Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Housing Project: मूळ मुंबईकरांना मुंबईतच हक्काची घरे मिळणार! बीडीडी चाळ पुनर्विकासातील ५५७ रहिवाशांना सदनिकांचे वाटप

Mumbai Housing Project: मुंबईतील मूळ रहिवाशांना मुंबईतच हक्काची घरे मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५७ पात्र रहिवाशांना हक्काच्या सदनिकांचे वितरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील तीन पुनर्वसन इमारतींमधील सदनिकांचे वितरण करण्यात येत..

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 06, 2026 | 06:11 PM
मूळ मुंबईकरांना मुंबईतच हक्काची घरे मिळणार! बीडीडी चाळ पुनर्विकासातील ५५७ रहिवाशांना सदनिकांचे वाटप

मूळ मुंबईकरांना मुंबईतच हक्काची घरे मिळणार! बीडीडी चाळ पुनर्विकासातील ५५७ रहिवाशांना सदनिकांचे वाटप

Follow Us
Follow Us:
  • ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकासातील ५५७ पात्र रहिवाशांना हक्काच्या सदनिका*
  • पहिल्या टप्प्यातील तीन पुनर्वसन इमारतींमधील सदनिकांचे वितरण*
  • बीडीडी चाळीतील रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरुपात चावी वाटप*
Mumbai Housing Project: बीडीडी चाळींसह विविध पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून मूळ मुंबईकर आणि दीर्घकाळापासून शहरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना त्याच ठिकाणी मोठे, प्रशस्त व हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन काम करत आहे. मुंबईची संस्कृती जपणाऱ्यांना घर दिल्याचं समाधान असून मूळ मुंबईकरांना मुंबईतून हद्दपार होऊ देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Mumbai Housing Project)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या तीन पुनर्वसन इमारतींमधील ५५७ पात्र रहिवाशांना सदनिकांचे चावी वितरण करण्यात आले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात अकरा रहिवाशांना चावी व ताबा पत्राचे वाटप करण्यात आले.

MHADA Lottery 2026 : तीन वेळा मुदतवाढ देण्याची वेळ का आली? म्हाडाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

घरे देताना नफा मिळविणे हा शासनाचा उद्देश….

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बीडीडी चाळींचा पुनर्विकास खासगी विकासकांऐवजी म्हाडामार्फत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे आशियातील नागरी पुनरुत्थानाचा हा सर्वांत मोठा प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे. मुंबईची संस्कृती जपणाऱ्या चाळकऱ्यांना दर्जेदार घरे देताना नफा मिळविणे हा शासनाचा उद्देश नसून, अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य आहे. बीडीडी चाळीने अनेक बदल पाहिले असून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तसेच मुंबईतील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि कामगार चळवळींचा इतिहास अनुभवला आहे. बीडीडी चाळीला ऐतिहासिक वारसा असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळकांचे वास्तव्य या चाळीत होते.

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. या प्रकल्पासाठी अनेक विकासकांकडून प्रस्ताव येत असले, तरी व्यापक स्वरूपाच्या या पुनर्विकासात येणाऱ्या अडचणींमुळे कामाला अपेक्षित गती मिळत नव्हती. केवळ खासगी विकासकांवर अवलंबून राहून हा प्रकल्प पूर्ण होणे कठीण असल्याचे लक्षात घेऊन म्हाडालाच विकासक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर २०१७-१८ पासून पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात झाली. मधल्या काळात काही अडथळे आले असले, तरी प्रकल्पाच्या कामात खंड पडू न देता त्याला पुन्हा गती देण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

बीडीडी चाळींमध्ये अनेक कुटुंबे सुमारे १६० चौरस फुटांच्या, मूलभूत सुविधांचा अभाव असलेल्या घरांमध्ये दोन ते तीन पिढ्यांसह राहत होती. या रहिवाशांना सर्व सुविधांनी युक्त ५०० चौरस फुटांची घरे उपलब्ध करून देण्याची भूमिका शासनाने स्वीकारली आहे. नव्या सदनिकांमध्ये बैठक खोली, दोन शयनकक्ष आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, रहिवाशांच्या कुटुंबांच्या पुढील पिढ्यांसाठीही ही घरे भक्कम आधार ठरतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बीडीडी चाळींमध्ये दीर्घकाळ वास्तव्य करणाऱ्या २०११ पूर्वीच्या पात्र पोलीस कर्मचाऱ्यांना १५ लाख रुपयांत घरे देण्याचा निर्णय कायम आहे. २०११ नंतरच्या कटऑफमुळे पात्र न ठरणाऱ्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनाही विशेष प्रकरण म्हणून बांधकाम खर्चात घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीदरम्यान निर्माण झालेल्या किमतीशी संबंधित तफावती आणि अडचणी दूर करण्यासाठी बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

नवीन घरांची विक्री करू नका, पुढील पिढीसाठी जतन करा

नव्या घरांच्या चाव्या मिळाल्यानंतर रहिवाशांनी ही घरे आपल्या कुटुंबाची संपत्ती समजून जपावीत. रहिवाशांनी नव्या घरांकडे कुटुंबाचे पिढ्यान्‌पिढ्यांचे वैभव म्हणून पाहावे. चांगली किंमत मिळत असली तरी घरांची विक्री न करता पुढील दोन-तीन पिढ्यांसाठी हा वारसा जतन करावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

Mhada: सोडतीत घर जिंकलं, पण प्रत्यक्ष ताब्यासाठी संघर्ष; मात्र लोकशाही दिनातून अर्जदाराला…

💡

Frequently Asked Questions

  • Que: बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील किती रहिवाशांना घरे मिळणार आहेत?

    Ans: ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५७ पात्र रहिवाशांना हक्काच्या सदनिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

  • Que: कोणत्या इमारतींमधील सदनिकांचे वितरण करण्यात येणार आहे?

    Ans: पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील तीन पुनर्वसन इमारतींमधील सदनिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

  • Que: बीडीडी चाळ रहिवाशांना घरांच्या चाव्या कोण देणार आहेत?

    Ans: बीडीडी चाळीतील रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूळ मुंबईकरांना मुंबईतच घरे मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Web Title: Mumbai bdd chawl redevelopment 557 residents get new homes devendra fadnavis sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnavis
  • Mumbai

संबंधित बातम्या

Ulhasnagar Metro Project: मेट्रोचे श्रेय भाजपचे की शिवसेनेचे? शहाड ब्रिजवरूनही राजकीय संघर्ष; कुमार आयलानी विरुद्ध कमलेश निकम
1

Ulhasnagar Metro Project: मेट्रोचे श्रेय भाजपचे की शिवसेनेचे? शहाड ब्रिजवरूनही राजकीय संघर्ष; कुमार आयलानी विरुद्ध कमलेश निकम

Raj Thackeray: ‘…स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील’, गोकुळवरून राज ठाकरेंची खोचक टीका; भाजपला सुनावले
2

Raj Thackeray: ‘…स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील’, गोकुळवरून राज ठाकरेंची खोचक टीका; भाजपला सुनावले

BJP Mira Bhayandar: मिरा-भाईंदरमध्ये क्लस्टर योजनेवरून भाजपची भूमिका बदलली? आधी विरोध, आता श्रेयासाठी नेत्यांमध्ये चढाओढ!
3

BJP Mira Bhayandar: मिरा-भाईंदरमध्ये क्लस्टर योजनेवरून भाजपची भूमिका बदलली? आधी विरोध, आता श्रेयासाठी नेत्यांमध्ये चढाओढ!

Mahayuti Internal Politics: मुख्यमंत्री फडणवीसांचा दादा भुसेंना झटका; शालेय शिक्षण विभागातील निर्णय थेट सनदी अधिकाऱ्यांकडे
4

Mahayuti Internal Politics: मुख्यमंत्री फडणवीसांचा दादा भुसेंना झटका; शालेय शिक्षण विभागातील निर्णय थेट सनदी अधिकाऱ्यांकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.