Photo Credit- Team Navrashtra नवनीत राणा यांनी अजित पवार, मुख्यमंत्र्यांचा इशारा धुडकावला
अमरावती: अमरावतीच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमरावतीची एक जागा कमी झाली तर चालेल पण कमळ निवडून आले पाहिजे, असे वक्तव्य बडनेराच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं होते. दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीने अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी दिली आहे.पण त्यांच्याविरोधात भाजपचे रमेश बुंदिले यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली. आता नवनीत राणा यादेखील रमेश बुंदीले यांच्या प्रचारार्थ काम करत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या मुद्दयावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके आणि नवनीत राणा यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली होती.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील भरसभेत राणा दाम्पत्याला इशारा देत महायुतीची शिस्त पाळण्याचा सल्ला दिला. पण आता मात्र अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशारा राणा दाम्पत्याने धुडकावून लावल्याचे दिसत आहे. महायुतीकडून शिंदे गटाने अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपमधून बंडखोरी केलेले रमेश बुंदीले यांनी युवा स्वाभिमानी पक्षाकडून उमेदवारी घेतली आहे. त्यानंतर रमेश बुंदीले यांच्यासाठी काल नवनीत राणांनी दर्यापूर मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या.
हेही वाचा: नितीन गडकरींवर निवडणूक आयोगाची कारवाई, लातूरमध्ये केली हेलिकॉप्टरची चौकशी
काल दुपारी एकनाथ शिंदे यांनी दर्यापूरमध्ये अभिजीत अडसूळ यांच्यासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्याला युतीधर्म पाळण्याचा दमही भरला. पण तरीही नवनीत राणांनीही बुंदीले यांच्यासाठी दोन ठिकाणी सभा घेतल्या. नवनीत राणांच्या या भूमिकेमुळे महायुतीतील वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीचे सरकार तुमच्या पाठिशी उभे राहिले.महायुतीमध्ये अडसूळ हेदेखील आमच्या सरकारसाठी गरजेचे आहेत. पण राणा दाम्पत्याने महायुतीची शिस्तही पाळली पाहिजे. महायुतीत राहून त्यांनी बंडखोरी करू नये. भविष्यात महायुतीच्या कामाची पोचपावती जनताच देणार आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेसाठी आहे. मतदारसंघातले सर्व प्रश्न आपण सोडवू. त्यासाठी 20 नोव्हेंबरला अभिजीत अडसूळ यांना बहूमताने निवडून द्या, असं आवाहन एकनाथ शिंदेंनी यावेळी केले.
हेही वाचा: अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’मध्ये निम्रत कौरची एन्ट्री, चित्रपट या दिवशी सिनेमागृहात होणार दाखल!