Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Phulpakharu Song: आई-मुलीच्या नात्याची हळवी गोष्ट; चिमुकल्या परीच्या निरागस दुनियेची सफर घडवणारं ‘फुलपाखरू’ गाणं प्रदर्शित!

Phulpakharu Song: अभिनेत्री मनिषा इंगळे, अभिनेता सनी कांबळे आणि बालकलाकार रिधिमा निचित यांच्या ‘फुलपाखरू’ या नव्या मराठी गाण्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. बालपण, कल्पनाविश्व आणि कुटुंबातील प्रेमाची सुंदर गोष्ट गाण्यातून पाहायला मिळते.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 30, 2026 | 04:43 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Phulpakharu Song:  बालपण म्हणजे निरागसता, कल्पनाशक्ती, स्वप्नं आणि आनंदाने बहरलेलं सुंदर विश्व! याच भावविश्वाची सफर घडवणारं ‘फुलपाखरू’ हे नवं मराठी गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सोशल मीडिया क्वीन आणि अभिनेत्री मनिषा इंगळे, अभिनेता सनी कांबळे आणि बालकलाकार रिधिमा निचित या गाण्यात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत.

टाइमलेस स्लेट्स प्रस्तुत आणि टाइमलेस स्लेट्स प्रॉडक्शन्स निर्मित या गाण्यात एका चिमुकल्या परीचं रंगीबेरंगी, स्वप्नवत आणि कल्पनारम्य विश्व उलगडण्यात आलं आहे. रंगीबेरंगी फुलपाखरं, परीचं रूप, आकर्षक दृश्यरचना आणि कुटुंबातील प्रेमळ क्षण यांची सुंदर सांगड गाण्यात पाहायला मिळते. गाण्याच्या पोस्टरनेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

पुण्यातील विविध ठिकाणी झालं चित्रीकरण

‘फुलपाखरू’ गाण्याचं चित्रीकरण पुण्यातील विविध ठिकाणी करण्यात आलं आहे. या गाण्याची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सनी कांबळे यांनी केलं आहे. निर्मितीची जबाबदारी सनी कांबळे आणि तेजस पानसरे यांनी सांभाळली आहे.

गाण्याला प्रज्वल यादव आणि विवेकानंद सणप यांचं संगीत लाभलं आहे, तर नव्या सणप आणि ऋषभ साठे यांनी ते गायलं आहे. गीतलेखन विवेकानंद सणप यांचं आहे. असिस्टंट डायरेक्टर म्हणून रोहन वाते आणि कुमार गायकवाड यांनी काम पाहिलं आहे. एडिटिंग विनय शिंदे, डीआय मयूर सातपुते, व्हीएफएक्स असारफ शेख आणि आर्ट डायरेक्शन सनी कांबळे व नितीश कुमार यांनी सांभाळलं आहे.

प्रसिद्धी डिझाइनची जबाबदारी अनिकेत महाडिक यांनी, तर पीआरची जबाबदारी विनया सावंत (फॉरेवर पीआर) यांनी सांभाळली आहे. गाण्याच्या बीटीएससाठी रवी शिंदे, प्रिया आणि रुद्र यांनी काम केलं आहे.

Actor Heart Attack: ‘हुंकार: द रोअर’च्या शूटिंगपूर्वी ‘या’ अभिनेत्याला आला होता हृदयविकाराचा झटका, दिग्दर्शकाने केला खुलासा

पहिल्यांदाच आईची भूमिका साकारण्याचा अनुभव

गाण्याच्या चित्रीकरणाविषयी अभिनेत्री मनिषा इंगळे सांगते, “मला गाण्याची ऑफर आली तेव्हा मी लगेचच हो म्हटलं होतं. मी पहिल्यांदाच एका आईच्या भूमिकेत काम केलं आहे. याआधी मी अनेक रोमँटिक आणि ट्रेंडिंग गाण्यांमध्ये काम केलं आहे.”

पुणे शहरासह जवळच्या गावांमध्ये झालेल्या चित्रीकरणाचा अनुभवही तिने सांगितला. प्रॉडक्शनकडून उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे शूटिंग करताना खूप मजा आली. विशेष म्हणजे गाण्यातील दृश्यांसाठी तयार केलेले सेटअपही खूप सुंदर होते, असं मनिषाने नमूद केलं.

बालपणातील निरागसता, कुटुंबातील प्रेम आणि कल्पनाविश्वातील रम्य क्षणांचा अनुभव देणारं ‘फुलपाखरू’ हे गाणं लहान मुलांसह मोठ्यांनाही नक्कीच आवडेल, अशी आशा मनिषा इंगळेने व्यक्त केली आहे.

Orry Halloween Look: ना भूत, ना व्हॅम्पायर… हॅलोविनसाठी ओरीने धारण केला ‘तुंबाड’मधील हस्तरचा अवतार; भयावह लूकची चर्चा

Web Title: Phulpakharu song released manisha ingle sunny kamble ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • New Song

संबंधित बातम्या

Eetha Trailer Out: ‘नाचते हुए मरी तो मिसाल बन जाऊंगी’, श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज
1

Eetha Trailer Out: ‘नाचते हुए मरी तो मिसाल बन जाऊंगी’, श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज

Sharvari Wagh: आईच्या जुन्या पटोला साडीला अभिनेत्री शर्वरी वाघने दिला मॉडर्न टच; मराठी पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष!
2

Sharvari Wagh: आईच्या जुन्या पटोला साडीला अभिनेत्री शर्वरी वाघने दिला मॉडर्न टच; मराठी पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष!

Actor Heart Attack: ‘हुंकार: द रोअर’च्या शूटिंगपूर्वी ‘या’ अभिनेत्याला आला होता हृदयविकाराचा झटका, दिग्दर्शकाने केला खुलासा
3

Actor Heart Attack: ‘हुंकार: द रोअर’च्या शूटिंगपूर्वी ‘या’ अभिनेत्याला आला होता हृदयविकाराचा झटका, दिग्दर्शकाने केला खुलासा

Orry Halloween Look: ना भूत, ना व्हॅम्पायर… हॅलोविनसाठी ओरीने धारण केला ‘तुंबाड’मधील हस्तरचा अवतार; भयावह लूकची चर्चा
4

Orry Halloween Look: ना भूत, ना व्हॅम्पायर… हॅलोविनसाठी ओरीने धारण केला ‘तुंबाड’मधील हस्तरचा अवतार; भयावह लूकची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.