Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IMDb रेटिंगमध्ये ‘रामायण’ची बाजी! यशला मागे टाकत कुंभकर्ण ठरला प्रेक्षकांचा लाडका

IMDb 'पंचायत' वेबसीरिजमधील प्रल्हाद चाचांच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता फैसल मलिक सध्या 'रामायण' सिनेमातील कुंभकर्णाच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. IMDb च्या आठवड्याच्या लोकप्रिय कलाकारांच्या यादीत त्याने पहिला क्रमांक मिळवला असून, रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता यश दुसऱ्या क्रमांकावर आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 23, 2026 | 02:07 PM
IMDb (सौजन्य- सोशलमीडिया)

IMDb (सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • फैसल मलिक IMDb च्या यादीत नंबर १
  • यशला मागे टाकत कुंभकर्णची बाजी
  • VFX मुळे अभिनयाची पद्धत बदलली
‘पंचायत’ या फेमस वेबसीरिजमध्ये प्रल्हाद चाचांची भूमिका करून घराघरात पोहोचलेला अभिनेता फैसल मलिक सध्या चर्चेत आहे. नितेश तिवारी यांच्या पुढच्या ‘रामायण’ सिनेमात तो कुंभकर्णाच्या भूमिकेत दिसतो. खास म्हणजे, या भूमिकेमुळे फैसल मलिकने IMDb च्या आठवड्याच्या यादीत पहिला नंबर पटकावलाय. त्याने अभिनेता यशला मागे टाकलं आणि यश या यादीत दुसऱ्या नंबरवर आहे. IMDb

फैसल मलिकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘रामायण‘मधल्या कुंभकर्णाच्या भूमिकेबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या. या सिनेमाचं शूटिंग करताना नेहमीच्या अभिनयाच्या पद्धती बाजूला ठेवाव्या लागल्याचं त्याने सांगितलं. तसेच पडद्यावर रावणाची भूमिका करणाऱ्या यशसोबत काम करण्याचा अनुभव पण त्याने कधी न विसरण्यासारखा असल्याचं म्हटलं.

IMDb च्या यादीत फैसल मलिक पहिला

‘पंचायत’ या वेबसीरिजमधल्या उपप्रधान प्रल्हाद चाचांच्या भूमिकेमुळे फैसल मलिकला खूप प्रसिद्धी मिळाली. आता ‘रामायण’मधल्या कुंभकर्णाच्या भूमिकेमुळे तो परत चर्चेत आला. IMDb च्या आठवड्याच्या फेमस कलाकारांच्या यादीत फैसलने पहिला नंबर मिळवला. तर त्याचा मोठा भाऊ रावणाची भूमिका करणारा यश दुसऱ्या जागेवर आहे.

या सिनेमातल्या अभिनयाच्या अनुभवाबद्दल फैसल म्हणाला, “हा सिनेमा बऱ्याच अंशी VFX वर आधारलेला आहे. त्यामुळे इथे नेहमीच्या पद्धतीने अभिनय करून चालत नाही. मला अभिनयाच्या जुन्या पद्धती विसराव्या लागल्या. या सिनेमासाठी काम करण्याची एक वेगळी पद्धत आहे. त्यासाठी टीमने आम्हाला खास ट्रेनिंग दिलं आणि ते खूप महत्वाचं होतं.”

यशसोबत काम करण्याचा अनुभव कधी न विसरण्यासारखा

सिनेमात यशसोबत फैसलचे काही महत्वाचे सीन्स आहेत. याबद्दल बोलताना तो म्हणाला, “सिनेमाचं बरंचसं शूटिंग वेगवेगळं करण्यात आलं. पण, दुसऱ्या भागात यशसोबत माझे काही महत्वाचे सीन्स आहेत. रावण कुंभकर्णाच्या हातावरून चालताना आणि त्याला आशीर्वाद देतानाचा प्रसंग आपण बघितला. हा सीन वेगळा शूट करण्यात आला होता.

त्यात डोळे, चेहऱ्यावरचे हावभाव आणि शरीराच्या हालचाली यांच्याकडे खास लक्ष द्यावं लागलं.” पुढे तो म्हणाला, “आम्ही ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’ आणि ‘अवतार’ या सिनेमांच्या मेकिंगचे व्हिडीओ बघितले होते. पण, इथे स्वतः या भव्य प्रक्रियेचा भाग होण्याची संधी मिळाली. भारतीय सिनेमात यापुढेही यापेक्षा भव्य काहीतरी बघायला मिळेल, असं मला वाटत नाही.”

Salim Kodathur Health News: फेअरनेस क्रीमचा वापर पडला महागात! प्रसिद्ध गायकाचा दावा; किडनीचा गंभीर आजार अन् पायांना सूज

व्हायरल मीम्स आणि रिल्सवर पण दिली प्रतिक्रिया

‘रामायण’ला मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल फैसलने आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, “लोक मला सोशल मीडियावर रील्समध्ये टॅग करतायत. खासकरून माझ्या एन्ट्रीच्या सीनचे व्हिडीओ व्हायरल होतायत. त्यांना लाखो व्ह्यूज मिळतायत. ‘पंचायत’ साठी पण मला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं होतं. त्यावेळी पण लोकांनी बऱ्याच रील्स आणि मीम्स बनवले होते.

पण आता लोक थिएटरमध्ये जाऊन सिनेमातले सीन्स रेकॉर्ड करतायत आणि इन्स्टाग्रामवर त्यांचा अक्षरशः पूर आलाय. हे बघून खूप छान वाटतंय. प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतं.”

AR Rahman यांचा धक्कादायक खुलासा! ‘रामायण’साठी १०-१२ प्रोजेक्ट्सना दिला नकार; ट्रोलिंगवरही दिलं सडेतोड उत्तर

 ‘रामायण’ सिनेमाबद्दल

नमित मल्होत्रा यांची निर्मिती असलेला आणि नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा भव्य सिनेमा 5 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. या सिनेमात रणबीर कपूर, यश, साई पल्लवी, रवी दुबे, अरुण गोविल आणि रकुल प्रीत सिंग सारखे कलाकार महत्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

Web Title: Faisal malik imdb top ramayana kumbhakarna rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • Ramayana
  • Ramayana Movie
  • Yash

संबंधित बातम्या

Auto Rickshaw Strike: रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा एल्गार; कोल्हापुरातही बंदला प्रतिसाद, प्रवाशांना फटका
1

Auto Rickshaw Strike: रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा एल्गार; कोल्हापुरातही बंदला प्रतिसाद, प्रवाशांना फटका

नर्स भरतीत 80:20 चा फॉर्म्युला का? लिंगभेद नको, समान संधी द्या! विद्यार्थ्यांचा सरकारकडे आग्रह
2

नर्स भरतीत 80:20 चा फॉर्म्युला का? लिंगभेद नको, समान संधी द्या! विद्यार्थ्यांचा सरकारकडे आग्रह

Ananya Agarwal’s Cafe: वयाच्या २१ व्या वर्षी बनला उद्योजक! नोकरीच्या मागे न लागता सुरू केला कॅफे, अडीच महिन्यांत २२ लाखांची कमाई
3

Ananya Agarwal’s Cafe: वयाच्या २१ व्या वर्षी बनला उद्योजक! नोकरीच्या मागे न लागता सुरू केला कॅफे, अडीच महिन्यांत २२ लाखांची कमाई

Salim Kodathur Health News: फेअरनेस क्रीमचा वापर पडला महागात! प्रसिद्ध गायकाचा दावा; किडनीचा गंभीर आजार अन् पायांना सूज
4

Salim Kodathur Health News: फेअरनेस क्रीमचा वापर पडला महागात! प्रसिद्ध गायकाचा दावा; किडनीचा गंभीर आजार अन् पायांना सूज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.