Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

VIBE- Official Teaser: काही हिरो जन्माला येतात, काही घडतात… तर काहींचं थेट अपहरण होतं! ‘वाइब’चा धमाल टीझर रिलीज

VIBE- Official Teaser: अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने ‘वाइब’ या आगामी हाय-स्टेक्स अॅक्शन-कॉमेडी चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. चित्रपटात कुणाल खेमू आणि स्पर्श श्रीवास्तव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हार्दिक आणि बग्स हे दोन साधे मित्र अचानक अशा संकटात अडकतात, ज्यामुळे त्यांच्यावर देशाच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी येऊन पडते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 21, 2026 | 06:30 PM
VIBE- Official Teaser: काही हिरो जन्माला येतात, काही घडतात… (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

VIBE- Official Teaser: काही हिरो जन्माला येतात, काही घडतात… (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • वाइब’चा पहिला टीझर रिलीज.
  • कुणाल खेमू आणि स्पर्श श्रीवास्तव मुख्य भूमिकेत.
  • चित्रपटात अॅक्शनसोबत विनोदाचीही मेजवानी.
  • दोन सामान्य मित्रांवर देश वाचवण्याची जबाबदारी येते.
  • अमेझॉन एमजीएम स्टुडिओजची हाय-स्टेक्स अॅक्शन-कॉमेडी.
 

अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने ‘वाइब’ या आगामी हाय-स्टेक्स अॅक्शन-कॉमेडी चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. चित्रपटात कुणाल खेमू आणि स्पर्श श्रीवास्तव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हार्दिक आणि बग्स हे दोन साधे मित्र अचानक अशा संकटात अडकतात, ज्यामुळे त्यांच्यावर देशाच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी येऊन पडते. मात्र, दोघांनाही हिरो बनण्याची इच्छा नसताना परिस्थिती त्यांना या जबाबदारीचा सामना करण्यास भाग पाडते. विनोद, अॅक्शन आणि गोंधळाची धमाल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. VIBE- Official Teaser:

अॅक्शन-कॉमेडीची पहिली झलक

जेव्हा दोन साधेसुधे मित्र अचानक अशा संकटात अडकतात, जे अजिबात साधं नसतं, तेव्हा काय होतं? अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने आज ‘वाइब’चा टीझर रिलीज केला आहे. या टीझरमध्ये कुणाल खेमूच्या या हाय-स्टेक्स अॅक्शन-कॉमेडीची पहिली झलक पाहायला मिळते. मजेशीर ह्यूमर, धमाकेदार अॅक्शन आणि भरपूर गोंधळाची धमाल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

जेव्हा देशावर संकट येतं, तेव्हा पुढे येऊन जबाबदारी सांभाळणाऱ्या हिरोंची गरज असते. पण इथे हार्दिक (कुणाल खेमू) आणि बग्स (स्पर्श श्रीवास्तव) यांची गोष्ट जरा वेगळी आहे. दोघेही या कामासाठी तयार नाहीत आणि देश वाचवण्याची जबाबदारीही त्यांना घ्यायची नसते. मात्र, परिस्थिती अशी निर्माण होते की ही जबाबदारी अखेर दोघांनाच उचलावी लागते.

‘वाइब’च्या नव्या टीझरमध्ये या भन्नाट जोडीच्या मिशनची मजेशीर झलक पाहायला मिळते. प्रीती जी जिंटा यांच्या दमदार व्यक्तिरेखेमुळे या दोघांना एकामागून एक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रीती यांची व्यक्तिरेखा अतिशय कॉन्फिडंट असून, संपूर्ण परिस्थितीची सूत्रे जणू त्यांच्या हातातच असल्याचे दिसते. त्यांचा बॉस-लेडी अंदाज टीझरमध्ये खास लक्ष वेधून घेतो.

अनेक मोठे सरप्राइजेस

टीझरमध्ये वेगवान कार चेज, धमाकेदार अॅक्शन आणि मजेशीर प्रसंगांची रेलचेल आहे. ‘वाइब’चा टीझर स्पष्टपणे सांगतो की, चित्रपटात विचित्र परिस्थिती, अनपेक्षित हिरो आणि अनेक मोठे सरप्राइजेस पाहायला मिळणार आहेत.

‘वाइब’ 18 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित

कुणाल खेमू यांनी ‘वाइब’चे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. कुणाल खेमू आणि चिराग निहलानी यांनी ड्रोंगो फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात कुणाल खेमू यांच्यासोबत प्रीती जी जिंटा, स्पर्श श्रीवास्तव आणि पदार्पण करणारी वंशिका धीर मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. तर दिनेश लाल यादव आणि यशपाल शर्मा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. अमेझॉन एमजीएम स्टुडिओजचा ‘वाइब’ 18 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Exciting teaser of vibe released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Latest Marathi News

संबंधित बातम्या

India News : ऑस्ट्रेलियाला पर्याय शोधताना भारताची मोठी चाल; SAIL मंगोलियातून मागवणार कोकिंग कोळसा
1

India News : ऑस्ट्रेलियाला पर्याय शोधताना भारताची मोठी चाल; SAIL मंगोलियातून मागवणार कोकिंग कोळसा

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
2

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”
3

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”

Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न; ‘बांदेकरांच्या प्रोडक्शन’च्या टोमण्यांवर अभिनेत्री म्हणाली…
4

Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न; ‘बांदेकरांच्या प्रोडक्शन’च्या टोमण्यांवर अभिनेत्री म्हणाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.