Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bol Bol Rani Trailer : संवाद, स्टोरी, सई… सगळंच सरस! ‘आगीत काय जळालं, ते राखेलाच माहिती’; बेधडक सईचा थरारक सिनेमा

'बोल बोल राणी'चा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. सई ताम्हणकरच्या दमदार आणि रहस्यमय भूमिकेचे अनेकांनी भरभरून कौतुक केले आहे. ट्रेलरमधील थरार, सस्पेन्स आणि कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 02, 2026 | 03:43 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • चित्रपट १७ जुलै रोजी प्रदर्शित होणार
  • सईचे दोन वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात
  • चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होणार.
अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी सिनेसृष्टीतील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. मराठी सिनेविश्वाच्या पलीकडे जाऊन तिने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता सई नव्या ‘बोल बोल राणी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, यामध्ये ती एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे. कदाचित एका खुनीच्या भूमिकेतही! हा चित्रपट १७ जुलै रोजी प्रदर्शित होणार असून, त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा जल्लोषात पार पडला संगीत अनावरण सोहळा,’एनर्जीने भरलेल्या गाण्यांनी जिंकली प्रेक्षकांची मनं

या ट्रेलरमध्ये सईचे दोन वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात. एका बाजूला पतीसोबत संसार करणारी साधी स्त्री, तर दुसऱ्या बाजूला डॅशिंग आणि रहस्यमय व्यक्तिमत्त्व असलेली महिला. मात्र, दोन्ही अवतारांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे थरार. ट्रेलरमधील प्रत्येक क्षणागणिक कथेला नवे वळण मिळते. केवळ तिचा पतीच नव्हे, तर स्वतः सईही या चित्रपटात अत्यंत क्रूर अवतारात दिसत आहे. सहसा ट्रेलर पाहून चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज येतो, मात्र ‘बोल बोल राणी’चा ट्रेलर प्रेक्षकांना पूर्णपणे संभ्रमात टाकतो. त्यामुळे चित्रपटाचे रहस्य अखेरपर्यंत कायम राहते. नेमकी कथा काय आहे, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

या चित्रपटात सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत असून, तिच्या पतीच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर दिसणार आहेत. तर सुबोध भावे पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सिड विनसूरकर यांनी केले असून, निर्मिती सिड विनसूरकर आणि अमित भानुशाली यांनी केली आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्याचे कौतुक केले असून, विशेषतः सई ताम्हणकरच्या दमदार अभिनयाचे भरभरून कौतुक केले जात आहे.

Khashaba Teaser: नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा दमदार टीझर आउट, टीझरमध्ये दडला मोठा सस्पेन्स; मुख्य अभिनेता कोण?

प्रेक्षकांनी दिली विशेष दाद!

ट्रेलर प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर प्रेक्षकांनी ‘बोल बोल राणी‘ सिनेमाच्या टीमचे विशेष कौतुक केले आहे. अनेकांनी तर या थरारक सिनेमाला पाहण्यासाठी प्रतीक्षा करणे आमच्याकडून होत नसल्याचेच जाहीर केले आहे. सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवून ठेवली आहे.

Web Title: Bol bol rani trailer out latest marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • hit movies
  • Sai Tamhankar
  • subodh bhave

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.