
फोटो सौजन्य - Social Media
एक नाही तर कश्मीराच्या अशा अनेक व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. मेडिकल कॉस्ट्यूम घालत अभिनेत्री तिच्या टीमसह वारकऱ्यांसाठी माउलीसेवेत तत्पर झाली आहे. वारकऱ्यांना लागणारी वैद्यकीय सेवा तिच्या टीमद्वारे पुरवण्यात येत आहे. तसेच वारकऱ्यांसाठी अन्न तसेच पाण्याचे आयोजन त्यांच्या टीमद्वारे करण्यात आले आहे. कश्मिरा आणि तिच्या टीममुळे त्या मार्गावरून जाणाऱ्या अनेक वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न सुटला आहे. तिची टीम अहोरात्र वारकऱ्यांच्या सेवेत तत्पर आहे. अनेक पोस्टमध्ये स्वतः कश्मिरा वारकऱ्यांच्या पायाला मलम लावणे किंवा पाय चेपून देणे अशा सेवा करताना दिसत आहे.
कश्मिराचा हा सेवाधर्म पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्या स्वप्नांसाठी प्रार्थना केली आहे. तसेच ‘तुझ्यामागे स्वतः विठुराया आहे’ असा आशीर्वाद दिला आहे. Carry On Maratha या सिनेमात झळकलेली अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी हिने ढोलकी, जर्नी प्रेमाची 2017, वामा या सिनेमामध्ये अभिनय केला आहे. परंतु, तिचे Carry On Maratha या सिनेमातील काम संपूर्ण महाराष्ट्रभराच्या मनात ठसा उमटवणारा ठरला.