Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Marathi Actor New Home: मराठीतला सगळ्यांचा लाडका विनोदी अभिनेता अंशुमन विचारे आणि त्याची पत्नी पल्लवी हे दोघे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. त्यांची छोटी मुलगी अन्वी सोबत ते नेहमी मजेशीर रील बनवतात. त्यांचे व्हिडीओ लोकांना खूप आवडतात. आता त्यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
अंशुमन आणि पल्लवीने त्यांच्या नवीन घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. हे घर म्हणजे त्यांचं अनेक दिवसांचं स्वप्न होतं आणि आता ते स्वप्न पूर्ण झालं आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक खूप सुंदर गाणं लावलं आहे – “देखो मैंने देखा है ये एक सपना… फूलों के शहर में है घर अपना…” या गाण्यावर अंशुमन, पल्लवी आणि त्यांची छोटी अन्वी तिघांनी मिळून मस्त डान्स केला आहे. तो व्हिडीओ बघूनच कळतंय की ते किती खुश आहेत. Anshuman Vichare New House:
पल्लवीने व्हिडीओला एक सुंदर कॅप्शन पण दिलं आहे. ती म्हणाली, “एकेकाळी पाहिलेलं स्वप्न, आणि आता आपलं हक्काचं घर… इथल्या प्रत्येक कोपऱ्यात एक छोटीशी गोष्ट दडली आहे, प्रत्येक गोष्टीत आमचा एक अंश सामावलेला आहे. आमच्या या नवीन घरात तुमचे स्वागत आहे. प्रेम, स्वप्ने, हास्य आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या असंख्य सुंदर आठवणींनी भरलेले हे एक घर असे त्या व्हिडिओमध्ये सांगितले . “तिच्या या पोस्टवर मराठी इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
व्हिडीओमध्ये त्यांचं नवीन घर आतून पण दाखवलं आहे. घराचा हॉल खूप मोठा आणि सुंदर आहे. एकदम प्रशस्त आहे. हॉलमध्ये ऑफ-व्हाइट रंगाचा मोठा सोफा ठेवला आहे ज्यामुळे हॉलला एक वेगळाच लूक आला आहे. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे टीव्ही युनिटच्या वरच्या बाजूला अंशुमनने आजपर्यंत जिंकलेल्या ट्रॉफीज ठेवल्या आहेत. त्याने आपल्या अभिनयाने मिळवलेले पुरस्कार तिथे मांडले आहेत, ते बघून खूप अभिमान वाटतो.
View this post on Instagram
सगळ्यात क्युट गोष्ट म्हणजे त्याने त्याची लाडकी लेक अन्वीसाठी एक खास बेडरूम बनवली आहे. छोट्या अन्वीसाठी एकदम सुंदर, रंगीबेरंगी बेडरूम तयार केली आहे. प्रत्येक आई-वडील आपल्या मुलीसाठी असंच स्वप्न बघतात आणि अंशुमनने ते करून दाखवलं आहे.एका छोट्या स्वप्नातून सुरू झालेला प्रवास आज एका सुंदर घरापर्यंत आला आहे. अंशुमन आणि पल्लवीच्या या नवीन घराच्या व्हिडीओने सगळ्यांचं मन जिंकलं आहे. त्यांच्या या आनंदात सगळे चाहते सहभागी झाले आहेत.
Entrainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच काळाचा घाला; ४४ वर्षीय भारतीय गायकाचा दुबईत मृत्यू






