Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Genelia Deshmukh Ganeshotsav: सासू-सुनेचं गोड बॉण्डिंग, खास फोटोशूट; जिनिलीयाने दाखवली देशमुखांच्या गणेशोत्सवाची खास झलक

Genelia Deshmukh Ganeshotsav: जिनिलिया देशमुखने देशमुख कुटुंबीयांसोबत गणेशोत्सव साजरा करतानाची खास झलक शेअर केली. सासू वैशालींसोबतचा मराठमोळा लूक आणि गोड फोटो चर्चेत.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 15, 2026 | 09:04 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Genelia Deshmukh Ganeshotsav: गणेशोत्सवानिमित्त देशभरात सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटी मंडळीही आपल्या घरच्या बाप्पाचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करत आहेत. अभिनेत्री जिनिलिया देशमुखनेही सोशल मीडियावर आपल्या कुटुंबीयांसोबत गणेशोत्सव साजरा करतानाचे काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. देशमुख कुटुंबीयांचा पारंपरिक अंदाज आणि घरच्या गणपतीची सुंदर सजावट या फोटोंमधून पाहायला मिळत आहे.

देशमुखांच्या घरच्या बाप्पाचं थाटात आगमन

जिनिलियाची जाऊबाई दीपशिखा देशमुखने घरच्या गणपती बाप्पाच्या आगमनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संपूर्ण देशमुख कुटुंब एकत्र येऊन बाप्पाची मनोभावे पूजा करताना दिसत आहे. उकडीच्या मोदकांचा नैवेद्य, बाप्पाची आरती आणि पारंपरिक पद्धतीने केलेली सजावट याची सुंदर झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

गणपती बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने रितेश देशमुख आणि त्याच्या दोन्ही मुलांनी ट्विनिंग लूक केला आहे. वडील आणि मुलांचा हा खास अंदाजही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

जिनिलियाचा मराठमोळा लूक लक्षवेधी

गणेशोत्सवानिमित्त जिनिलियाने अतिशय सुंदर मराठमोळा लूक केला आहे. जिनिलिया आणि तिच्या सासूबाई वैशाली देशमुख यांनी यावेळी ट्विनिंग लूक केला होता. दोघींनीही पारंपरिक अंदाजात केलेलं हे फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

यातील जिनिलिया आणि तिच्या सासूबाईंचा एक गोड फोटो विशेष लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये सासू-सुनेची जोडी एकमेकींकडे पाहत मनसोक्त हसताना दिसत आहे. दोघींमधील प्रेमळ बॉण्डिंग या फोटोमधून पाहायला मिळत आहे.

जिनिलियाने गुलाबी आणि गोल्डन शेडची सुंदर साडी नेसली होती. गळ्यात पारंपरिक हार, साडीच्या पदरावर कमळाची फुलं, कानात मोत्याचे झुमके, केसात फूल आणि हातात हिरव्या बांगड्या असा तिचा पारंपरिक मराठमोळा लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

Maharashtra Film City Projects: बॉलिवूडसाठी मोठी बातमी! नाशिक आणि रामटेकमध्ये उभारणार नवी फिल्म सिटी; सरकारची योजना काय?

जिनिलियाने दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

जिनिलियाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला देशमुख परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! बाप्पा मोरया रे!”

जिनिलियाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “वॉव मोदक”, “दादा-वहिनी खूप सुंदर फोटो आहेत”, “परफेक्ट फॅमिली”, “रितेशने खरंच मुलांना उत्तम संस्कार दिले आहेत”, “हीच खरी परंपरा फोटो”, “वहिनी अन् आईसाहेबांचा फोटो… लय भारी” अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

देशमुख कुटुंबीयांचा हा पारंपरिक अंदाज आणि सासू-सुनेमधील गोड बॉण्डिंग सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला बाप्पाची भक्ती अन् धर्माच्या पलीकडचं नातं; मुस्लिम सेलिब्रिटींची श्रद्धा पाहून व्हाल थक्क

Web Title: Genelia deshmukh ganeshotsav ganpati traditional look deshmukh family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 09:04 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • genelia deshmukh
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Ratnagiri News: गावाकडच्या वाटा गजबजल्या! मुंबई-पुण्याहून लाखो भाविक कोकणात दाखल;
1

Ratnagiri News: गावाकडच्या वाटा गजबजल्या! मुंबई-पुण्याहून लाखो भाविक कोकणात दाखल;

Global Market Crash : नशीब… भारतातील शेअर बाजार आज बंद! शेजारील देशांच्या बाजारात हाहाःकार, काय नेमकी परिस्थिती?
2

Global Market Crash : नशीब… भारतातील शेअर बाजार आज बंद! शेजारील देशांच्या बाजारात हाहाःकार, काय नेमकी परिस्थिती?

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला बाप्पाची भक्ती अन् धर्माच्या पलीकडचं नातं; मुस्लिम सेलिब्रिटींची श्रद्धा पाहून व्हाल थक्क
3

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला बाप्पाची भक्ती अन् धर्माच्या पलीकडचं नातं; मुस्लिम सेलिब्रिटींची श्रद्धा पाहून व्हाल थक्क

Vasai Virar Heavy Rain : बाप्पाच्या स्वागताला पावसाचे विघ्न! वसई-विरारमध्ये गुडघाभर पाणी; पुढील काही दिवस…
4

Vasai Virar Heavy Rain : बाप्पाच्या स्वागताला पावसाचे विघ्न! वसई-विरारमध्ये गुडघाभर पाणी; पुढील काही दिवस…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.