Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mukesh Khanna on National Anthem: जन गण मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताचा दर्जा द्या; मुकेश खन्नांच्या वक्तव्याने नवा वाद

Mukesh Khanna on National Anthem: ‘शक्तीमान’ फेम मुकेश खन्नांनी ‘जन गण मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत करण्याची मागणी केली. त्यांच्या वक्तव्याने पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 17, 2026 | 03:40 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Mukesh Khanna on National Anthem: ‘शक्तीमान’ फेम अभिनेता मुकेश खन्ना आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चा आणि वाद निर्माण होतात. आता त्यांनी भारताच्या राष्ट्रगीताबाबत केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ‘जन गण मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी मुकेश खन्ना यांनी केली आहे.

‘जन गण मन’बाबत मुकेश खन्नांचा मोठा दावा

IANSला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी ‘जन गण मन’बाबत आपलं मत मांडलं. त्यांच्या दाव्यानुसार, ‘जन गण मन’ हे भारताचं राष्ट्रगीत नसून ते तत्कालीन ब्रिटिश राजसत्तेच्या सन्मानार्थ लिहिलं गेलं होतं. त्यांनी ‘वंदे मातरम्’ला भारताचं राष्ट्रगीत करण्याची मागणी केली.

मुकेश खन्ना म्हणाले, “तीन वर्षांपूर्वी मी म्हणालो होतो की ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत बनवलं पाहिजे. हे ‘जन गण मन’ आपलं नाही. ते रवींद्रनाथ टागोर यांनी राणी एलिझाबेथ यांच्या काळात त्यांच्या स्तुतीसाठी लिहिलं होतं.”

त्यानंतर त्यांनी ‘वंदे मातरम्’चा उल्लेख करत म्हटलं, “आपलं आहे ‘वंदे मातरम्’, जे लताजींनी गायलं आहे.”

‘वंदे मातरम्’ची सात मिनिटांची आवृत्ती केली रेकॉर्ड

मुकेश खन्ना यांनी आपण ‘वंदे मातरम्’चं एक नवीन व्हर्जन रेकॉर्ड केल्याचाही खुलासा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी हे गाणं दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलं असून त्याची सुमारे सात मिनिटांची आवृत्ती तयार केली आहे.

ते म्हणाले, “मी ‘वंदे मातरम्’ची ७ मिनिटांची आवृत्ती रेकॉर्ड केली आहे, जी एक अजरामर गीत बनेल.”

हे गाणं लवकरच प्रदर्शित करण्याची इच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलं.

“जन गण मन काढून त्याजागी वंदे मातरम् आणा”

‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याची मागणी करताना मुकेश खन्ना यांनी थेट ‘जन गण मन’ हटवण्याचीही मागणी केली.

ते म्हणाले, “माझी इच्छा आहे की तुम्ही लवकरात लवकर ‘जन गण मन’ काढून त्या जागी ‘वंदे मातरम्’ आणावं.”

‘वंदे मातरम्’ला प्रोत्साहन मिळत असल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही कौतुक केलं. शाळा आणि विविध कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ला अधिक महत्त्व दिलं जात असल्याचा दावा त्यांनी केला.

समय रैनावर केलेल्या वक्तव्यामुळेही चर्चेत

दरम्यान, मुकेश खन्ना याआधी कॉमेडियन समय रैना यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत आले होते. समयच्या शोमधील भाषा आणि आशयावर त्यांनी आक्षेप घेतला होता. मात्र, त्यानंतर मुकेश खन्ना आणि समय रैना एका जाहिरातीत एकत्र दिसल्याने सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

आता ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम्’बाबत केलेल्या मुकेश खन्नांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

Web Title: Actor mukesh khanna demands vande mataram is indias national anthem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • PM Modi
  • vande mataram

संबंधित बातम्या

Rahul Gandhi: पीएम मोदींची राहुल गांधींनी उडवली खिल्ली? ‘रामायण’ फेम सुनील लहरींनी व्यक्त केला संताप
1

Rahul Gandhi: पीएम मोदींची राहुल गांधींनी उडवली खिल्ली? ‘रामायण’ फेम सुनील लहरींनी व्यक्त केला संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.