Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिजीत सावंतचं नवं कोरं गाणं ‘सखे गं साजणी’! प्रदर्शित होताच करतंय मनावर राज्य

‘सखे गं साजणी’ हा मराठी चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून त्याचे शीर्षक गीत अनोख्या पद्धतीने पुण्यातील Elpro City Square Mall येथे फ्लॅश मॉबमधून सादर करण्यात आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 14, 2026 | 01:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री, प्रवास आणि आनंदाचा उत्सव साजरा करणारा सखे गं साजणी हा चित्रपट येत्या ३ एप्रिल २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याचे शीर्षक गीत अनोख्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले. पुण्यातील Elpro City Square Mall येथे फ्लॅश मॉबच्या माध्यमातून या गाण्याचे विशेष प्रदर्शन करण्यात आले. अचानक सुरू झालेल्या या सादरीकरणाने मॉलमधील वातावरण क्षणातच रंगतदार झाले. उपस्थित प्रेक्षकांनीही या उत्साहात सामील होत टाळ्यांचा कडकडाट आणि नृत्याच्या स्टेप्ससह कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

”मी दाऊदच्या बहिणीचा बॉडीगार्ड होतो…”, अंडरवर्ल्ड पाहिलेले नाट्य निर्माते अशोक शिगवण यांचे वक्तव्य चर्चेत

चित्रपटातील हे शीर्षक गीत मैत्री, मस्ती आणि प्रवासातील आनंददायी क्षणांची रंगतदार झलक दाखवते. गाण्यात अभिनेत्री प्रार्थना बेहरे, पूजा सावंत आणि अभिनेता अभिजीत खांडकेकर यांची धमाल केमिस्ट्री पाहायला मिळते. तिघांच्या मैत्रीतील खट्याळ क्षण, प्रवासातील मजा आणि जीवनाचा आनंद साजरा करणारी दृश्ये या गाण्यातून प्रेक्षकांसमोर येतात. रंगीबेरंगी लोकेशन्स, जोशपूर्ण नृत्य आणि उत्साही वातावरणामुळे हे गाणे चित्रपटाच्या भावविश्वाला अधिक खुलवते.

या गाण्याला आवाज दिला आहे लोकप्रिय गायक अभिजीत सावंत यांनी. संगीत दिग्दर्शन विजय भाटे यांचे असून, गाण्याचे बोल लखन चौधरी यांनी लिहिले आहेत. गाण्यातील रॅपचे शब्द आणि सादरीकरण रोहन तुपे यांनी केले असून, संगीत संयोजन आणि निर्मितीची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. त्यामुळे पारंपरिक आणि आधुनिक संगीताचा सुंदर मिलाफ या गाण्यात अनुभवायला मिळतो.

या गाण्यातील वाद्यसंगीतालाही विशेष महत्त्व आहे. शहनाई आणि क्लॅरिनेटचे मधुर सूर दुर्गेश भोसले यांनी साकारले आहेत. कोरस आणि पार्श्वगायन श्वेता ठाकूर, वैभवी पंचागणे आणि मानसी जगताप यांनी केले असून, अतिरिक्त गायन ऋषभ साठे यांचे आहे.

ध्वनिमुद्रणाच्या प्रक्रियेतही अनेक कलाकारांनी आपले योगदान दिले आहे. शहनाई आणि कोरसचे ध्वनिमुद्रण आलोप स्टुडिओ येथे कौशल व्हीजी यांनी केले, तर मुख्य गायनाचे ध्वनिमुद्रण एएमव्ही स्टुडिओमध्ये हर्ष भोईर यांच्या देखरेखीखाली पार पडले. या प्रक्रियेत ध्वनिमुद्रण सहाय्यक म्हणून यश जोशी यांनी काम पाहिले.

रसिक प्रेक्षकांसाठी खास संगीत भेट, Tara आणि स्टार प्लसने सुप्रसिद्ध गाणं “परदेसिया”ला दिला नवा ट्विस्ट!


एकूणच उत्साही संगीत, प्रवासाची मस्ती आणि कलाकारांची ऊर्जा यामुळे ‘सखे गं साजणी’चे हे शीर्षक गीत प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. फ्लॅश मॉबच्या माध्यमातून केलेले अनोखे सादरीकरण, जोशपूर्ण नृत्य आणि मैत्रीचा रंगतदार उत्सव यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे. ३ एप्रिलला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना ही मैत्री आणि प्रवासाची गोष्ट मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

Web Title: Latest song of abhijeet sawant sakhe ga sajani got released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • abhijeet sawant
  • News Song
  • viral Song

संबंधित बातम्या

Nora Fatehi च्या ‘सरके चुनर’ गाण्याची गायिका कोण? ९ वर्षांत ८० हून अधिक गाणी, आता करतेय ट्रोलिंगचा सामना
1

Nora Fatehi च्या ‘सरके चुनर’ गाण्याची गायिका कोण? ९ वर्षांत ८० हून अधिक गाणी, आता करतेय ट्रोलिंगचा सामना

Latest Marathi Song : Pravin Koli चा ‘स्वामी समर्थ’ गाणं प्रदर्शित! अंकिता मेस्त्री झळकणार मुख्य भूमिकेत
2

Latest Marathi Song : Pravin Koli चा ‘स्वामी समर्थ’ गाणं प्रदर्शित! अंकिता मेस्त्री झळकणार मुख्य भूमिकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.