फोटो सौजन्य - Social Media
‘राजा शिवाजी’ सिनेमात अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री जेनेलिया देशमुख ( Genelia D’souza ) छत्रपती शिवरायांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात अभिनेता संजय दत्त आदिलशाहच्या भूमिकेत दिसून येत आहे. तर विद्या बालन बेगमच्या भूमिकेत आहे. अभिनेते महेश मांजरेकर शहाजीराजे यांचे पात्र साकारत आहेत तर आई जिजाबाई यांचे पात्र अभिनेत्री भाग्यश्री साकारणार आहे. तसेच सिनेमात छत्रपती शिवरायांचे भाऊ संभाजीराजे शहाजीराजे भोसलेही दाखवण्यात आले आहेत. हे पात्र अभिनेता अभिषेक बच्चन साकारत आहे.
नेमकं कसा आहे Teaser ?
‘नाम के आगे राजा लगाने से कोई राजा नाही बनता’ या डायलॉगने Teaser ची सुरुवात होत असून समोर धिप्पाड असा आदिलशाह ( संजय दत्त ) उभा दिसतो. तर पुढे “मराठाओ के मुक्कदर मे एक तो मौत लेखी है या फीर गुलामी” संजय दत्तच्या भारदस्त आवाजात ही डायलॉग गुंजते. शहाजीराजेंच्या पाठीवर वार करणाऱ्या शत्रूंशी दिलेला लढा या सिनेमात दिसून येत आहे. स्वराज्यासाठी संभाजीराजे शहाजीराजे भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन भाऊंनी एकत्र येत दिलेला लढा! या Teaser मध्ये दिसून येत आहे.
या सिनेमामध्ये अमोल गुप्ते, फरदीन खान, जितेंद्र जोशी दिसून येत आहेत. तसेच सिनेमाला संगीतबद्ध अजय-अतुल यांनी केले आहे त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीन वाढत जात आहे. Teaser मध्ये ‘विद्रोह’ या शब्दाचा उल्लेख केला गेला आहे. या विद्रोहातून स्वराज्याची ठिणगी कशी पडली आणि अटक ते कटक स्वराज्य कसे उभे राहिले? हा रणसंग्राम पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरले आहेत. सिनेमा 1 मे रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.






