Ant Ek Prarambh: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
याच भावनेला स्पर्श करणारा ‘अंत एक प्रारंभ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्येष्ठ अभिनेते ‘अतुल परचुरे’ यांचा शेवटचा चित्रपट म्हणूनही या कलाकृतीला विशेष महत्त्व आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, ६ नोव्हेंबर २०२६ ला या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे. Ant Ek Prarambh:
राजवीर आणि प्रद्युम्न या दोन भावांची ही कथा आहे. धाकटा भाऊ राजवीर कुटुंबाचा व्यवसाय सांभाळतो, तर मोठा भाऊ प्रद्युम्न स्वतःची कामे करू शकत नसल्याने त्याला सतत मदतीची गरज असते. कामाच्या व्यापामुळे राजवीरला आपल्या भावासोबत पुरेसा वेळ घालवता येत नाही. त्यामुळे प्रद्युम्नची काळजी घेण्यासाठी तो एका केअरटेकरला त्यांच्या सोबत ठेवतो. मात्र, त्याचा हा निर्णय पुढे अनेक अनपेक्षित घटनांना कारणीभूत ठरतो आणि त्यांच्या नात्याची वेगळी बाजू समोर आणतो.
या कथेतून दोन भावांमधील निःस्वार्थ प्रेम, नात्यांमधील जबाबदारी आणि आपल्या माणसांसाठी घेतलेल्या निर्णयांचं महत्त्व उलगडतं. आजच्या Gen Z पिढीला स्वतःची ओळख निर्माण करताना, करिअर आणि स्वतंत्र आयुष्य जगताना कुटुंबासाठी वेळ देणं किती महत्त्वाचं आहे, याची जाणीव हा चित्रपट करून देतो. ‘अंत एक प्रारंभ’ ही कथा नात्यांकडे केवळ कर्तव्य म्हणून न पाहता, प्रेम, आपुलकी आणि समजूतदारपणाच्या नजरेतून पाहण्याचा एक हळवा संदेश देते.
या चित्रपटाचं आणखी एक भावनिक वैशिष्ट्य म्हणजे दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांचा सहभाग. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि विनोदाच्या खास शैलीने त्यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करतं. त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित होणारा हा त्यांचा शेवटचा चित्रपट असल्याने, त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहणं चाहत्यांसाठी खास अनुभव ठरणार आहे.
दत्ता मोहन भंडारे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले असून, वसीम फरास, अतुल परचुरे, मोहन जोशी आणि गिरीश ओक हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ६ नोव्हेंबर २०२६ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे.






