
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
स्टँड-अप कॉमेडीच्या नावाखाली संवेदनशील विषयांवर केलेल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण होण्याच्या घटना वाढत आहेत. अलीकडेच कॉमेडियन प्रणित मोरेशी संबंधित वाद चर्चेत असताना आता एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांचा पारा चांगलाच चढला आहे.
कॉमेडियन Madhur Virli याच्या २०२४ मधील ‘Love and Latex’ या शोमधील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मधुर विर्ली बलात्कार आणि पीडितेच्या खुनासारख्या अत्यंत गंभीर व संवेदनशील विषयावर विनोद करताना दिसत आहे.
ही क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हिंसाचार आणि अत्याचारांशी संबंधित विषयांवर कॉमेडियन्सनी विनोद करू नयेत. असं लोकांनी म्हटलं आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये मधूर विर्ली म्हणतोय की, “बलात्काराच्या १० प्रकरणांपैकी नऊ प्रकरणांत फक्त बलात्कार होतो, तर एका प्रकरणात अत्याचारानंतर खून केला जातो. मला वाटतं की त्या एका प्रकरणात खून तेव्हा होत असेल जेव्हा आरोपी तिच्यापासून दूर झाल्यावर पीडिता त्याला विचारत असेल की, ‘अरे, आता तू मला जवळ घेणार नाहीस का?’
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मधुर विर्लीच्या वक्तव्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. अनेक युजर्सनी या विनोदाला असंवेदनशील आणि आक्षेपार्ह ठरवत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, केवळ कॉमेडियनच नव्हे तर त्याच्या वक्तव्यावर हसणाऱ्या प्रेक्षकांवरही नेटकऱ्यांनी टीका केली आहे.
What would you call a country where a RAPE happens EVERY 16 MINUTES EVERYDAY and MEN JOKE ABOUT RAPE and MURDER of WOMEN and the AUDIENCE LAUGHS ABOUT IT? A PRO RAPE country. pic.twitter.com/4VJGlRGRZN — The Protagonist (@protagonist_xig) June 12, 2026
एका युजरने लिहिले, “हे काही चांगले विनोद नाहीत, हे अत्यंत आक्षेपार्ह आहेत. जेव्हा असे विनोद एखाद्या विशिष्ट गटाला कमी लेखण्याचे किंवा त्यांच्याबद्दलची असंवेदनशीलता सामान्य करण्याचे काम करतात, तेव्हा त्याचा समाजावर दीर्घकालीन परिणाम होतो, जो त्या क्षणी अनेकांच्या लक्षातही येत नाही.”
तर दुसऱ्या एका युजरने प्रतिक्रिया देताना म्हटले, “या प्रकरणात धक्कादायक गोष्ट विनोद नाही, तर त्या विनोदावर प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद आहे. इतक्या गंभीर विषयावर केलेल्या वक्तव्यावर लोकांनी बसून हसणे हेच अधिक चिंताजनक आहे.”
‘Wowww… धमाल 4 मध्ये Namrata Sambherao!’ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ची लॉली, बॉलिवूडमध्ये करणार धमाल
दरम्यान, या वादग्रस्त क्लिपमुळे स्टँड-अप कॉमेडीच्या मर्यादा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यांबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. अनेकांनी अशा संवेदनशील विषयांवर विनोद करताना कलाकारांनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.