Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी इंडी म्युझिक क्षेत्रात नव्या कलाकारांची लाट! ‘मिमा २०२६’चा भव्य सोहळा २ एप्रिल रोजी आयोजित

मराठी इंडी म्युझिक क्षेत्रात नव्या कलाकारांची लाट निर्माण होत असून त्यांना ‘मिमा’मुळे व्यासपीठ मिळत आहे. ‘मिमा २०२६’चा भव्य सोहळा २ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 31, 2026 | 08:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स (मिमा)’ ही संकल्पना पुढे आली आहे.
  • ‘मिमा २०२६’चा भव्य सोहळा २ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.
  • Ashish Shelar यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा ६ वाजता रंगणार आहे.
मराठी संगीतविश्वात गेल्या काही वर्षांत इंडी म्युझिकची एक नवी लाट निर्माण झाली आहे. चित्रपटांच्या चौकटीबाहेर पडून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांनी आपल्या कष्टावर आणि स्वतःच्या गुंतवणुकीतून दर्जेदार संगीत साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या नव्या प्रवाहाला योग्य व्यासपीठ, ओळख आणि सन्मान मिळावा, या उद्देशाने ‘मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स (मिमा)’ ही संकल्पना पुढे आली आहे.

Raja Shivaji : स्वराज्य… एका नव्या दृष्टिकोनातून! विद्रोहाची सुरुवात अन् स्वराज्याची ठिणगी; ‘राजा शिवाजी’चा पहिला Teaser Out

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आर्ट्स अँड कल्चर फाऊंडेशनच्या वतीने ‘मिमा २०२६’चा भव्य सोहळा २ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. Ashish Shelar यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा Swatantryaveer Savarkar National Memorial Auditorium येथे सायंकाळी ६ वाजता रंगणार आहे. मराठी इंडी संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर कलाकार, निर्माते आणि रसिक या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

आजच्या डिजिटल युगात चित्रपटाबाहेरील गाण्यांना मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळत आहे. मराठीसोबतच खानदेशी, आगरी-कोळी, कोकणी, मालवणी अशा विविध उपभाषांमध्येही दर्जेदार संगीतनिर्मिती होत आहे. मात्र, या कलाकारांना अनेक वर्षे योग्य व्यासपीठ मिळत नव्हते. ‘मिमा’मुळे आता या इंडी कलाकारांना मुख्य प्रवाहातील संगीतविश्वाशी जोडण्याची मोठी संधी मिळत आहे.

या उपक्रमाबद्दल आयोजक Ajay Naik म्हणतात की, “चित्रपटसंगीताबरोबरच इंडी म्युझिकमध्येही प्रचंड टॅलेंट आहे, पण त्याला योग्य व्यासपीठ नव्हते. विविध उपभाषांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना सन्मान मिळावा आणि त्यांचं काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं, यासाठी ‘मिमा’ची सुरुवात केली.” हा उपक्रम नॉन-प्रॉफिट असून कलाकारांना प्रोत्साहन देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

Dhurandhar 2 : Lyari नव्हे, हे तर ठाण्यातील माणकोली! पाकिस्तानच्या नावाखाली येथे shoot झाला ‘धुरंधर’ सिनेमा

‘मिमा २०२६’मध्ये मराठी भावगीत, पॉप, भक्तिगीत, लोकगीत यांसह विविध संगीत प्रकारांना पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच गायक, गायिका, संगीतकार, गीतकार यांच्यासोबतच संगीत संयोजन आणि ध्वनीमिश्रण अशा तांत्रिक क्षेत्रातील कलाकारांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. एकूणच, ‘मिमा’ हा मराठी इंडी म्युझिकला मिळालेला नवा सन्मानाचा मंच ठरत असून, या माध्यमातून नव्या कलाकारांना मोठी ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: A wave of new artists in the marathi indie music scene grand mima 2026 ceremony scheduled for april 2nd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 08:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.