
Alka Kubal Daughter Kasturi Gets Engaged to Sanket ( अलका कुबल यांची मुलगी कस्तुरी हिचा संकेतसोबत साखरपुडा झाला) फोटो सौजन्य AI
माहेरची साडीतून फेमस झालेल्या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल यांच्या अभिनयाची कारकिर्द एक बालकलाकार म्हणून झाली होती. अलका कुबल यांनी इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याचे कौटुबिंकसिनेमे पाहण्यासाठी मराठी प्रेक्षक खास करुन थिएटर मध्ये जायचे. त्याच्या लग्नानंतर त्यांनी वैयक्तिक आयुष्य कायमचे अलिप्त ठेवले.
अलका कुबल यांनी मुलगी कस्तुरी आणि होणारे जावई संकेत यांचे साखरपुड्यातील खास क्षण सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले. मुलीच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांनी आनंद व्यक्त करत दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. साखरपुड्याच्या फोटोंमध्ये कस्तुरी आणि संकेत यांचा आनंद पाहायला मिळत आहे. या फोटोंना चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अलका कुबल यांची धाकटी मुलगी कस्तुरी हिने मनोरंजनविश्वापेक्षा वेगळे क्षेत्र निवडले आहे. तिने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला असून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे कस्तुरीच्या व्यावसायिक यशासोबतच आता तिच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या सुरुवातीमुळेही कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, अलका कुबल यांच्या या आनंदाच्या क्षणांमध्ये चाहतेही सहभागी होत आहेत. सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो पाहून अनेकांनी कस्तुरी आणि संकेत यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीच्या घरी लवकरच लग्नाची लगबग पाहायला मिळणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.