फोटो सौजन्य - Social Media
‘भाईजान… तुस्सी ग्रेट हो!’ सलमानच्या प्रॉपर्टीत वाढ? ‘तो’ फ्लॅट विकला पण नफा मिळवला छ्प्परफाड
एस. जानकी यांना भारतीय सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला होता. मात्र, दक्षिण भारतीय कलाकारांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी हा सन्मान स्वीकारण्यास नकार दिला होता. संगीतविश्वात त्या प्रेमाने ‘अम्मा’ या नावाने ओळखल्या जात. आपल्या गायनकलेला त्या ईश्वराची देणगी मानत आणि आपल्या यशाचे श्रेय संगीतकार व गीतकारांनाही देत असत.
एस. जानकी आणि दिग्गज गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांची जोडी भारतीय संगीतसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानली जाते. २०१७ मध्ये त्यांनी गायनातून निवृत्ती जाहीर केली. म्हैसूर येथे झालेला त्यांचा अखेरचा संगीत कार्यक्रम त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला.
त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचे झाल्यास, १९५९ मध्ये त्यांनी व्ही. रामप्रसाद यांच्याशी विवाह केला. १९९७ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या पतींचे निधन झाले. त्यांचा एकुलता एक मुलगा मुरली कृष्णा ऑडिओ व्यवसाय सांभाळत होता. जानेवारी २०२६ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्याचाही मृत्यू झाला होता. आता एस. जानकी यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.






