Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींच्या ‘या’ आवाहनामुळे बंडखोरी करणाऱ्या भाजप नेत्यांची अडचण; सासवडमध्ये नेमकं कोण जिंकणार?

आम्ही कोणत्याही परिस्थितीत शिवतारे यांचा प्रचार करणार नाही वेळ पडल्यास घरी बसू किंवा इतर तालुक्यातील भाजप उमेदवारांचा प्रचार करू असे भाजप पदाढीकऱ्यांनी स्पष्ट केले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 14, 2024 | 06:18 AM
पंतप्रधान मोदींच्या 'या' आवाहनामुळे बंडखोरी करणाऱ्या भाजप नेत्यांची अडचण; सासवडमध्ये नेमकं कोण जिंकणार?

पंतप्रधान मोदींच्या 'या' आवाहनामुळे बंडखोरी करणाऱ्या भाजप नेत्यांची अडचण; सासवडमध्ये नेमकं कोण जिंकणार?

Follow Us
Close
Follow Us:

सासवड: काल पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा पार पडली. यावेळी त्यांनी महायुतीच्या पुण्यातील सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला दिवसेंदिवस चांगलाच रंग चढत आहे. पुरंदरमधील महायुतीचे उमेदवार माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी यावेळी परिवर्तन घडविण्याचा जोरदार चंग बांधला आहे. यासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबवीत आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत पुरंदरचे महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांना निवडून देण्याचे जाहीर आवाहन केले आहे. विशेष म्हणजे सासवडमधील भाजपच्या काही नेत्यांनी मात्र शिवतारे यांना पाठींबा देणार नसल्याचे दोन दिवसापूर्वीच जाहीर केले. त्यानंतर लगेचच पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय शिवतारे यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार अडचणीत येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सासवडमधील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांच्या अडचणी यामुळे नक्की वाढणार अशी चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सासवडला झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात विजय शिवतारे हेच उमेदवार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या काळात काही कारणांमुळे शिवतारे यांची उमेदवारी जाहीर करण्यास वेळ लागला, मात्र शिवतारे हेच अधिकृत उमेदवार असल्याचे महायुतीतील शिवसेना तसेच भाजपच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात आले आहे. एवढेच काय पण सध्या पुरंदरमध्ये शिवतारे यांच्या सोबत शिवसेनेतील सर्व नेत्यांसह भाजपचे माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, पुरंदर हवेली समन्वयक बाबाराजे जाधवराव, भाजप तालुका अध्यक्ष निलेश जगताप, भानुकाका जगताप, सासवड शहरप्रमुख साकेत जगताप यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवतारे यांच्या प्रचारात अहोरात्र झटत आहेत.

हेही वाचा: “आमच्या वारकऱ्यांसाठी ही आमची…”; पालखी मार्गाबाबत पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महत्वाचे विधान

मात्र असे असताना आम्हाला शिवतारे विचारीत सुद्धा नाहीत असा आरोप करीत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेवून शिवतारे यांच्यावर जोरदार शरसंधान साधले. आम्ही कोणत्याही परिस्थितीत शिवतारे यांचा प्रचार करणार नाही वेळ पडल्यास घरी बसू किंवा इतर तालुक्यातील भाजप उमेदवारांचा प्रचार करू असे जाहीर केले. पत्रकार परिषद झाल्यानंतर सोशेल मिडिया आणि वृत्तपत्रांनी दखल घेतली असली तरी खुद्द शिवतारे यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली दिसून येत नाही. एवढेच नाही तर भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्याने त्यांची समजूत घातल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे सध्या निवडणूक कालावधी असल्याने कोणतीही प्रतिक्रिया न देता वेळ मारून नेण्यात येत असून निवडणूक निकाल झाल्यानंतर भाजपकडून कारवाई होण्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीचा अधिकृत उमेदवार असताना प्रचारात सहभागी न होता पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या नेत्यांना निवडणुकीनंतर मात्र दणका बसण्याची शक्यता माहितीगार सूत्रांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: पुण्याला “कनेक्टीव्हिटी” शहर बनवणार..! प्रचारसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले वचन 

‘मतभेद बाजूला ठेवून प्रयत्न सुरु’

विजय शिवतारे हे पुरंदर मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. आम्हाला पक्षाकडून शिवतारे यांचा प्रचार करणे आणि त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा सक्त सूचना आहेत. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार असून राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणायचे आहे. त्यासाठी आमच्यातील काही मतभेद असतील तर बाजूला ठेवून प्रत्येक उमेदवार निवडून कसा येईल यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे महायुतीचा एकही व्यक्ती पक्षविरोधी काम करणार नाही. जे चुकीचे काम करतील त्यांच्याबाबत निवडणुकीनंतर पक्षनेते योग्य ते निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली आहे.

 

Web Title: Saswad bjp leader problem after pm narendra appeal to elect vijay shivtare in maharashtra election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Assembly election 2024
  • PM Narendra Modi
  • vijay shivtare

संबंधित बातम्या

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक
1

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप
2

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
3

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
4

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.