Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bandhu Marathi Movie: कधी भांडणं, कधी रुसवे तर कधी जीवापाड प्रेम! उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींच्या ‘बंधू’चा ट्रेलर प्रदर्शित

Bandhu Marathi Movie: उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘बंधू’ मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दोन भावांच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत पाहायला मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 02, 2026 | 04:15 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Bandhu Marathi Movie:मराठी मनोरंजन विश्वात कौटुंबिक नात्यांवर आधारित अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता याच नात्यांमधील प्रेम, भांडणं, रुसवे-फुगवे आणि त्यागाची हृदयस्पर्शी गोष्ट घेऊन ‘बंधू’ हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यातून दोन भावांमधील नात्याचे विविध भावनिक पैलू उलगडताना दिसत आहेत. उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रभावी अभिनयाची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. हा चित्रपट येत्या २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला असून, तो ट्रेंडिंगमध्येही आला आहे. कधी एकमेकांशी भांडणारे, कधी रुसणारे, तर कधी स्वतःपेक्षाही दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करणारे दोन भाऊ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहेत. कितीही मतभेद झाले किंवा दुरावा निर्माण झाला, तरी मनाच्या एका कोपऱ्यात एकमेकांसाठी असलेली जागा कायम असते, याची जाणीव करून देणारी ही कथा आहे.

उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी साकारणार भावांची भूमिका

रजत बेदी प्रस्तुत, जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेनमेंट यांच्या सहकार्याने हा चित्रपट साकारण्यात आला आहे. प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी केले आहे.

‘आटपाडी नाईट्स’ आणि ‘सरला एक कोटी’ या चित्रपटांनंतर नितीन सुपेकर पुन्हा एकदा मानवी नात्यांच्या भावविश्वाचा वेध घेणारी कथा घेऊन येत आहेत. ‘बंधू’मध्ये उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी दोन भावांच्या प्रमुख भूमिका साकारत आहेत. त्यांच्या सहचारिणींच्या भूमिकेत मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे दिसणार आहेत.

यांच्यासह रेणुका दफ्तरदार, स्मिता तांबे, श्रीकांत यादव, विठ्ठल काळे, यशपाल सरणात, ज्ञानरत्न अहिवळे, चैतन्य सोलणकर, श्रीपाद पानसे, बालकलाकार शौर्य पाटील, देवा गाडेकर, वर्षा अजित, प्रशांत जाधव, अनिल कांबळे आणि प्रणाली भालेराव हे कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.

 

रजत बेदी म्हणाले, ‘बंधू’ची कथा मनाला स्पर्श करणारी

चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता रजत बेदी यांनी या चित्रपटाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “चांगल्या कथा भाषेच्या सीमा ओलांडून प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचतात. ‘बंधू’ची कथा अशीच मनाला स्पर्श करणारी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेमाशी प्रस्तुतकर्ता म्हणून जोडले जाणं माझ्यासाठी एक खास अनुभव आहे. उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी आणि इतर कलाकारांनी आपल्या अभिनयातून या नात्याचं भावविश्व जिवंत केलं आहे. प्रेक्षकांनीही या चित्रपटाला आपलंसं करावं, हीच अपेक्षा आहे.”

‘बंधू’च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार रामदास आठवले यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी ट्रेलरचे कौतुक करत संपूर्ण टीमला चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.

Ila Bhate: अजरामर व्यक्तिरेखा आणि अभिनयाचा समृद्ध वारसा! इला भाटेंचा झी मराठीकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

गुरू ठाकूर, वैभव देशमुख यांच्या गीतांना लोकप्रिय गायकांचा आवाज

चित्रपटातील गीतांना गुरू ठाकूर आणि वैभव देशमुख यांनी शब्दबद्ध केले असून, विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिले आहे. लोकप्रिय गायक अजय-अतुल, अमिता घुगरी आणि शमिका भिडे यांच्या आवाजाची साथ या गीतांना लाभली आहे. चित्रपटातील गाण्यांचे संगीत हक्क झी म्युझिककडे आहेत.

नृत्यदिग्दर्शन अविनाश नलावडे आणि नील राठोड यांनी केले आहे. वेशभूषेची जबाबदारी कीर्ती जंगम यांनी, तर रंगभूषा समीर रमेश कदम यांनी सांभाळली आहे. हर्षद आत्माराम गायकवाड यांनी छायांकन केले असून, अतिरिक्त छायांकन योगेश कोळी यांचे आहे. वैभव दाभाडे आणि वासिम मुल्ला यांनी संकलन केले आहे, तर साहसदृश्ये बब्बू खन्ना यांनी साकारली आहेत.

दोन भावांमधील प्रेम, जिव्हाळा, मतभेद आणि त्याग यांची गोष्ट सांगणारा ‘बंधू’ हा चित्रपट २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या भावनिक कौटुंबिक चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

lokshahir Vitthal Umap: लोककलेचा स्वर, आठवण लोकशाहीरांची! विठ्ठल उमप यांच्या १६व्या स्मृती संगीत समारोहाचे आयोजन

Web Title: Bandhu marathi movie trailer upendra limaye jitendra joshi release date ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

Tejas Deoskar: भय, गूढता आणि कल्पनारम्यतेचा अनोखा संगम! तेजस देऊस्करांच्या हॉरर फँटसी चित्रपटाचा श्रीगणेशा
1

Tejas Deoskar: भय, गूढता आणि कल्पनारम्यतेचा अनोखा संगम! तेजस देऊस्करांच्या हॉरर फँटसी चित्रपटाचा श्रीगणेशा

lokshahir Vitthal Umap: लोककलेचा स्वर, आठवण लोकशाहीरांची! विठ्ठल उमप यांच्या १६व्या स्मृती संगीत समारोहाचे आयोजन
2

lokshahir Vitthal Umap: लोककलेचा स्वर, आठवण लोकशाहीरांची! विठ्ठल उमप यांच्या १६व्या स्मृती संगीत समारोहाचे आयोजन

Dia Mirza: दिया मिर्झा आणि अमित साटम यांच्यात शाब्दिक वाद, दिवाळीच्या व्हिडीओवरून नेमकं काय घडलं?
3

Dia Mirza: दिया मिर्झा आणि अमित साटम यांच्यात शाब्दिक वाद, दिवाळीच्या व्हिडीओवरून नेमकं काय घडलं?

Ila Bhate: अजरामर व्यक्तिरेखा आणि अभिनयाचा समृद्ध वारसा! इला भाटेंचा झी मराठीकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
4

Ila Bhate: अजरामर व्यक्तिरेखा आणि अभिनयाचा समृद्ध वारसा! इला भाटेंचा झी मराठीकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.