संगमनेरमध्ये शिवसेनेची ताकद आणखी वाढली; अनेक तरुणांनी केला पक्षात प्रवेश
बीड : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेतेमंडळींकडून पक्ष बदलले जात आहेत. असे असताना आता बीडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ही केला आहे.
हेदेखील वाचा : काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच…! फडणवीस अन् गडकरींची बॅग चेकिंग; विरोधकांना सुनावले खडेबोल
बीडमधील अठरा पगड जाती धर्मातील जनसमुदाय माझ्याजवळ येऊन वारंवार दुःख व्यक्त करतो की, सातत्याने शिवसेनेकडून अन्याय तुमच्यावर होतो तरी तुम्ही का हा अन्याय सहन करता? पण आता बास…मी वैतागलोय या अन्यायाला. आता सहन होत नाही. त्यामुळे मी आणि माझे सर्व सहकारी-पदाधिकारी शिवसेनेला कायमचा ‘जय महाराष्ट्र’ ठोकून माझ्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत आहोत, असे अनिल जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.
तसेच मागील 40 वर्षांपासून मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने शिवसेनेत सक्रिय असून, शिवसेनेच्या माध्यमातून मी जनसेवा करत आलो आहे. सर्वसामान्यांचे समस्या अडचणी सोडवत आलो आहे. मात्र, वारंवार शिवसेनेने माझ्यावर अन्याय करत मला डावलले आहे. जेव्हाही विधानसभा निवडणुकीची तयारी केली तेव्हा तेव्हा मला सोडून उमेदवारीची माळ दुसऱ्याच्या गळ्यात घालण्यात आली, असे म्हणत त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवली.
मनोज जरांगे हाच माझा पक्ष
‘यापुढे मला मानणारी सर्व जाती धर्मातील जनताच माझी नेता आणि मनोज जरांगे हाच पक्ष आहे. बीड विधानसभेचा अपक्ष उमेदवार असून, माझा विजय निश्चित होणार आहे आणि मी विजयी झाल्यानंतर कोणत्याच पक्षात जाणार नाही व कोणत्याच पक्षातील नेत्याला मानणार नाही’, असेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत माहिती
अनिल जगताप यांनी 12 नोव्हेंबर रोजी आपल्या कार्यलयात पत्रकार परिषद घेत शिवसेनेकडून झालेल्या अन्यायाला वैतागून आपल्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला. बीड शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामा दिल्याचे अनिल जगताप यांनी स्पष्ट केले.
हेदेखील वाचा : Amravati Politics: महायुतीचा प्रचार सुरूच; नवनीत राणांनी धुडकावला अजित पवार,मुख्यमंत्र्यांचा इशारा
काँग्रेसकडून 28 बंडखोरांचे निलंबन
तर दुसरीकडे, महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी सर्व 288 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्याआधी महाविकास आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेसने बंडखोर उमेदवारांवर मोठी कारवाई केली आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्र युनिटने रविवारी 28 बंडखोर उमेदवारांना ‘पक्षविरोधी’ कारवाईसाठी सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. त्यामध्ये माजी मंत्री राजेंद्र मुळक (रामटेक मतदारसंघ), याज्ञवल्क्य जिचकार (काटोल), कमल व्यवहारे (कसबा), मनोज शिंदे (कोपरी पाचपाखाडी) आणि आबा बागुल (पार्वती) या प्रमुख नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.