Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Inspector Manju : “हेलिकॉप्टरमध्ये हिरो सारखी एन्ट्री ते स्फोट”,  ‘इन्स्पेक्टर मंजू’च्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांना दिला धक्का

Inspector Manju च्या नव्या प्रोमोमध्ये हेलिकॉप्टर स्फोटामुळे मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. सत्या–मंजू पुन्हा एकत्र आले असतानाच त्यांच्या नात्यावर संकट येणार का, याची उत्सुकता वाढली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 01, 2026 | 04:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मराठी टेलिव्हिजन विश्वात सध्या Inspector Manju ही मालिका प्रचंड चर्चेत आली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला या मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले आहेत. हेलिकॉप्टरमधून हिरोसारखी एन्ट्री आणि त्यानंतरचा स्फोट – या थरारक दृश्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. मालिकेच्या कथानकाने आता अत्यंत रंजक वळण घेतले असून पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

Michael Movie : सिनेमाने आणला भलताच ट्रेंड! Biopic पाहण्यासाठी चाहते उत्सुक, ‘Epstein Files आणि Michael Jackson’ चर्चेला उधाण

कथानकात सत्या आणि मंजू यांच्यातील नातं पुन्हा एकदा घट्ट झाल्याचं दिसत आहे. अनेक गैरसमजांनंतर हे दोघे पुन्हा एकत्र आले असून त्यांच्यातील प्रेम आणि विश्वास अधिक दृढ झाला आहे. मात्र, त्यांना वेगळं करण्यासाठी आर्यन सतत नवे डाव आखताना दिसतो. तरीही सत्या–मंजूचं नातं प्रत्येक संकटावर मात करतं, हे आतापर्यंतच्या भागांतून स्पष्ट झालं आहे. नव्या प्रोमोमध्ये सत्या पक्षाच्या कामासाठी दिल्लीला जाण्याची तयारी करताना दिसतो. मम्मीसाहेब आजारी असल्यामुळे ही जबाबदारी त्याच्यावर येते. मंजू त्याला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते, पण पक्षाकडून आलेल्या आदेशामुळे सत्या निघण्याचा निर्णय घेतो. यानंतरच प्रोमोमध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो – सत्या ज्या हेलिकॉप्टरने प्रवास करत असतो, त्याचा स्फोट होतो.

हा स्फोट अपघात आहे की कुणाचा कट, याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सत्या सुरक्षित आहे का? की हा प्रसंग सत्या–मंजूच्या नात्यात पुन्हा दुरावा निर्माण करणार आहे? या सर्व प्रश्नांनी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या असून “सत्या–मंजू कधीही वेगळे होऊ शकत नाहीत,” असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे. सत्या ही भूमिका साकारणारा Vaibhav Kadam यानेही या प्रोमोबद्दल आपला अनुभव शेअर केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, “नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात मेसेज येत आहेत. ‘तुझा खरंच अपघात होणार आहे का?’ किंवा ‘तुझी मालिकेतून एक्झिट होणार का?’ असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्विस्ट असणार आहे.”

Prajakta Mali : चाहत्याने केला प्रश्न “प्राजक्ता, तू लग्न कधी करणार?” अखेर अभिनेत्रीने उत्तर दिलेच

त्याने पुढे सांगितले की, हेलिकॉप्टरचा सीन शूट करण्यासाठी संपूर्ण टीम साताऱ्याहून पुण्याला गेली होती आणि अवघ्या एका तासात हा सीन पूर्ण करण्यात आला. “चित्रपटांमध्ये हिरोला हेलिकॉप्टरमधून एन्ट्री करताना पाहिलं होतं, पण माझ्या आयुष्यातही असा क्षण येईल, असं कधी वाटलं नव्हतं. तो अनुभव खूप खास होता,” असंही त्याने सांगितलं. आता या मालिकेत पुढे काय घडणार, सत्या खरोखरच संकटात सापडला आहे का, आणि मंजूच्या आयुष्यात कोणता नवा वळण येणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना २ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता Sun Marathi वर हा विशेष भाग पाहावा लागणार आहे.

Web Title: Inspector manju from a hero style entry in a helicopter to the explosion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 04:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.