Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Actor Yash: ‘तू वाईट आहेस…’, ‘रामायण’मधील रावणाच्या भूमिकेमुळे यशच्या मुलाला बसला धक्का; अभिनेत्याने सांगितला मजेशीर प्रसंग

Actor Yash: ‘रामायणम्’मध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या यशला पाहून त्याच्या मुलाला धक्का बसला. ‘तू वाईट आहेस, हे कसं करू शकतोस?’ असा प्रश्न मुलाने विचारला. यशने सांगितला खास किस्सा.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 01, 2026 | 08:31 AM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Actor Yash: दाक्षिणात्य सुपरस्टार यश सध्या दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायणम्’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात यश रावणाची भूमिका साकारणार आहे, तर अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, रावणाची भूमिका साकारण्याबाबत यशने आपल्या मुलासोबत झालेल्या एका खास संभाषणाचा खुलासा केला आहे. यशला रावणाच्या भूमिकेत पाहून त्याच्या मुलाला धक्काच बसला होता. ‘तू वाईट आहेस, तू हे कसं करू शकतोस?’ असा प्रश्न त्याने वडिलांना विचारला होता. अभिनेत्याने एका मुलाखतीत हा रंजक किस्सा सांगितला.

मुलाला वडिलांनी रावणाची भूमिका साकारलेली आवडली नाही!

यशने सांगितले की, त्याच्या मुलाला वडील कोण आहेत, याची जाणीव आहे. मात्र, जेव्हा त्याला समजले की, वडील ‘रामायणम्’मध्ये प्रभू श्रीरामांची नव्हे, तर रावणाची भूमिका साकारणार आहेत, तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. कथेतील खलनायकाची भूमिका आपले वडील कशी काय साकारू शकतात, हे त्याला समजत नव्हते.

यशच्या मुलाने त्याला विचारले, “नाही, तुम्ही खलनायक आहात. तुम्ही हे कसं करू शकता?” मुलाच्या या प्रश्नानंतर यशला त्याला रामायणातील पात्रांचे महत्त्व समजावून सांगावे लागले. अभिनेत्याने सांगितले की, त्याने मुलाला प्रभू श्रीराम हे या कथेतील मुख्य पात्र असून त्यांना आदर्श मानले पाहिजे, असे समजावले.

‘माझ्या भूमिकेला आदर्श मानू नकोस’; यशने मुलाला काय सांगितलं?

यशने मुलाला समजावून सांगितले की, रावण शक्तिशाली आणि प्रभावी असला, तरी जीवनात खरा आणि चिरस्थायी विजय मिळवण्यासाठी प्रभू श्रीरामांप्रमाणे धर्म आणि सदाचाराच्या मार्गावर चालणे महत्त्वाचे आहे. एखाद्या कलाकाराने साकारलेली भूमिका आणि प्रत्यक्ष आयुष्यातील त्याचे व्यक्तिमत्त्व यांत फरक असतो, हेही त्याने मुलाला सांगितले.

याबाबत बोलताना यश म्हणाला, “तू रंगमंचावर एक अभिनेता म्हणून माझी प्रशंसा करू शकतोस; पण मी साकारलेल्या भूमिकेला तुझा आदर्श मानू नकोस.”

मुलाच्या एका प्रश्नाने यशला टाकलं पेचात!

यशने पुढे सांगितले की, मुलाला रामायणाची कथा समजावून सांगत असतानाच त्याने आणखी एक प्रश्न विचारला. कथेच्या शेवटी रावणाचा पराभव होतो आणि त्याचा मृत्यू होतो, हे समजल्यानंतर मुलाने वडिलांनाच त्याबद्दल विचारले.

यशने सांगितले, “माझ्या मुलाने मला विचारले, ‘चित्रपटाच्या शेवटी तुमचा मृत्यू होतो का? तुमचा पराभव होतो का?’ हा प्रश्न माझ्यासाठी थोडा कठीण होता. मी हा चित्रपट साइन केला, तेव्हा माझ्या मनात फक्त एकच विचार होता, तो म्हणजे प्रेक्षकांना उत्कृष्ट अभिनय पाहायला मिळावा. मात्र, माझ्या मुलाकडून मला अशा प्रश्नांना सामोरे जावे लागेल, याची मी कल्पनाही केली नव्हती.”

एका अभिनेत्याने साकारलेली भूमिका आणि तो प्रत्यक्षात कसा आहे, यातील फरक मुलाला समजावून सांगणे हा आपल्यासाठी अनोखा अनुभव असल्याचेही यशने सांगितले.

रावणाच्या भूमिकेसाठी यशची खास तयारी

‘रामायणम्’मध्ये रावणाची भूमिका प्रभावीपणे साकारण्यासाठी यश विशेष मेहनत घेत आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, चित्रीकरणादरम्यान तो सेटवर भगवान शिवाचे मंत्र आणि स्तोत्रे मोठ्या आवाजात लावत असे. रावण हा भगवान शिवाचा परमभक्त मानला जातो. त्यामुळे या वातावरणाचा उपयोग रावणाच्या मानसिकतेत शिरण्यासाठी आणि त्याची व्यक्तिरेखा अधिक प्रभावीपणे साकारण्यासाठी केल्याचे त्याने सांगितले.

याशिवाय, रावणाचा जड मुकुट आणि भव्य पोशाख परिधान करणे हे शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याचेही यशने स्पष्ट केले. त्याच्या या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता आहे.

Eetha: कोण होत्या विठाबाई? राज कपूरला चित्रपटासाठी दिला होता नकार, बाळाला जन्म देऊन लावणीसाठी काही तासात रंगमंचावर

‘रामायणम्’मध्ये दिसणार तगडी स्टारकास्ट

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायणम्’ हा चित्रपट भारतीय महाकाव्य रामायणावर आधारित आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या, साई पल्लवी सीतेच्या, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय सनी देओल, रवी दुबे, रकुल प्रीत सिंग, अरुण गोविल, लारा दत्ता, विवेक ओबेरॉय आणि अनुपम खेर यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

‘रामायणम्’ दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी, तर दुसरा भाग पुढील वर्षी दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. या दोन्ही भागांचे एकत्रित बजेट अंदाजे ४,००० कोटी रुपये असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील या भव्य प्रकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mi Jinkun Ghein Saara: छवीच्या आयुष्याला मिळणार नवी दिशा; ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये सुयश टिळकची दमदार भूमिका

Web Title: Actor yash son reaction ravana role ramayana movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 08:31 AM

Topics:  

  • entertainment
  • ranbir kapoor
  • Yash

संबंधित बातम्या

Eetha: कोण होत्या विठाबाई? राज कपूरला चित्रपटासाठी दिला होता नकार, बाळाला जन्म देऊन लावणीसाठी काही तासात रंगमंचावर
1

Eetha: कोण होत्या विठाबाई? राज कपूरला चित्रपटासाठी दिला होता नकार, बाळाला जन्म देऊन लावणीसाठी काही तासात रंगमंचावर

Shital Upare Engagement: अभिनेत्री शितल उपरेने उरकला साखरपुडा! अमित सिंह यांच्यासोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधले लक्ष
2

Shital Upare Engagement: अभिनेत्री शितल उपरेने उरकला साखरपुडा! अमित सिंह यांच्यासोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधले लक्ष

Maharashtra Epstein Files: ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील भोंदूबाबाचे रहस्य उलगडणार! मनोज जोशींचा दमदार लूक रिव्हील
3

Maharashtra Epstein Files: ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील भोंदूबाबाचे रहस्य उलगडणार! मनोज जोशींचा दमदार लूक रिव्हील

Phulpakharu Song: आई-मुलीच्या नात्याची हळवी गोष्ट; चिमुकल्या परीच्या निरागस दुनियेची सफर घडवणारं ‘फुलपाखरू’ गाणं प्रदर्शित!
4

Phulpakharu Song: आई-मुलीच्या नात्याची हळवी गोष्ट; चिमुकल्या परीच्या निरागस दुनियेची सफर घडवणारं ‘फुलपाखरू’ गाणं प्रदर्शित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.