
Uddhav Thackeray Group nominated Kailas Patil from Dharashiv
धाराशिव : विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. तेव्हापासून महायुती आणि महाविकास आघाडीच्या तयारीला जोर आला असून जागावाटपवर चर्चा करण्यात आली आहे. राज्यातील बंडखोरीच्या राजकारणानंतर ही पहिलीच विधानसभा असल्यामुळे रंगत वाढली आहे. दरम्यान, शिंदे गटाने गुवाहटी गाठत असताना आमदार कैलास पाटील यांनी अर्ध्या वाटेमध्ये एकनाथ शिंदे यांची साथ सोडली होती. शिंदेंची साथ सोडून मुंबईकडे परतणारे आमदार कैलास पाटील यांना उद्धव ठाकरेंकडून गिफ्ट मिळालं आहे. ठाकरे गटाकडून धाराशीवची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.
निवडणूक जाहीर झाली असून संभाव्य उमेदनावारांची नावं देखील समोर येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून नुकतेच वरूण सरदेसाई यांना वांद्रे पूर्व या मतदारसंघातून तिकीट दिले जाणार आहे. त्यानंतर आता ठाकरे यांच्या पक्षाने धाराशिव या मतदारसंघासाठीदेखील आपला उमेदवार जवळपास निश्चित केला आहे. एकनाथ शिंदे यांची साथ मध्यावर सोडून मुंबईमध्ये परतणारे कैलास पाटील यांचे नाव ठाकरे गटाकडून निश्चित करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : बच्चू कडू अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; 4 तारखेला करणार गौप्यस्फोट
कैलास पाटील हे मुंबईमध्ये होते. उद्धव ठाकरे पक्षाकडून तिकीट मिळल्याने निश्चित झाल्यानंतर कैलास पाटील हे त्यांच्या मतदारसंघाकडे रवाना झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी देखील कैलास पाटील यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांना साथ देणाऱ्या कैलास पाटील यांना त्यांच्या निष्ठेचे फळ मिळाले, कैलास पर्व अशा आशयाच्या कमेंट सोशल मीडियावर येत आहेत. सध्या कैलास पाटील हेच धाराशिवचे विद्यमान आमदार आहेत. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी देण्यात आली आहे.