Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार…; ICU मधून प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा

विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती खालावली होती. यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यांनी रुग्णालयामधून व्हिडिओ शेअर केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 02, 2024 | 11:57 AM
Prakash Ambedkar's big claim from ICU that he will stop OBC reservation

Prakash Ambedkar's big claim from ICU that he will stop OBC reservation

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राजकारण रंगले आहे. नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. नेत्यांचे प्रचारासाठी सभा आणि बैठका यांचे सत्र देखील वाढले आहे. केवळ पंधरा दिवसांवर निवडणूका आल्या असून जोरदार तयारी केली जात आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सध्या रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी आयसीयुमधून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी ओबीसी आरक्षणावर गंभीर भाष्य केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी दोन्हीही शस्त्रक्रिया पार पडल्या. यानंतर त्यांची आता प्रकृती स्थीर असून त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओमध्ये म्हटले होते की, मी सध्या आयसीयूमध्ये आहे. अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी दोन्ही झालेले आहे. डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले आहे. निवडणुकीला सुद्धा सुरुवात झाली आहे. ही निवडणूक महत्त्वाची आहे, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा : पवार कुटुंबियांचा दिवाळी पाडवा दुभंगला; इथून पुढे दोन पाडवे होणार…; पार्थ पवार यांनी स्पष्टच सांगितलं

ओबीसी आरक्षण थांबवले जाणार

ओबीसी आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी आयसीयुमधून महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, यंदाची ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. ओबीसींसाठी सुद्धा महत्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार आहे. आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरून हल्ला आपल्याला थांबवता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करा. दुसऱ्या बाजूला एससी, एसटी, ओबीसी आरक्षण वाचविण्याची ही अस्तित्वाची लढाई आहे. एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होणार आहे. या निवडणुकीत आपली सगळ्यांची जबाबदारी महत्त्वाची आहे. आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरमागे उभे रहा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी हॉस्पीटलमधून केले आहे.

बाळासाहेब आंबेडकरांचा ICU मधून महाराष्ट्रातील जनतेला महत्वाचा संदेश. pic.twitter.com/2vDTtjaUzP — Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) November 2, 2024

हे देखील वाचा : निवडणुकीपूर्वी शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात; हेलिकॉप्टर AB फॉर्मची आता चौकशी होणार, नेमकं प्रकरण काय?

Web Title: Vba prakash ambedkar big claim from icu that will stop obc reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2024 | 11:57 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Prakash Ambedkar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.