Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनन्या पांडेच्या ‘Call Me Bae’ Season 2 Release Date ठरली; या’ तारखेला होणार प्रीमियर रिलीज

Call Me Bae: अनन्या पांडेची लोकप्रिय हिंदी ओरिजिनल सीरिज 'कॉल मी बे' दुसऱ्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचा जागतिक स्ट्रीमिंग प्रीमियर 17 डिसेंबर 2026 रोजी प्राइम व्हिडिओवर होणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 17, 2026 | 05:46 PM
Call Me Bae   (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Call Me Bae   (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अनन्या पांडेची ‘कॉल मी बे’ सीरिज दुसऱ्या सीझनसह परतणार.
  • ‘कॉल मी बे 2’ चा प्रीमियर 17 डिसेंबर 2026 रोजी होणार.
  • सीझनमध्ये प्रेम, मैत्री, ग्लॅमर आणि गुंतागुंतीच्या नात्यांची कहाणी पाहायला मिळणार.

कॉलिन डी’कुन्हा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सीरिजमध्ये अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार असून, करण जोहर, अदार पूनावाला आणि अपूर्व मेहता यांनी धर्माटिक एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या सीझनची निर्मिती केली आहे. Call Me Bae

ग्लॅमर आणि मैत्री यांचा अनोखा संगम

प्राइम व्हिडिओ या भारतातील आघाडीच्या एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल कंटेंट स्ट्रीमिंग सेवेकडून आज सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या हिंदी ओरिजिनल सीरिज ‘कॉल मी बे’च्या दुसऱ्या सीझनच्या जागतिक स्ट्रीमिंग प्रीमियरची घोषणा करण्यात आली आहे. या सीरिजचा प्रीमियर १७ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे. आठ भागांची ही सीरिज विनोद, ग्लॅमर आणि मैत्री यांचा अनोखा संगम घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी बेचे आयुष्य आणखी गुंतागुंतीचे होणार असून, ती आपल्या प्रेमासोबतच ‘सिस्टरहुड’ म्हणजेच बहिणींच्या नात्यातील खास बॉन्डचीही परीक्षा घेताना दिसणार आहे.

सीरिजची निर्मिती

‘कॉल मी बे’ सीझन २ चे दिग्दर्शन कॉलिन डी’कुन्हा यांनी केले असून, करण जोहर, अदार पूनावाला आणि अपूर्व मेहता यांनी धर्माटिक एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या सीरिजची निर्मिती केली आहे. सोमन मिश्रा आणि कॉलिन डी’कुन्हा यांनी कार्यकारी निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. इशिता मोइत्रा यांनी या सीरिजची निर्मिती केली असून, इशिता मोइत्रा, समीना मोटलेकर, रोहित नायर आणि नित्तल चंद्रराणा यांनी लेखन केले आहे.

Sagarika Ghatge: कोल्हापूरच्या शाही घराण्यात लगीनघाई! सागरिका घाटगेने करवलीच्या लूकने वेधलं लक्ष, जहीर खानचा मराठमोळा अंदाज

कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका

या नव्या सीझनमध्ये प्रतिभावान कलाकारांची मोठी फळी पाहायला मिळणार आहे. अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार असून, श्रुती कमल हासनदेखील या सीरिजचा भाग असणार आहेत. त्यांच्यासोबत वीर दास, गुरफतेह पीरजादा, वरुण सूद, विहान समत, मुस्कान जाफरी, निहारिका लायरा दत्त, लिसा मिश्रा आणि मिनी माथुर हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

बेला ‘बे’ चौधरी (अनन्या पांडे) विजयाचा उत्साह, मोठी स्वप्ने आणि प्रचंड आत्मविश्वास घेऊन पुन्हा एकदा परतली आहे. तिचे करिअर यशाची नवी शिखरे गाठत असताना, तिचे प्रेमजीवन मात्र तितकेच गुंतागुंतीचे बनले आहे. दोन व्यक्ती तिच्या मनाला आपापल्या दिशेने खेचत असताना, तिला प्रेम, मनःस्ताप आणि स्वतःच्या काही चुकीच्या निर्णयांचा सामना करावा लागणार आहे.

आणि बेची गोष्ट तिच्या सर्वाधिक विश्वासू बहिणींसोबतच्या नात्याशिवाय आणि त्यांच्या खास ‘सिस्टर कोड’शिवाय पूर्ण होऊच शकत नाही! यावेळी हा बहिणींचा खास बॉन्ड आणखी मोठा, गुंतागुंतीचा आणि अनेक अनपेक्षित वळणांनी भरलेला असणार आहे, कारण त्यांच्या ग्रुपमध्ये एका नव्या बहिणीची एन्ट्री होणार आहे. यावेळीदेखील बे आपल्या खास अंदाजात प्रत्येक अडचणीचा आणि अनपेक्षित वळणाचा सामना करताना दिसणार आहे. अशा प्रकारे सीझन २ मध्ये प्रेक्षकांना मनोरंजन, मत्सर आणि धमाल गोंधळाची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. कारण हा सीझन एका गोष्टीची हमी देतो आणि ती म्हणजे दोन हृदये, एक बे आणि भरपूर ड्रामा!

केवळ एक सीरिज राहिलेली नाही

प्राइम व्हिडिओ आणि अमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडिया ओरिजिनल्स (SVOD) चे डायरेक्टर आणि हेड निखिल मधोक म्हणाले, “एखादी सीरिज किती यशस्वी ठरली आहे, हे खऱ्या अर्थाने तेव्हाच समजते, जेव्हा प्रेक्षक त्या सीरिजमधील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या कथांशी किती जोडले गेले आहेत, हे दिसून येते. ‘कॉल मी बे’ ही केवळ एक सीरिज राहिलेली नाही, तर आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे, धमाल विनोदामुळे आणि दैनंदिन आयुष्याशी संबंधित विषयांमुळे ती पॉप कल्चरचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. विशेषतः ‘बेहन कोड’ ही संकल्पना प्रेक्षकांनी सीरिजच्या पलीकडेही आपलीशी केली असून, महिला मैत्री, एकमेकींना साथ देणे आणि प्रत्येक कठीण प्रसंगात एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे याचे ते प्रतीक बनले आहे. धर्माटिक एंटरटेनमेंटसोबत आमचे दीर्घकाळापासूनचे नाते आहे. त्यांनी नेहमीच प्रेक्षकांसाठी नवनवीन आणि रंजक कथा सादर केल्या आहेत. आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा या रंगतदार दुनियेत घेऊन जाण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

Eisha Singh Avinash Mishra: आधी प्रेमाची कबुली, आता थेट अनफॉलो! ईशा सिंह-अविनाश मिश्राच्या नात्यात दुरावा?

पहिल्या सीझनमध्ये खूप आवडला

निर्माते करण जोहर म्हणाले, “पहिल्या सीझनला प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम आणि शानदार प्रतिसाद यावरून हे स्पष्ट झाले की, बेच्या आयुष्यातील चढ-उतार आणि प्रत्येक परिस्थितीत स्वतःच्या अटींवर जगण्याच्या तिच्या वृत्तीशी प्रेक्षक मनापासून जोडले गेले आहेत. सीझन २ मध्ये आम्हाला ही कथा आणखी पुढे घेऊन जायची होती. यात बेच्या व्यक्तिमत्त्वाचे काही नवे पैलू उलगडण्यासोबतच तिचा तोच मजेशीर स्वभाव, भावना आणि बिनधास्त अंदाज कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, जो प्रेक्षकांना पहिल्या सीझनमध्ये खूप आवडला होता. प्राइम व्हिडिओसोबत पुन्हा एकदा काम करताना आणि बेच्या आयुष्यातील हा नवा टप्पा प्रेक्षकांसमोर आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. यावेळी बे आणि तिच्या लाडक्या बहिणी हसू, भावना आणि भरपूर धमाल-गोंधळाने भरलेल्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.”

Web Title: Call me bae season 2 release date ananya panday cast prime video rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • ananya panday
  • OTT Release
  • Prime Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.