Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले..! हेलिकॉप्टर हवेत झाले असंतुलित अन्…, VIDEO आला समोर

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव हे थोडक्यात बचावले आहेत. डॉ. मोहन यादव यांचे हेलिकॉप्टर हे हवेमध्ये असंतुलित झाले. याचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 16, 2026 | 01:03 PM
Madhya Pradesh Chief Minister Dr. Mohan Yadav's helicopter loses balance in mid-air (1)

Madhya Pradesh Chief Minister Dr. Mohan Yadav's helicopter loses balance in mid-air (1)

Follow Us
Close
Follow Us:
  • मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर असंतुलित
  • मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव हे थोडक्यात बचावले
  • काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल
 

मध्य प्रदेश : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकतेच विमान अपघातामध्ये निधन झाले. यामुळे राजकीय नेत्यांच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यामध्ये आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव (Mohan Yadav) हे थोडक्यात बचावले आहेत. डॉ. मोहन यादव यांचे हेलिकॉप्टर हे हवेमध्ये असंतुलित झाले. याचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल (Viral News) झाला आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे राज्यस्तरीय ‘लाडली बहन योजने’च्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खंडवा जिल्ह्यातील पंधना येथे पोहोचले होते. या कार्यक्रमानंतर, मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये चढले आणि पायलटने उड्डाण सुरू केले तेव्हा हेलिपॅडभोवती जमलेल्या समर्थकांनी अक्षरशः श्वास रोखून धरले होते. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की टेकऑफ दरम्यान, हेलिकॉप्टर पुढे जाण्याऐवजी अनियंत्रित झाले आणि मागे सरकू लागले. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर हे काही क्षणांसाठी जमिनीपासून काही अंतरावर थांबले.

हे देखील वाचा : सर्व शिवभक्तांची मोठी बातमी! ‘या’ दिवशी उघडणार बाबा केदारनाथ धामचे दरवाजे, जोरदार तयारी सुरु

मात्र हेलिकॉप्टर अनियंत्रित होत आहे असे वाटल्याने पायलटने ताबडतोब सतर्कता दाखवली आणि हेलिकॉप्टरचा वेग कमी केला. उड्डाणादरम्यान बरीच धूळ उडत होती, जी वेग नियंत्रित करण्यासाठी कमी करण्यात आली. काही सेकंदातच, हेलिकॉप्टर संतुलित झाले आणि सुरक्षितपणे उड्डाण केले. त्यानंतर मुख्यमंत्री भोपाळला सुरक्षितपणे पोहोचले. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे.

Madhya Pradesh CM Dr. Mohan Yadav was returning from a Ladli Behna Yojana event in Pandhana when, shortly after take-off, the helicopter briefly lost stability and appeared to drift backward in the air.
He was heading to Bhopal. People at the site looked visibly concerned. pic.twitter.com/tYwZXBjOFG
— Breaking News World (@WorldAlertHi) February 16, 2026

खंडवा एसपींनी काय म्हटले?

या प्रकरणाबाबत, खंडवा एसपी मनोज कुमार राय यांनी सांगितले की हेलिकॉप्टरमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधण्यात आला आणि त्यांनी परिस्थिती सामान्य असल्याचे कळवले. टेकऑफ दरम्यान हेलिकॉप्टर योग्य दिशेने नव्हते. टेकऑफ केल्यानंतर, ते त्याच्या इच्छित दिशेने वळू लागले. या वेळी धूळ उठू लागली, ज्यामुळे पायलटला वेग कमी करावा लागला. काही सेकंदातच, हेलिकॉप्टर थोडे खाली आणण्यात आले, नियंत्रणात आणण्यात आले आणि नंतर सुरक्षितपणे उड्डाण करण्यात आले.

हे देखील वाचा : कोर्टाला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी, लखनऊ ते अयोध्यापर्यंत हाय अलर्ट, एटीएसने तपास घेतला हाती

अजित पवार यांचे अपघाती निधन

दिवंगत नेते अजित पवार यांचा 28 फेब्रुवारी रोजी बुधवारी विमान अपघात झाला. लँडिंगदरम्यान विमान (Learjet 45) धावपट्टीजवळ कोसळले. यामुळे विमानामध्ये तीन स्फोट झाले. विमानाला लागलेल्या आगीमध्ये सर्व प्रवासी आणि विमान जळून खाक झाले. या विमानाचा अपघात इतका भीषण होता की यामध्ये उपमुख्यमंत्र्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित कपूर आणि सेकंड-इन-कमांड कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता. यानंतर दुसऱ्या दिवशी बारामतीतील काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Madhya pradesh chief minister dr mohan yadavs helicopter loses balance in mid air

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • madhya pradesh
  • mohan yadav
  • political news

संबंधित बातम्या

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार
1

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार

Dhar Bhojshala Case : नमाजवर बंदी, तर हिंदूंना पुजेचा अधिकार; धार भोजशाळा प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय
2

Dhar Bhojshala Case : नमाजवर बंदी, तर हिंदूंना पुजेचा अधिकार; धार भोजशाळा प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम लवकरच होणार जाहीर; अडीच वर्षांपासून जागा रिक्त
3

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम लवकरच होणार जाहीर; अडीच वर्षांपासून जागा रिक्त

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा
4

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.