Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lagn Aani Barach Kahi: लग्नाच्या पलीकडची गोष्ट! ‘लग्न आणि बरंच काही’मधून उमटणार स्त्रीशक्तीचा नवा आवाज

Lagn Aani Barach Kahi: बदलत्या काळासोबत मुलींचे शिक्षण, स्वावलंबन आणि विचारसरणी अधिक प्रगत होत आहे. पारंपरिक रूढी-परंपरा आणि आधुनिक विचार यांच्यातील संघर्ष तसेच महिलांना स्वातंत्र्याने पुढे जाताना येणाऱ्या अडचणींचे चित्रण ‘लग्न आणि बरंच काही’ या मराठी चित्रपटातून करण्यात आले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 18, 2026 | 07:30 PM
Lagn Aani Barach Kahi: लग्नाच्या पलीकडची गोष्ट! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Lagn Aani Barach Kahi: लग्नाच्या पलीकडची गोष्ट! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

Enteriment News: बदलत्या काळानुसार मुलींचे शिक्षण, स्वावलंबन आणि विचारसरणी प्रगत होत आहे. पारंपरिक रूढी-परंपरा आणि आधुनिक विचार यांची सांगड घालत महिलांना स्वातंत्र्याने पुढे जाताना येणाऱ्या समस्यांचे चित्रण ‘लग्न आणि बरंच काही’ या मराठी चित्रपटातून करण्यात आले आहे. हा चित्रपट तीन पिढ्यांतील महिलांना निश्चितच आपलासा वाटेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

स्त्रीशक्तीचा उत्सव

स्त्रियांनी स्त्रियांसाठी साकारलेला हा चित्रपट स्त्रीशक्तीचा उत्सव साजरा करणारा असून, बदलत्या सामाजिक परिस्थितीचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. मुलींसोबतच मुलांनाही या चित्रपटातून प्रगत विचार, नातेसंबंध आणि बदलत्या सामाजिक मूल्यांविषयी शिकण्यासारखे ‘बरंच काही’ मिळणार आहे.Lagn Aani Barach Kahi

चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

म्हाळसा एंटरटेंन्मेंट आणि अव्यान आर्टस् प्रस्तुत ‘लग्न आणि बरंच काही’ या चित्रपटाच्या कलाकारांनी मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले. यावेळी बाबासाहेब पाटील, चित्रपटाच्या निर्मात्या डॉ. संजना सुरेश पै आणि अंजली तुषार नान्नजकर, दिग्दर्शिका वेदांती दाणी यांच्यासह अनेक सहकारी व चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे सदस्य उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या, मुलीच्या दृष्टिकोनातून तिच्या जन्मापासून बालपण, किशोरवय आणि वयात येईपर्यंतच्या आयुष्यात आलेले विविध अनुभव या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे आजीच्या पिढीपासून आईची पिढी, आजची पिढी तसेच पुढील पिढीतील महिलांनाही या चित्रपटातील कथानक आणि अनुभवांशी नाते जोडता येईल.

Entertainment News: आठ भाषा… एक भावना… आणि एक राष्ट्रगीत! भारताच्या विविधतेचा अनोखा संगीतसोहळा

‘लग्न आणि बरंच काही’ हा चित्रपट

महिलेच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना आणि टप्पे घडत असताना तिच्या स्वतःच्या आकांक्षा, अपेक्षा आणि दृष्टिकोनही असतात. या दोन्हींचा समतोल कसा साधता येईल, हा महत्त्वपूर्ण विषय चित्रपटातून हलक्या-फुलक्या आणि संवेदनशील पद्धतीने मांडण्यात आला आहे, असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.

Mirzapur The Movie: ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी खास सरप्राइज! श्रेया घोषाल-रोमीच्या आवाजात ‘वारुँ फॉरएवर’ रिलीज

‘लग्न आणि बरंच काही’ हा चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक महिलेला तसेच विशेषतः पुरुषांनाही महिलांच्या अनुभवांकडे आणि त्यांच्या भावविश्वाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळेल. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देत, या चित्रपटातून प्रेक्षकांना निश्चितच काहीतरी नवीन शिकायला मिळेल, असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

Web Title: Lagna ani barach kahi marathi film explores womens empowerment and changing social values

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • Aditi Tatkare
  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

चीनला धक्का? लडाखमधील 28 ठिकाणांची नावे आता भारताच्या अधिकृत नकाशावर; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश
1

चीनला धक्का? लडाखमधील 28 ठिकाणांची नावे आता भारताच्या अधिकृत नकाशावर; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश

Flydubai Flight 1073 : फ्लायदुबई विमान पाडण्याचा प्रयत्न दहशतवाद?; तपासाला राजकीय कृत्याची दिशा
2

Flydubai Flight 1073 : फ्लायदुबई विमान पाडण्याचा प्रयत्न दहशतवाद?; तपासाला राजकीय कृत्याची दिशा

World News : युरोपचा मोठा निर्णय; साठवलेले डिझेल बाजारात आणणार, इंधनाच्या दरांना दिलासा मिळण्याची शक्यता
3

World News : युरोपचा मोठा निर्णय; साठवलेले डिझेल बाजारात आणणार, इंधनाच्या दरांना दिलासा मिळण्याची शक्यता

Daund News : पोलिसांची एकाच दिवशी धडक कारवाई; अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यावर छापा, ७ जणांवर गुन्हे दाखल
4

Daund News : पोलिसांची एकाच दिवशी धडक कारवाई; अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यावर छापा, ७ जणांवर गुन्हे दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.