Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashwini Bhave: परदेशातही मराठी संस्कृतीचा जागर! कॅलिफोर्नियात अश्विनी भावेंनी घेतलं ढोल वादनाचं प्रशिक्षण

Ashwini Bhave: अभिनेत्री अश्विनी भावेंनी कॅलिफोर्नियात ढोल-ताशा वादनाचं प्रशिक्षण घेतलं. ‘MMBA Spartans’च्या निमंत्रणामुळे मिळालेल्या या संधीचा अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 07, 2026 | 11:40 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेत अश्विनी भावेंनी घेतलं ढोल-ताशा वादनाचं प्रशिक्षण
  • दर तीन महिन्यांनी काहीतरी नवीन शिकण्याचा संकल्प
  • पुण्यातील मिरवणुका पाहून वाटायची ढोल वाजवण्याची इच्छा
Ashwini Bhave: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी भावे सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. अमेरिकेत राहत असल्या तरी परदेशात राहूनही त्या आपल्या मराठी संस्कृतीशी असलेलं नातं कायम जपत आहेत. नुकतंच त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये ढोल-ताशा वादनाचं प्रशिक्षण घेतलं असून, या अनुभवाबद्दल सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

गेल्या अनेक वर्षांत असंख्य मराठी नागरिक कामानिमित्त किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशात स्थायिक झाले आहेत. परदेशात राहूनही हे नागरिक आपल्या परंपरा आणि संस्कृती जपताना दिसतात. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात अमेरिकेतील विविध शहरांमध्ये मराठमोळ्या पद्धतीने उत्सव साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर ढोल-ताशा वादनाचे प्रशिक्षणवर्गही आयोजित केले जातात.

अशाच एका प्रशिक्षणवर्गात अभिनेत्री अश्विनी भावे सहभागी झाल्या होत्या. त्यांनी ढोल वादनाचा सराव केला. विशेष म्हणजे, यावर्षी दर तीन महिन्यांनी काहीतरी नवीन शिकण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. त्यामुळे ढोल-ताशा वादन शिकण्याच्या निमित्ताने त्यांचा हा संकल्पही पूर्ण झाला आहे.

‘आता मी ढोल-ताशा वाजवायला शिकणार आहे’

अश्विनी भावे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये आपल्या या अनुभवाबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, “तुम्हाला आठवत असेल तर, यंदाच्या वर्षीच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं की, मी आता दर तीन महिन्यांनी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. जे आपण ठरवतो ते प्रत्येकवेळी होतंच असं नाहीये… पण आज मला एक नवीन संधी मिळालीये. आता मी ढोल-ताशा वाजवायला शिकणार आहे.”

पुण्यातील मिरवणुकांचे व्हिडीओ पाहून आपल्यालाही ढोल-ताशा वाजवण्याची संधी कधी मिळणार, असा विचार मनात यायचा, असंही त्यांनी सांगितलं. “पुण्यातल्या मिरवणुकांचे व्हिडीओ पाहून मला नेहमी वाटायचं की, अरे आपल्याला ही संधी केव्हा मिळेल? तर, आता मला कॅलिफोर्नियामध्ये ही संधी मिळालीये. स्पार्टन्स ढोल-ताशा पथक यांनी मला आमंत्रण दिलंय. आता बघुयात मला जमतंय का…” असं अश्विनी भावे यांनी म्हटलं.

OTT Release: या आठवड्यात OTTवर होणार मनोरंजनाचा ‘घमासान’; ‘सिरफिरे’ही घेऊन येणार क्रांतीची मशाल!

‘ढोलचं वजन मला झेपेल का?’

या उपक्रमासाठी ‘MMBA Spartans’ ग्रुपचे त्यांनी विशेष आभार मानले. “MMBA स्पार्टन्स या ग्रुपचे मनापासून आभार कारण, त्यांच्यामुळे मला ही नवीन संधी मिळाली. अर्थात, ढोलचं वजन मला झेपेल का, याची मला जरा शंकाच होती. पण काहीही झालं तरी, मी प्रयत्न करणारच आहे. गणपती बाप्पा मोरया!” असं म्हणत त्यांनी आपला उत्साह व्यक्त केला.

अश्विनी भावेंच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी त्यांच्या या नव्या प्रयत्नाचं कौतुक केलं आहे. अमेरिकेत राहूनही मराठी संस्कृती आणि परंपरांशी जोडून राहण्याचा त्यांचा हा प्रयत्न विशेष लक्षवेधी ठरत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ढोल-ताशा वादन शिकण्याचा त्यांचा अनुभव नक्कीच त्यांच्यासाठी खास ठरणार आहे.

Bipasha Basu Comeback: तब्बल ६ वर्षांनी बिपाशा बसुचं कमबॅक; हंसल मेहतांच्या ‘या’ सीरिजमधून OTTवर करणार पुनरागमन

Web Title: Ashwini bhave dhol tasha training california mmba spartans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Ashwini Bhave
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Bipasha Basu Comeback: तब्बल ६ वर्षांनी बिपाशा बसुचं कमबॅक; हंसल मेहतांच्या ‘या’ सीरिजमधून OTTवर करणार पुनरागमन
1

Bipasha Basu Comeback: तब्बल ६ वर्षांनी बिपाशा बसुचं कमबॅक; हंसल मेहतांच्या ‘या’ सीरिजमधून OTTवर करणार पुनरागमन

OTT Release: या आठवड्यात OTTवर होणार मनोरंजनाचा ‘घमासान’; ‘सिरफिरे’ही घेऊन येणार क्रांतीची मशाल!
2

OTT Release: या आठवड्यात OTTवर होणार मनोरंजनाचा ‘घमासान’; ‘सिरफिरे’ही घेऊन येणार क्रांतीची मशाल!

Bigg Boss 20: घरात एन्ट्री करताच माही विजचा हुकूम सुरू; कोणाकडून बनवली चहा, तर कोणाकडून उचललं सामान!
3

Bigg Boss 20: घरात एन्ट्री करताच माही विजचा हुकूम सुरू; कोणाकडून बनवली चहा, तर कोणाकडून उचललं सामान!

Bigg Boss 20: बिग बॉसमध्ये पुण्याच्या मराठमोळ्या रॅपरची एन्ट्री; ‘Yeda Yung’ फेम Yung DSA कोण?
4

Bigg Boss 20: बिग बॉसमध्ये पुण्याच्या मराठमोळ्या रॅपरची एन्ट्री; ‘Yeda Yung’ फेम Yung DSA कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.