हेलिकॉप्टर AB फॉर्मची आता चौकशी होणार, नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य - X)
Maharashtra Assembly elections 2024: शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपण्याच्या काही वेळ अगोदर हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवले होते. या प्रकरणी राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चौकशीला सुरुवात केली आहे. हेलिकॉप्टरने नेमकं कुणी आणलं? त्यात कोण होतं? कोणत्या उमेदवारांसाठी AB फॉर्म मागवण्यात आले? त्याला किती खर्च आला? यासह अन्य बाबींची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे हे प्रकरण शिंदेसेनेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या एबी फॉर्म प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नाशिकच्या उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपण्याच्या काही वेळ अगोदर हेलिकॉप्टरने हे एबी फॉर्म पाठवणे शिंदे सेनेच्या अंगलट आले आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : “पुन्हा मुख्यमंत्री बनवणार का? सध्या मीच टीमचा लीडर…”, महायुतीवर एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाने आपल्या उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून विचारणा होताच जिल्हा प्रशासनाकडून चौकशीला सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनाकडून एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे.
संबंधित चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाईचे स्वरूप निश्चित केले जाईल. 29 तारखेला अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीच्या काही वेळापूर्वी शिंदे सेनेकडून एबी फॉर्म देण्यात आला दिंडोरी येथील धनराज महाले आणि देवळालीच्या राजश्री अहिरराव यांना एबी फॉर्म देण्यात आला असता. त्यामुळे या याचिकेची राज्यभर चर्चा आहे.
दरम्यान, 22 ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. यंदाच्या निवडणुकीत जागा वाटपावरुन नाराजी नाट्य झाले आणि अनेक पक्षांतील नेत्यांकडून बंडखोरी करण्यात आली. महायुतीमध्ये देखील अनेक ठिकाणी बंडखोरी झाली.
महायुतीच्या दुसऱ्या पक्षाला जागा देण्यात आली असताना त्याठिकाणी अर्ज भरण्यात आले. उमेदवारी अर्ज वेळेत भरण्यासाठी सर्वच इच्छुकांनी धावपळ केली होती. अशा स्थितीत शिंदे यांनी नाशिकमधील त्यांच्या पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना शेवटच्या क्षणी हेलिकॉप्टरने पाठवलेले एबी फॉर्म पाठविला. नाशिक देवळाली आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघात मोठी बंडखोरी पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात याची जोरदार चर्चा रंगली आहे.
हे देखील वाचा : राज्यातील 13 जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा