कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी
  • आरोग्यावर परिणाम, दवाखाने फुल्ल!
पिंपरी/विजया गिरमे : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या ऋतूचक्राचा लपंडाव पाहायला मिळत आहे. पहाटे अंगाला झोंबणारा गारवा आणि दुपारी घामाच्या धारा काढणारे ऊन, अशा विचित्र हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत. फेब्रुवारी महिना सुरू होताच थंडीने काढता पाय घ्यायला सुरुवात केली असली, तरी तापमानातील या मोठ्या चढ-उतारामुळे शहरवासीयांच्या आरोग्यावर मात्र टांगती तलवार निर्माण झाली आहे.

 

हवामानाचा लपंडाव

डिसेंबर २०२५ हा महिना पिंपरी-चिंचवडसाठी गेल्या दशकभरातील सर्वात थंड महिना ठरला होता. मात्र, जानेवारीच्या अखेरपासून हवामानात वेगाने बदल झाले आहेत.

दुपारचा तडाखा

फेब्रुवारीत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे दुपारी उन्हाचे चटके आणि उकाडा जाणवत आहे.

रात्रीचा गारवा

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे रात्री आणि पहाटे अद्यापही आल्हाददायक थंडी टिकून आहे.

काय आहे कारण?

दिवसा कोरडी आणि उष्ण हवा, तर रात्री दमट वातावरण निर्माण होत असल्याने तापमानात मोठी तफावत जाणवत आहे.

आरोग्यावर परिणाम: दवाखाने फुल्ल!

हवामानातील या टोकाच्या बदलांशी जुळवून घेणे मानवी शरीराला कठीण जात आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होत असून, शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.

सध्या सर्दी, खोकला, ताप आणि घसादुखीच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काही रुग्णांना श्वसनाचा त्रासही जाणवत आहे. वातावरण बदलामुळे विषाणूजन्य संसर्गाचा धोका वाढला आहे. – डॉ. अशोक मोरे, जनरल फिजिशियन

स्वतःची काळजी कशी घ्याल?

बदलत्या हवामानात सुरक्षित राहण्यासाठी तज्ज्ञांनी खालील उपाय सुचवले आहेत:

त्वरीत उपचार : सर्दी, खोकला किंवा ताप जाणवल्यास घरगुती उपाय करण्याऐवजी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मास्कचा वापर : गर्दीच्या ठिकाणी वावरताना मास्क वापरावा, ज्यामुळे संसर्ग पसरण्यास प्रतिबंध होईल.

विश्रांती महत्त्वाची : लक्षणे असल्यास शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला जाणे टाळावे, जेणेकरून इतरांना संसर्ग होणार नाही.

स्वच्छता पाळा : वारंवार हात धुवावेत आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे.

आहार आणि पाणी : भरपूर पाणी प्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा ताजा आहार घ्या.

थोडक्यात सांगायचे तर…

हिवाळा आता निरोप घेण्याच्या तयारीत आहे आणि उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. या ‘ट्रान्झिशन फेज’मध्ये हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडणे आणि आरोग्याची काळजी घेणे पिंपरी चिंचवडकरांसाठी हितकारक ठरेल.

Web Title: Changing weather is affecting the health of citizens in pimpri chinchwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pimpri Chinchwad
  • Pune Weather
  • summer heat

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा; 50 एकर जागा मंजूर; परेड ग्राऊंडसह प्रशासकीय संकुल उभारणार
2

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा; 50 एकर जागा मंजूर; परेड ग्राऊंडसह प्रशासकीय संकुल उभारणार

पुणेकरांनो सावधान ! पुढील तीन दिवस पावसाचा रेड अलर्ट; मुसळधार ते अतिवृष्टीसदृश पावसाचा अंदाज
3

पुणेकरांनो सावधान ! पुढील तीन दिवस पावसाचा रेड अलर्ट; मुसळधार ते अतिवृष्टीसदृश पावसाचा अंदाज

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
4

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.