Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर महापाैर मंजुषा नागपुरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात आयुक्त नवल किशाेर राम यांना आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 17, 2026 | 01:22 PM
पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर
  • सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले
  • आयुक्तांना आढावा बैठक घेण्याचे दिले निर्देश
पुणे : पुणे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर महापाैर मंजुषा नागपुरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात आयुक्त नवल किशाेर राम यांना आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. साेमवारी नागपुरे यांनी महापालिका भवनातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर त्यांनी सुधारणा करण्यास सांगितले. महापौर मंजुषा नागपुरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कडक भूमिका घेतली आहे.

 

सोमवारी (१६ फेब्रुवारी) सकाळी महापौरांनी महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील सुरक्षा व्यवस्थेची अचानक पाहणी केली. त्यांना अनेक गंभीर सुरक्षा त्रुटी आढळल्या आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना फटकारले. या उणीवा दूर करण्यासाठी महापौर नागपुरे यांनी महापालिका आयुक्तांना तात्काळ बैठक बोलावण्याचे निर्देश दिले आहेत. महापौर मंजुषा नागपुरे यांनी सोमवारी महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी अचानक भेट दिली. त्यांच्या अनपेक्षित आगमनामुळे सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. तपासणीदरम्यान मंजुषा नागपुरे यांना इमारतीतील अनेक महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात नसल्याचे आढळून आले. हा निष्काळजीपणा पाहून महापौरांनी अधिकाऱ्यांना फटकारले आणि या महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी का तैनात केले नाहीत असा प्रश्न केला.

सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करताना महापौरांना मुख्य इमारतीच्या अनेक प्रवेशद्वारांवर आणि महत्त्वाच्या कॉरिडॉरवर सुरक्षेचा अभाव असल्याचे लक्षात आले. सुरक्षेशी संबंधित त्रुटींबाबत महापौरांनी अधिकाऱ्यांकडून उत्तरे मागितली. नागपुरे यांनी या उणीवा दूर करण्यासाठी तातडीने बैठक बोलावण्याचे निर्देशही महापालिका आयुक्तांना दिले. सुरक्षा व्यवस्थेबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे महापौरांनी स्पष्ट केले. भविष्यात अशा प्रकारची निष्काळजीपणा पुन्हा होऊ नये, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. पुणेकरांच्या सुरक्षिततेशी किंवा महानगरपालिकेच्या शिस्तीशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे नागपुरे यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर; ‘या’ प्रकरणाची प्रकरणाची चौकशी करण्याचे दिले निर्देश

नागपुरे तिसऱ्यांदा नगरसेवकपदी

भाजपच्या मंजुषा नागपुरे या तिसऱ्यांदा नगरसेवकपदी निवडून आल्या आहेत. प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिक बाग येथून त्यांनी अर्ज भरला होता. त्या सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होत्या. अशातच अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या प्रभागातील तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. मंजुषा नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ३४ मधून बिनविरोध विजयी झाल्या आहेत. मंजूषा नागपुरे या भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. महापालिकेच्या कामाच त्यांचा चांगला अनुभव आहे. स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर त्यांनी काम केलेले आहे.

Web Title: Pune mayor expresses displeasure over municipal corporations security arrangements

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी
1

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी
2

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी

पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’
3

पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप
4

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.