Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gaurav Khanna Viral Photos: रबर बुलेट लागून गौरव खन्ना जखमी; ‘खतरों के खिलाडी 15’मधील स्टंटवर नेटकऱ्यांचा संताप

Gaurav Khanna Viral Photos: 'खतरों के खिलाडी 15'मध्ये धोकादायक स्टंटदरम्यान गौरव खन्नाच्या पाठीवर रबर बुलेटचे निशाण उमटले आहेत. फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 04, 2026 | 08:33 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Gaurav Khanna Viral Photos: टेलिव्हिजनवरील लोकप्रिय स्टंट-आधारित रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 15′ सुरू झाल्यापासून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, नुकत्याच प्रसारित झालेल्या एका धोकादायक टास्कमुळे शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. स्पर्धक गौरव खन्ना याने टास्कनंतर आपल्या पाठीवरील जखमांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी शोच्या निर्मात्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

रोहित शेट्टी सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचा दुसरा भाग रविवारी प्रसारित झाला. या भागात गौरव खन्ना, विशाल आदित्य सिंह, करण वाही आणि शगुन शर्मा यांना पाठीवर रबर बुलेट्सचा मारा सहन करत शक्य तितक्या वेळ स्थिर उभे राहण्याचे आव्हान देण्यात आले होते. सर्वाधिक वेळ वेदना सहन करणारा स्पर्धक विजेता ठरणार होता, तर आधी हार मानणारा स्पर्धक पराभूत होणार होता.(Gaurav Khanna Viral Photos)

रबर बुलेट लागून गौरव खन्ना जखमी

या टास्कमध्ये गौरव खन्ना आणि शगुन शर्मा यांनी सर्वाधिक वेळ टिकून राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीव्र वेदनांमुळे दोघांनाही अखेर टास्क अर्धवट सोडावा लागला. एपिसोडनंतर गौरवने इंस्टाग्राम स्टोरीवर आपल्या पाठीवरील जखमांचा व्हिडिओ शेअर करत हा अनुभव आयुष्यातील सर्वात वेदनादायी असल्याचे सांगितले.

त्याने पोस्टमध्ये लिहिले, “टीव्हीवर हा टास्क पाहतानाही त्या वेदना पुन्हा जाणवत आहेत. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी अनुभव होता. आम्ही चौघांनीही हा त्रास सहन केला आणि माझ्या पाठीवर अजूनही त्या जखमांच्या खुणा आहेत.”

Entertainment News: २९ व्या वर्षी पूर्ण केलं कोट्यवधींचं स्वप्न! कोण आहे ‘ही’ अभिनेत्री? घराच्या नावाने वेधलं लक्ष

फोटो पाहून नेटकऱ्यांचा संताप

गौरवच्या पाठीवरील स्पष्ट जखमा पाहून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी या टास्कवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याची तुलना दिल्लीतील अलीकडील NEET आंदोलनादरम्यान कथितरित्या वापरण्यात आलेल्या पेलेट गनशी केली. काही युझर्सनी हा स्टंट “मनोरंजन नव्हे, तर छळ” असल्याची टीका केली.

मात्र, एपिसोडदरम्यान रोहित शेट्टी यांनी स्पष्ट केले की स्पर्धकांवर पेलेट गन नव्हे, तर रबर बुलेट्स वापरण्यात आल्या होत्या.

This is torture, not a task. #KKK15 #Khatronkekhiladi15 pic.twitter.com/7rSoeBpIfn — Anshika Singh (@AbXBajaj) August 3, 2026

रबर बुलेट्स किती धोकादायक?

आरोग्यविषयक संकेतस्थळ Healthlineच्या माहितीनुसार, रबर बुलेट्स या काइनेटिक इम्पॅक्ट प्रोजेक्टाइल्स (KIPs) या श्रेणीत मोडतात. या गोळ्यांचा वापर प्रामुख्याने पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा जमाव नियंत्रणासाठी करतात. त्यांना प्राणघातक नसलेले शस्त्र मानले जात असले, तरी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते त्यांच्यामुळे गंभीर दुखापत, कायमचे अपंगत्व आणि काही प्रकरणांमध्ये मृत्यूचाही धोका निर्माण होऊ शकतो.

Kangana Ranaut On Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हावर टीका करताना कंगनाने ओलांडली का मर्यादा? वक्तव्यामुळे नवा वाद

दरम्यान, ‘खतरों के खिलाडी 15’मधील हा स्टंट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, मनोरंजनासाठी अशा प्रकारचे धोकादायक टास्क आवश्यक आहेत का, असा प्रश्न अनेक प्रेक्षक उपस्थित करत आहेत.

Web Title: Gaurav khanna viral photos rubber bullet injury khatron ke khiladi 15 stunt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • Gaurav Khanna
  • Reality Show
  • Rohit Shetty

संबंधित बातम्या

Gaurav Khanna-Akanksha Chamola Divorce:  १० कोटींची पोटगी घेणार आकांक्षा चमोला?  अभिनेत्रीची प्रतिक्रिया व्हायरल
1

Gaurav Khanna-Akanksha Chamola Divorce: १० कोटींची पोटगी घेणार आकांक्षा चमोला? अभिनेत्रीची प्रतिक्रिया व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.