Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Adinath Kothare: ‘रामायण’नंतर आदिनाथ कोठारेचा आणखी एक बॉलिवूड चित्रपट; यामी गौतमसोबत ‘नई नवेली’मध्ये दिसणार

Adinath Kothare: राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आदिनाथ कोठारे यामी गौतमसोबत ‘नई नवेली’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हॉरर-कॉमेडी फॅमिली ड्रामा १६ ऑक्टोबर २०२६ रोजी रिलीज होणार.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 01, 2026 | 11:25 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Adinath Kothare: राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आदिनाथ कोठारे आपल्या दमदार अभिनयाने मराठीसह बॉलिवूडमध्येही वेगळी ओळख निर्माण करत आहे. विविध धाटणीच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखला जाणारा आदिनाथ आता आणखी एका हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नई नवेली’ या चित्रपटात तो अभिनेत्री यामी गौतमसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

यामी गौतमसोबत आदिनाथची फ्रेश जोडी

‘नई नवेली’मध्ये आदिनाथ कोठारे आणि यामी गौतम यांची फ्रेश जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ट्रेलरच्या पहिल्याच फ्रेमपासून आदिनाथचा रुबाबदार आणि वेगळा अंदाज लक्ष वेधून घेतो. हॉरर, कॉमेडी आणि फॅमिली ड्रामाचा मिलाफ असलेल्या या चित्रपटात आदिनाथ एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटाची कथा अवस्थी कुटुंबाभोवती फिरताना दिसते. त्यामुळे हॉररसोबतच विनोद आणि कौटुंबिक नात्यांचा मनोरंजक अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.

‘रामायण’नंतर आणखी एका बॉलिवूड चित्रपटात आदिनाथ

आदिनाथ कोठारे सध्या ‘रामायण’ या बहुप्रतीक्षित बॉलिवूड चित्रपटामुळेही चर्चेत आहे. ‘रामायण’नंतर आता ‘नई नवेली’च्या माध्यमातून त्याची आणखी एक वेगळी भूमिका प्रेक्षकांसमोर येणार आहे. दोन वेगळ्या भूमिका आणि दोन वेगळ्या विषयांमधून आदिनाथच्या अभिनयातील विविध पैलू पाहायला मिळणार आहेत.

वैविध्यपूर्ण कथा आणि भूमिका निवडण्याकडे आदिनाथचा नेहमीच कल राहिला आहे. त्यामुळे ‘नई नवेली’मधील त्याचा अंदाजही प्रेक्षकांसाठी खास ठरणार असल्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

आनंद एल. राय यांच्या बॅनरखाली निर्मिती

‘नई नवेली’ची निर्मिती चित्रपट निर्माते आनंद एल. राय यांच्या बॅनरखाली होत आहे. बालाजी मोहन यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर हिमांशु शर्मा आणि दिव्य निधी शर्मा यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे.

हॉरर, कॉमेडी आणि कौटुंबिक मनोरंजनाचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना दिवाळीच्या मुहूर्तावर मनोरंजनाची मेजवानी देणार आहे.

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

१६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात दाखल होणार

‘नई नवेली’ हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी थेट चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. त्यामुळे यामी गौतम आणि आदिनाथ कोठारे यांची फ्रेश जोडी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

बॉलिवूडमध्ये आदिनाथ कोठारेचा प्रवास सातत्याने पुढे जात आहे. ‘नई नवेली’सोबतच तो ‘रामायण’मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याने त्याच्यासाठी आगामी काळ महत्त्वाचा ठरणार आहे.

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स

Web Title: Adinath kothare yami gautam nayyi navelli release date ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • adinath kothare
  • Entertainmenmt
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने हास्यजत्रा का सोडली? अखेर सांगितलं खरं कारण
1

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने हास्यजत्रा का सोडली? अखेर सांगितलं खरं कारण

Shubham Karoti Marathi Play: मुलांची स्वप्नं की आई-बाबांच्या अपेक्षा? ‘शुभं करोति’मधून उलगडणार घराघरातली गोष्ट
2

Shubham Karoti Marathi Play: मुलांची स्वप्नं की आई-बाबांच्या अपेक्षा? ‘शुभं करोति’मधून उलगडणार घराघरातली गोष्ट

Athiya Shetty: ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’! अथिया शेट्टीसोबत प्राइड ऑफ काऊजची खास जाहिरात
3

Athiya Shetty: ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’! अथिया शेट्टीसोबत प्राइड ऑफ काऊजची खास जाहिरात

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा
4

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.