Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahalakshmi Ravinder:महालक्ष्मी अन् रविंदर पुन्हा चर्चेत; पैशांसाठी निर्मात्याशी दुसरं लग्न केलं? अभिनेत्रीने पोस्ट करत दिलं उत्तर

Mahalakshmi Ravinder: साऊथ अभिनेत्री महालक्ष्मी आणि निर्माते रविंदर चंद्रशेखरन पुन्हा चर्चेत आले आहेत. पैशांसाठी लग्न केल्याच्या आरोपांवर महालक्ष्मीने सोशल मीडिया पोस्टद्वारे उत्तर देत त्यांची प्रेमकहाणी सांगितली.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 03, 2026 | 10:04 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Mahalakshmi Ravinder: साऊथ अभिनेत्री महालक्ष्मी शंकरन आणि तिचे पती, निर्माते रविंदर चंद्रशेखरन त्यांच्या लग्नापासूनच चर्चेत आहेत. रविंदर यांच्या वजनावरून आणि दोघांच्या वयातील अंतरावरून या जोडप्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. महालक्ष्मीने पैशांसाठी रविंदर यांच्याशी लग्न केल्याचा आरोपही अनेकांनी केला होता. आता लग्नाच्या चार वर्षांनंतर हे जोडपं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. महालक्ष्मीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्रोलर्सना उत्तर दिलं असून, रविंदरसोबतची तिची प्रेमकहाणीही सांगितली आहे.

‘हे सर्व तिरुपतीपासून सुरू झालं…’

महालक्ष्मीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्यांच्या नात्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली, “हे सर्वकाही तिरुपतीपासूनच सुरू झालं होतं. आमचं आयुष्य, आमचा प्रवास आणि एक नवीन सुरुवात याच ठिकाणापासून झाली.”

पुढे प्रेमाबद्दल बोलताना तिने लिहिलं की, इतर लोक आपल्या नात्याकडे कोणत्या नजरेने पाहतात, काय बोलतात किंवा कोणत्या कमेंट्स करतात, याला प्रेम म्हणता येत नाही. आपल्याला एकमेकांबद्दल काय वाटतं, आपण एकमेकांची किती काळजी घेतो आणि एकमेकांना कसं सुरक्षित ठेवतो, हेच खरं प्रेम आहे. तिच्या या पोस्टमधून महालक्ष्मीने ट्रोलर्सना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे.

चित्रपटाच्या सेटवर झाली होती पहिली भेट

महालक्ष्मी आणि रविंदर यांची पहिली भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. रविंदर या चित्रपटाचे निर्माते होते, तर महालक्ष्मी त्यात अभिनय करत होती. एकत्र काम करताना दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. रविंदर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, लग्न करण्यापूर्वी ते दोघे सुमारे दीड वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.

अखेर १ सप्टेंबर २०२२ रोजी दोघांनी तिरुपती येथे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या जोडप्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती.

Ramayana: ‘रामायण’च्या स्टारकास्टमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण? रणबीर कपूरपासून यशपर्यंत जाणून घ्या कलाकारांची संपत्ती

Ant Ek Prarambh: अतुल परचुरेंचा शेवटचा चित्रपट OTTवर; ‘अंत एक प्रारंभ’मधून मिळणार अभिनयाची अनमोल भेट

दोघांचंही आहे दुसरं लग्न

महालक्ष्मी आणि रविंदर या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. महालक्ष्मीचं पहिलं लग्न अनिल कुमार यांच्याशी झालं होतं. त्यांना एक मुलगाही आहे. मात्र, काही वर्षांनंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

वयाच्या अंतरावरूनही झालं होतं ट्रोलिंग

२०२२ मध्ये महालक्ष्मी आणि रविंदर यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काहींनी या जोडप्याचं अभिनंदन केलं, तर काहींनी महालक्ष्मीने पैशांसाठी लग्न केल्याचा आरोप केला. दोघांच्या वयात २० वर्षांचं अंतर असल्याची चर्चाही रंगली होती. लग्नाच्या वेळी रविंदर यांचं वय ५२, तर महालक्ष्मीचं वय ३२ असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, या जोडप्याने हा दावा चुकीचा असल्याचं सांगत आपल्यात केवळ सहा वर्षांचं अंतर असल्याचं स्पष्ट केलं होतं.

रविंदर यांच्या दिसण्यावरून किंवा वजनावरून होणाऱ्या टीकेलाही महालक्ष्मीने यापूर्वी विरोध केला होता. ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत तिने कायम पतीची साथ दिली. आता पुन्हा एकदा पोस्ट शेअर करत तिने त्यांच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि एकमेकांची काळजी यांना महत्त्व असल्याचं अधोरेखित केलं आहे.

Web Title: Mahalakshmi ravinder chandrasekaran love story trolling instagram post ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • entertainment
  • Hindi Actress

संबंधित बातम्या

Kon Honaar Crorepati: नऊवारी साडीत माधुरी दीक्षितची दिमाखदार एन्ट्री; ‘या’ दोन अभिनेत्रींच्या गप्पांनी रंगणार करोडपतीचा मंच!
1

Kon Honaar Crorepati: नऊवारी साडीत माधुरी दीक्षितची दिमाखदार एन्ट्री; ‘या’ दोन अभिनेत्रींच्या गप्पांनी रंगणार करोडपतीचा मंच!

Ramayana: ‘रामायण’च्या स्टारकास्टमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण? रणबीर कपूरपासून यशपर्यंत जाणून घ्या कलाकारांची संपत्ती
2

Ramayana: ‘रामायण’च्या स्टारकास्टमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण? रणबीर कपूरपासून यशपर्यंत जाणून घ्या कलाकारांची संपत्ती

Shiv Thakare: यशाची हवा डोक्यात जाऊ नये म्हणून काय करतो शिव ठाकरे? माधुरी दीक्षितसमोर दिलं उत्तर
3

Shiv Thakare: यशाची हवा डोक्यात जाऊ नये म्हणून काय करतो शिव ठाकरे? माधुरी दीक्षितसमोर दिलं उत्तर

Bandhu Marathi Movie: कधी भांडणं, कधी रुसवे तर कधी जीवापाड प्रेम! उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींच्या ‘बंधू’चा ट्रेलर प्रदर्शित
4

Bandhu Marathi Movie: कधी भांडणं, कधी रुसवे तर कधी जीवापाड प्रेम! उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींच्या ‘बंधू’चा ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.